У нас вы можете посмотреть бесплатно अठरा श्लोकी भगवद् गीता | EIGHTEEN SHLOKAS OF BHAGAVAD GEETA или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
अठरा श्लोकी भगवद् गीता EIGHTEEN SHLOKAS OF BHAGAVAD GEETA #marathi #bhagwatgeeta #bhagavadgita #devotional संजय उवाच गेले कौरव आणि पांडव रणी वर्णी कथा संजय । ती ऐके धृतराष्ट्र उत्सुक मने, वाटे तया विस्मय । पाहे पार्थ रणी कुलक्षय घडे चित्ती विषादा धरी । युद्धापासुनी होऊनी विमुख तै टाकी धनुष्या दुरी ।।१।। झाला अर्जुन शोकमय बघुनी वेदांत सांगे हरी । आत्मा शाश्वत देह नश्वर असे हे अोळखी अंतरी । घेई बाणधनु करी समर तू कर्तव्य ते आचरी । वागे निस्पृह हर्ष शोक न धरी ज्ञानी जनांच्या परी ।।२।। अगा कर्माहूनी अधिक बरवे ज्ञान कथिसी । तरी कां तू येथे मजकडूनी हिंसा करविसी । वदे तै पार्थाते यदुपती करी कर्म नियते । फलेच्छा सांडोनी सहज मग नैष्कर्म घडते ।।३।। हराया भूभारा अमित अवतारासी धरितो । विनाशूनी दुष्टा सतत निजदासा सुखवितो । नियंता मी ऐसे समजुनी करी कर्म मजसी । समर्पी तूं कर्मी मग तिळभरी बद्ध नससी ।।४।। करी सारी कर्मे सतत निरहंकार असुनी । त्यजी प्रेमद्वेषा धरी न ममता जो निशीदिनी । जया चिंता नाही पुढील अथवा मागील मनीं । खरा तो संन्यासी स्थिरमतीही संकल्प सुटुनी ।।५।। चित्ताचा सखया निरोध करणे हा योग मानी खरा । हा मी हा पर भेद हा मुळी नसे चित्ती कधी ज्या नरा । जो सप्रेम सदा भजे मज तसा जो सर्वभूती सम । ठेवी मद् गत चित्त त्याहूनी दुजा योगी नसे उत्तम ।।६।। माझ्या केवळ जाहली प्रकृतिने ही सृष्टी सारी असे । पृथ्वीमाजी सुगंध मीच रस मी तोयांत पार्था वसे । सर्वांतर्गत मी परी नुमजती की ग्रस्त मायाबळे । जे चित्ती मज चिंतीती सतत ते तापत्रया वेगळे ।।७।। सदाध्याती माते हृदयकमळी जे स्थिरमन । तया देहांती मी अमित सुख देतो हरी म्हणे । म्हणोनी पार्था तूं निशिदिनीं करी ध्यानभजन । मिळोनी मद् रूपी मग चुकविसी जन्ममरण ।।८।। भक्तीने जल पत्र पुष्प फल की कांही दुजे अर्पिले । ते माते प्रिय तेवी जे जर सदा मद् कीर्तनी रंगले । पार्था ते नर धन्य ज्या मुखी वसे मन्नाम संकीर्तन । विष्णो, कृष्ण, मुकुंद, माधव हरे गोविंद नारायण ।।९।। कोठे देवासी चिंतू जरी म्हणसी असे ऐक माझ्या विभूती । संक्षेपे अर्जुन मी तुज गुज कथितो मी असे सर्वभूती । मी धाता विष्णू मी श्री शिव रवी मी निगमी साम मी विश्वरूप । माझी सर्वत्र सत्ता जगी असूनी असे दिव्य माझे स्वरूप ।।१०।। पार्थ विनवी माधवासी विश्वरूप भेटवा । म्हणोनिया हरी धरी विकटरूप तेथवा । मांडिला अनर्थ थोर पंडुकुमार घाबरे । म्हणे पुनश्च दाखवा विभो स्वरूप गोजिरे ।।११।। बरी सगुण भक्ती ती भजन निर्गुणाचे बरे । पुसे विजय तै तदा हरी वदे तया आदरे । असोत बहु योग ते तरीही भक्तियोगाहुनी । नसेची दुसरा असा सुलभ तो श्रमावाचुनी ।।१२।। क्षेत्रक्षेत्रज्ञ दोन्ही कथुनी मग पुढे कृष्ण पार्थासी सांगे । ज्ञानी त्याते म्हणावा भजुनी मज कदा जो मदाने न वागे । तैसा ज्या भेदबाणे प्रकृती पुरुषीचा सर्वभूती समत्व । कर्माची त्यांस बाधा तिळभरही नसे पावला तो प्रभुत्व ।।१३।। पार्था मी जनिता तशीच जननी माया जगत् संतती । जीवा सत्व रज: तम: स्रीगुण हे स्वाभाविक व्यापिती । जो सेवी परि भक्तिने मज तया हे बाधती ना गुण । झाला मत् सम तो प्रियाप्रिय नसे त्याते नुरे मीपण ।।१४।। ऊर्ध्वी मूळ तरी अपार पसरे अश्वस्थ संसार हा । छेदाया दृढ शस्त्र एकची तया नि:संगता भूरु हा । ऐसे अोळखुनी क्षराक्षर मला जे पूजिती भारता । ते होती कृतकृत्य गुह्य कळुनी पावोनी सर्वज्ञता ।।१५।। दैवी प्रकृती लक्षणे मनी धरी धैर्य क्षमा प्रोढता । चित:स्थास्थ्य दया शुचित्व मृदुता सत्यादि बा भारता । आता दंभ असत्य मत्सरपणा वर्मी परा बोलणे । काम क्रोध अहंकृती त्यज सदा ही आसुरी लक्षणे ।।१६।। सत्व रज: तम तीन गुणापरी श्रद्धा तप मख दान असे । त्रिविध अन्न ही निज बीजापरी आवडी त्यावरी दृढ बैसे । उत्तम मध्यम अधम जाणही क्रमे तयातुनी सत्व धरी । मग अोम तस्तत् वदूनी धनंजय ब्रम्हसमर्पण कर्म करी ।।१७।। त्यजू पाहसी युद्ध परि ते प्रकृती करविल तुजकडूनी । तरी वद पार्था परिसूनी गीता रूचते ममता का अजूनी । मग तो वदला मोह निरसला संशय नुरला खरोखरी । कृतार्थ झालो प्रसाद हा तव वचन तुझे मज मान्य हरी ।।१८।। ।।श्री कृष्णार्पणमस्तु।।