У нас вы можете посмотреть бесплатно कोरोना विषाणू संपूर्ण माहीती | Coronavirus complete information или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#coronavirus #corona #virus कोरोना व्हायरस नेमका आहे तरी काय त्याची लक्षण कोणती व तो होऊ नये म्हणून आपण कोणती काळजी घ्यायला हवी याची माहिती आपण या विडिओ मधून घेणार आहोत. कोरोना व्हायरस हे एक वास्तविक विषाणू कुळ आहे. त्यामध्ये २०० निरनीराळ्या जातींची गणना होते.चीनच्या हुबेई राज्यातल्या वुहान या शहरामध्ये या व्हायरस चा सर्वप्रथम प्रादुर्भाव झाला, त्यानंतर बघता बघतातो चीनच्या अनेक शहरांमध्ये पसरला, त्यानंतर आता हा व्हायरस आख्या जगभर धुमाकूळ घालतोय. या विषाणूची लागण झाल्यावर श्वसन संस्थेवर परिणाम होतो. ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते त्यांना या विषाणूचीलागण लगेच होते. (कोव्हिड - १९) कोरोना व्हायरसची लक्षणे कोरोना व्हायरसने सर्व जगामध्ये थैमान घातलं आहे. भारतातही कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसंन दिवस वाढत असल्याने भारतात सुद्धा चिंतेचे वातावरण आहे. कोरोना विषाणूची लागण झाल्यावर कोणती लक्षणे दुसऱ्या दिवसापासून चौदाव्यादिवसपर्यंत रुग्णा मध्ये आढळतात ते आपण बघणार आहोत. कोरोना व्हायरस हा श्वसन संस्थेशी निगडित असून सर्दी, खोकला, श्वास घेण्यास त्रास होणे हि या व्हायरसची प्राथमिक लक्षणे आहेत. शिंकण्यातून किंवा खोकण्यातून हवे वाटे हा विषाणू पसरतो. कोरोना आजाराची प्रमुख लक्षणे १) ताप - ताप येतो, बॉडी टेम्प्रेचर वाढते, सध्या वातावरणातील बदलाने सगळीकडे तापाचे रुग्ण भरपूर प्रमाणात आढळतात. मात्र जास्त दिवस ताप राहत असल्यास Pricoshan म्हणून लवकरात लवकर रक्ततपासणी करून घ्यावी. २) घसा दुखणे - गिळण्यास त्रास होणे, घस्याला इन्फेक्शन असणे. ३) श्वास घेण्यास अडथळा - श्वास घेण्यास त्रास होणे ४) वाहतं नाक - सर्दी होऊन नाक गळणे. ५) डोकेदुखी - डोकं दुखणं ६) अंगदुखी - सर्दी - ताप येऊन अंग दुखणं म्हणजेच कणकणी येणं. ७) जुलाब होणे. औषधोपचार आणि उपाय : कोरोना आजारावर अजूनपर्यंततरी कोणतेच ठोस औषध नाही. पण या आजाराची लक्षणे जाणून घेतल्यानंतर प्राथमिक स्वरूपाचे औषधोपचार केले जाऊ शकतात. उदाहरणार्थ रुग्णाचा ताप कसा कमी होईल यावर लक्ष केंद्रीत केले जाते. काही गंभीर प्रकरणांमध्ये रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा निर्णय घेतला जातो. आवश्यकता भासल्यास रुग्णाला कृत्रिम श्वसन यंत्रणेवर म्हणजेच (व्हेंटिलेटर) ठेवलं जातं. प्रतिबंधात्मक उपाय व काळजी कशी घ्याल श्वसन संस्थेशी संबंधित आजार असणाऱ्या व्यक्तीशी संपर्क टाळावा. कच्चे अन्न, मास खाणे टाळणे. फळे व भाजीपाला धुवून घेणे त्याबरोबर खोकताना किंवा शिंकताना नाकावर रुमाल धरावा. आजारी असल्यास घराबाहेर पडू नका, रोगाचा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संपर्कात येणे टाळा. हात स्वच्छ धुवा : वारंवार हात स्वच्छ धुतल्यानं हातावरील रोगजंतू-विषाणू मारले जातात. