У нас вы можете посмотреть бесплатно Shirdi Keshar Mango Donation | शिर्डी साईचरणी 3500 kg केशर आंबा दान | भाविकांना आमरसाची मेजवानी или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Shirdi keshar Mango Donation | शिर्डी साईचरणी 3500 kg केशर आंबा दान | भाविकांना आमरसाची मेजवानी 3500 Kg of Kesar Mangoes Donated for Sai Devotees’ Special Meal Sweet Offering of Devotion । Kesar Mango ‘Prasad’ at Shirdi Sai baba Prasadalya Aamras shirdi donation sai trust शिर्डीच्या पवित्र भूमीत, साईबाबांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी दररोज हजारो भाविक गर्दी करतात. साई समाधीच्या दर्शनानं या भक्तीच्या प्रवासात, भाविकाच्या वाट्याला अद्वितीय अनुभव येतो तो म्हणजे साईप्रसादालयात मिळणारा गरमागरम जेवणाचा भोजन प्रसाद... भाविक मोठ्या आनंदानं साईंचा प्रसाद नेहमीच ग्रहण करतात. मात्र आज काही खास बेत आहे... कारण साई प्रसादालयात एक वेगळीच गोडी सामावलीये ... ती म्हणजे केशर आंब्याच्या रसाची! शिरूर येथील साईभक्त दीपक नारायण करगळ यांनी आपल्या श्रद्धेचा अनोखा ठेवा साईबाबांच्या चरणी अर्पण केलाय. तब्बल साडे तीन हजार किलो केशर आंबा, म्हणजेच बाजारभावानं जवळपास साडे चार लाख रुपयांचं केशरी आब्याचं फळ, त्यांनी साई संस्थानच्या साईप्रसादालयात दान केलंय. या आंब्यांपासून बनवलेला थंडगार, मधुर आमरस दोन दिवस भाविकांच्या जेवणात वाढण्यात येणार असल्याचं साई संस्थानकडून सांगण्यात आलय.. प्रसादालयातील स्वयंपाकघरांमध्ये सध्या केशरी आमरसाची सुगंध दरवळतोय. स्वच्छतापूर्ण, आधुनिक स्वयंपाकगृहात रोज हजारो भाविकांसाठी भोजन तयार होतं, सौर उर्जेवर चालणारं साई प्रसादालय आशीया खंडातील सर्वात मोठं दानछत्र असल्याचं आधीच सिद्ध झालयं.. दररोज येथे दहा वाजता भावीकांना भोजन दिणं सुरु केल जात.. आज देखिल सकाळ पासून केशरी आंबा निवडणे तसेच त्याला धुवून मशीन मधून त्याचा रस काढणं सुरु आहे.. पिवळा धमक आणि पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल असा आंबा रस तयार करत तो भावीकांच्या ताटात वाढला जातोय.. जेवणाच्या ताटात वाढलेला हा रस केवळ चवीलाच गोड नाही, तर त्यामागे आहे एक भावनिक आणि आध्यात्मिक ओढ. दीपक करगळ यांच्या या दानात केवळ आंब्याचा रस नाही, तर भक्तीचा, सेवाभावाचा आणि परंपरेचा आस्वाद आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांनी साईप्रेमाने हे दान केलं असून, अनेक भाविकांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंदाची झळक दिसून येतेय हे दान केवळ एक वेळचं भोजन पुरवणं नाही, तर ते श्रद्धेच्या रसात न्हालेलं एक उदाहरण ठरतयं. शिर्डीच्या या प्रसादालयात आज जे काही वाढलं जातंय, ते म्हणजे ‘प्रसाद’ .. देवाच्या कृपेचं रूप. आणि जेव्हा तो गोडसर आमरस तोंडात विरघळतो, तेव्हा तो प्रत्येक भाविकाच्या मनात साईंच्या कृपेचा साक्षात्कार घडवतो. असं म्हटलं जात की, श्रद्धा आणि सेवा या दोन गोष्टी मिळूनच भक्तीची खरी मधुरता निर्माण होते. आणि ती मधुरता सध्या शिर्डीच्या प्रसादालयात केशर आंब्याच्या रूपानं अनुभवता येतेय... चवीलाही, मनालाही आणि आत्म्यालाही! #sp24taas #shirdidonation #mangojuice #shirdi #saibabaprasadalya #megakitchen #saibabatemple #sujayvikhepatil