У нас вы можете посмотреть бесплатно THE HISTORICAL PLACE OF PALASDEV | PUNE | VLOGE4 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
| पळसनाथ मंदिर, पाळसदेव, पुणे @itsdnyanu07 @itsbhagu07 पळसदेव हे पुणे जिल्ह्यातील एक गाव आहे. हे गाव भीमा नदीकाठी वसले आहे. पुणे-सोलापूर महामार्गावर असलेल्या या गावाजवळ पळसनाथ मंदिर आहे. गावात थांबल्यास, या गावापासून उत्तरेला दोन किलोमीटरवर उजनी जलाशय आहे. इ. स. 1969 साली उजनी धरणाचे काम सुरू झाले आणि 1980 च्या सुमारास पूर्ण झाले आणि त्या धरणाच्या पाणलोटक्षेत्रात पळसदेव गांव पाण्याखाली गेले. गांवाबरोबरच उजनीअर्पण झाली ती गावात असलेली पाच यादवपूर्वकालीन मंदिरे. या पाच मंदिरांपैकी पळसदेव मंदिर सर्वात मोठे आणि भव्य आहे. उजनी धरणाचं पाणी आटल्याने धरणाच्या परिसरातून एक प्राचीन खजिना समोर आला आहे. उन्हाळा आला की पुणे-सोलापूर रस्त्यावरच्या पळसदेव गावाजवळ इतिहासप्रेमी, निसर्गप्रेमींची एकच गर्दी होते. पळसदेव गावाच्या किनाऱ्यापासून बोटीने जावे लागते. ⚠️ ( *टीप - पर्याय म्हणून तुम्ही शेजारी असलेले गाव काळेवाडी मधून रस्ता आहे तिथून तुम्ही मंदिराच्या दिशेने जाऊ शकता. ) हे मंदिर हेमाडपंथी पद्धतीने बांधले आहे. साधारण बाराव्या शतकात कल्याण चालुक्य राजवटीत हे मंदिर बांधले गेले असावे. स्वतःला चालुक्य म्हणून घेणारी दोन मोठी राज्य होती, त्यातील बदामीजवळ असलेले बदामी चालुक्य हे सहाव्या-सातव्या शतकात सत्तेवर होते आणि बसवकल्याण इथे असलेले कल्याण चालुक्य हे बाराव्या शतकापासून सत्तेवर होते. हे मंदिर चालुक्य राजांनी दहाव्या ते बाराव्या शतकाच्या दरम्यान बांधले. याचा अर्थ हे मंदिर आणि किमान 900 ते 1100 वर्ष जुने आहे. हेमाडपंथी शैलीतील या मंदिराचे शिखर सप्तभुमिज शैलीमध्ये आहे ज्यामध्ये शिखरात एक लहानसा घुमट आहे, जेथे बसून सहा ते सात लोक हवन आणि पूजा करू शकतात. येथील शिखर हा एक अतिशय अनोखा प्रकार आहे जो सामान्यत: या भागातील मंदिरांमध्ये दिसत नाही. तसेच मंदिरातील खांब आणि मखरावर अतिशय सुंदर दगडी हस्तकला आहे. नंतर सतराव्या अठराव्या शतकात फलटणच्या राजे निंबाळकर यांनी या मंदिराची पुनर्बांधणी व विस्तार केला आहे. ⚠️ महत्वाची गोस्ट - तुम्ही मंदिरस भेट देण्यासाठी जात असाल तर तिकडचे वातावरण कसे आहे बघून जाऊ शकता, जसे कि पाऊसाळ्यात जात असाल तर तुमची वाहने नदीच्या कडेला लावा, आत मध्ये घेऊन जाण्याचे धाडस नका करू, आत मध्ये चिखलाचा परिसर असल्यामुळे तुमची फोरव्हीलर - टू-व्हीलर चिखलात फसू शकते. तुम्ही तिकडे असलेल्या गावामधील लोकांचा सल्ला घ्या, जेणेकरून तुम्हाला नंतर अडचण नाही येणार. #Palasdev #temple #pune #historyofindia #travelvlog #maharashtra #traveller #itsdnyanu07 #dnyanuvlog #itsdnyanu #madane #dnyaneshwar #track #india #vlogger #rain #mdnyanu07 #solapur #palasdevtemple #travelphotography #travel #destination #vloggerlife #marathi #trending #youtuber #top #1000subscriber #likeandsubscribe #subscribe #support #explore #explorepage #explorer