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, कोरोना व्हायरसपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी हात वारंवार स्वच्छ करणं आवश्यक आहे. रोग नियंत्रण केंद्रानुसार, साबण आणि पाण्यानं नियमित हात स्वच्छ धुणे हा कोणत्याही संसर्गापासून बचाव करण्यासाठीचा सर्वाधिक चांगला उपाय आहे. साबण उपलब्ध नसल्यास अॅल्कोहोल बेस्ड हँड सेनिटाइझरनं हात स्वच्छ करावेत. गर्दीची ठिकाणे टाळा - लोकांपासून सुरक्षित अंतर ठेवा. कोरोना व्हायरसची वैद्यकीय तपासणी कशी करावी? केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या हेल्पलाईन क्रमांक - 01123978046 वर कॉल करा. हा हेल्पलाईन क्रमांक सर्वांसाठी 24 तास उपलब्ध आहे. याव्यतिरिक्त [email protected] या मेल आयडीवरही तुम्ही आपले प्रश्न पाठवू शकता. यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना तुमच्याकडे लगेचच पाठवले जाईल. संसर्ग झाल्याची किंवा होण्याच्या शक्यता आढळून आल्यास तुम्हाला तपासणीसाठी जवळील हॉस्पिटलमध्ये नेण्यात येईल. सरकारतर्फे संशयित कोरोनाबाधित रुग्णांना हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी स्वतंत्र रुग्णवाहिकांची सोय करण्यात आली आहे. संशयित रुग्णांनी खबरदारी म्हणून सार्वजनिक वाहनांचा वापर करू नये. कोरोना लक्षणग्रस्त व्यक्तींचे थ्रोट स्वॅब (घशातील त्वचेचे नमुने) आणि नेझल स्वॅबचे म्हणजेच (नाकातील त्वचेचे नमुने) प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठवले जातात. यानंतर डॉक्टरांकडून त्यांच्या शारीरिक आरोग्याचीही तपासणी केली जाते. यावरून संशयित रुग्णास हॉस्पिटलमध्ये दाखल करायचे की नाही? हे ठरवलं जातं. अन्यथा, तुम्हाला घरातच राहण्याचा सल्ला दिला जातो. चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यास प्रकृती पूर्णतः सुधारेपर्यंत रुग्णाला पुढील १४ दिवसांसाठी क्वारेंटाईनमध्ये राहणं आवश्यक आहे. #कोरोना #विषाणू #go_corona #corona_go #lockdown #critical_situation #viral_infection #corona_medicine #hospitals #doctors #COVID-19 #healthcare तर मित्रांनो तुम्हाला जर हि माहिती आवडली असेल तर हा विडिओ LIKE करा तसेच तुमच्या मित्रांबरोबर हि माहिती SHARE करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही आमचा चॅनल SUBSCRIBE नसेल केला तर आमचा चॅनेल सुद्धा नक्की SUBSCRIBE करा. त्याचबरोबर SUBSCRIBE बटनाच्या बाजूला एक बेलचा आयकॉन आहे त्यावरती सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या चॅनेलवर नवीन येणाऱ्या व्हिडियोचे नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला मिळतील. धन्यवाद मित्रांनो Follow Us :- Follow @Instagram: / umeshmahadik7 Follow @Facebook: / umeshmahadik57 Follow @Amazon: https://www.amazon.in/shop/umeshmahadik Follow @YouTube: / umeshmahadik Follow @Blogger: https://umeshmahadik.blogspot.com Follow @Twitter: / mahadik14 For Business Inquiries & Sponsorship Email Id : [email protected] If you like the video, don't forget to LIKE, SHARE, SUBSCRIBE, COMMENT.