У нас вы можете посмотреть бесплатно लिंगाणा (Lingana Climbing and Rappelling ) или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
लिंगाणा हा रायगड किल्ल्याचा उपदुर्ग आहे.माणगड, सोनगड, महिन्द्रगड, लिंगाणा, कोकणदिवा हे किल्ले रायगडाकडे जाणाऱ्या घाटवाटांवर पहारे देतात. कावळ्या, बोचेघोळ, निसनी, बोराटा, सिंगापूर, फडताड, शेवत्या, मढ्या अशी घाटांची नावे आहेत. या वाटांवरून सह्याद्रीवरून खाली कोकणात उतरता येते. बोराट्याच्या नाळेलगत लिंगाण्याचा डोंगर आहे. आकाशात उंच गेलेला शिवलिंगासारखा त्याचा सुळका आहे. लिंगाच्या आकाराचा हा किल्ला महाडपासून ईशान्येस सोळा मैलांवर असून सह्याद्रीच्या मुख्य रांगेत तोरणा व रायगड यांचे दरम्यान आहे. लिंगाण्याचे खडक २९६९ फूट उंच असून त्याची चढण ४ मैल लांबीची आहे. तटबंदी पूर्ण नष्ट झाली आहे, बाकी फक्त काही हौद व धान्य कोठाराच्या खुणा शिल्लक आहेत. मोहरी नावाच्या सह्याद्रिमाथ्यावरील गावातून बोराट्याची नाळ (दोन डोंगरांमधील अरुंद वाट) जवळ आहे. ही नाळ चालत जायला बरीच अवघड आहे. येथून जवळच असणाऱ्या रायलिंग पठारावरून लिंगाण्याचे दर्शन होते. रायगड जर राजगृह तर लिंगाणा हे कारागृह. इथला बेलाग सुळका आणि निसरडी माती या गोष्टी त्यासाठी अतिशय अनुकूल आहेत. या अशा अवघड दुर्गावर स्वराज्याच्या शत्रूंना कैदेत ठेवत असत. वर अतिअवघड असा वाट नसलेला सुळका आणि खाली घसरड्या वाटा, त्यामुळे येथे कैद्यांना ठेवल्यावर त्यांच्या मनावर या अवघड स्थितीचा परिणाम होऊन कैदी अगदी खचून जात असत. पळून जाण्याचा विचारही त्यांच्या मनात येत नसे. जर कोणी कैद्याने पळण्याचा प्रयत्न केला तर त्याला जीव गमवावाच लागे. गडावरचे दोर आणि शिडा काढून घेतल्या की गडावरून पळण्याच्या वाटा बंद. #travelblogger #trekker #travel #maharashtratrekking #fortsofindia #trekking #viralvideo #viralvideos #maharashtraig #marathi