У нас вы можете посмотреть бесплатно महाराष्ट्र विधानसभा । विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन 2026 । मुंबई или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
महाराष्ट्र विधानसभा । विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन 2026 । मुंबई आठवडा - तिसरा : दिवस - पाचवा. 📍विधानभवन, मुंबई. पिंपरी-चिंचवड शहराचा झपाट्याने होणारा विस्तार आणि श्रीक्षेत्र आळंदीचे वाढते धार्मिक महत्त्व लक्षात घेता पाणीपुरवठा, पर्यावरण, पर्यटन आणि पायाभूत सुविधा अधिक सक्षम करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मी पिंपरी-चिंचवड शहर तसेच श्रीक्षेत्र आळंदीच्या सर्वांगीण विकासासाठी विविध महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी राज्य शासनाकडे निधीची मागणी केली आहे. शहराच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, नदी संवर्धन, पर्यटन विकास आणि नागरी सुविधा मजबूत करण्यासाठी अनेक महत्त्वाचे प्रस्ताव शासनासमोर मांडले आहेत. या सर्व प्रकल्पांना लवकर मंजुरी मिळावी आणि शहर तसेच तीर्थक्षेत्राच्या विकासाला गती मिळावी, यासाठी सातत्याने पाठपुरावा करत आहे. प्रमुख मागण्या : • AMRUT-3 अंतर्गत पिंपरी-चिंचवड पाणीपुरवठा प्रकल्पासाठी निधी • पवना थेट जलवाहिनी प्रकल्पासाठी निधी • आंद्रा प्रकल्पातून १०० एमएलडी पाणीपुरवठा योजना • २०० एमएलडी क्षमतेचा वॉटर ट्रीटमेंट प्लांट • SCADA वॉटर बल्क मॅनेजमेंट प्रकल्प • इंद्रायणी आणि पवना नदी सुधार प्रकल्प • जुन्या STP प्रकल्पांचे अपग्रेडेशन आणि सांडपाणी पुनर्वापर योजना • मोशी घनकचरा प्रकल्पाचा दुसरा टप्पा • डुडूळगाव येथे इको टुरिझम पार्क, सफारी पार्क आणि गुलाबपुष्प उद्यान • नाशिक फाटा ते खेड एलिव्हेटेड कॉरिडॉर भूसंपादन निधी • श्रीक्षेत्र आळंदीकरिता प्रशासकीय इमारत, पाणीपुरवठा व ड्रेनेज प्रकल्प • आळंदीत CCTV सुरक्षा, LED स्ट्रीट लाईट आणि भूमिगत विद्युत वाहिनी • आळंदी नगरपरिषदेसाठी यात्राकर अनुदानात वाढ ‘पीएमआर’ मधील विकासकामे, प्रकल्पांना निधी मिळवण्यासाठी अत्यंत आग्रही मागणी आम्ही करीत आहोत. मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली या क्षेत्रातील विकासकामांना कालबद्ध नियोजन करुन चालना मिळेल, असा विश्वास आहे. Devendra Fadnavis Ravindra Chavan BJP Maharashtra #MaharashtraBudgetSession2026 #MaharashtraLegislature #VidhanBhavanMumbai #PimpriChinchwadDevelopment #AlandiDevelopment #UrbanInfrastructure #WaterManagement #RiverRejuvenation #SmartCityDevelopment #SustainableCities #PublicInfrastructure #MaharashtraDevelopment