У нас вы можете посмотреть бесплатно Lazeez Paneer Biryani | पनीर लेयर बिर्याणी или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
@Jyoti_kitchen88 नमस्कार मंडळी, मी प्रतिभा गुजर तुमचं स्वागत करत आहे. आज एकदम टेस्टी अशी पनीर बिर्याणी रेसिपी शेअर केली आहे. त्यासाठी लागणारे साहित्य= बासमती तांदूळ -सव्वा किलो मलाई पनीर - पाऊण किलो कांदा -३मोठे उभे कट ढोबळी मिरची - ५,६ बारीक चिरून काजू - १/२वाटी कोथिंबीर - १वाटी पुदिना - २ वाटी अद्रक लसूण पेस्ट - १/२ चमचा वाटाणा -१ मुठ हळद - १/२ चमचा लाल मिरची पावडर -२चमचा काळं तिखट -२ चमचा मीठ चवीनुसार -१चमचा भात फोडणीसाठी= तेल -१पळी शहाजिरे -१चमचा दालचिनी -४ काड्या लवंग -५ काळे मिरे - १०ते१२ विलायची - ६ पाणी - अडीच ली. मीठ चवीनुसार - १/२ वाटी विधी = बासमती तांदूळ १/२घंटा भिजत घालून कढईत तेल गरम करून त्यात वरील दिलेल्या प्रमाणात कांदा लालसर तळून घ्यावे.ढोबळी मिरची, काजू, पनीर, कोथिंबीर, पुदिना, वाटाणा तेलात तळून घ्यावे.कढईतलं तेल काढून टाकावे व नंतर थोड्या तेलात वरील सर्व तळलेले साहित्य घालून त्यात दिलेल्या प्रमाणात अद्रक लसूण पेस्ट,हळद, लाल मिरची पावडर, काळं तिखट, मीठ चवीनुसार घालून परतावे .फोळणी साठी १ मोठं भांडं घेऊन त्यात १ पळी तेल घालून ते गरम झाल्यावर वरील दिलेल्या प्रमाणात गरम मसाले घालून ते १ मी.परतल्यावर त्यात अडीच ली.पाणी घालून १/२ वाटी मीठ घालून ते झाकून मोठ्या गॅसवर ठेवा.पाणी उकळल्यावर त्यात तांदूळ सोडून ते ८०%शिजल्यावर एळून घ्या.त्या भाताचे ३ समान हिस्सा करून त्यावर लिंबू रस,गरम मसाला,तुप व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे भातात मिक्स करावे.भांड्यात भात घालून त्यात पनीर ची लेयर घाला परत त्यावर मात व पनीर ची लेयर घालून व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे करा नंतर त्यात थोडे तळलेले तेल, पिवळा रंग दुधात घालून,जळलेले १ वाटी पाणी घालून ते भात झाकून २० मी.बारीक गॅसवर ठेवा.भात दमल्यावर ते सर्व्ह करावे. धन्यवाद 🙏🙏