У нас вы можете посмотреть бесплатно माझं गाव - काजुर्ली или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Mynativeplace/ Myhometown/konkan https://m.facebook.com/story.php?stor... माझं गाव...... काजुर्ली (ता.गुहागर,जि.रत्नागिरी) 415726 ज्या परिसरा सभोवती कसदार शेतीला योग्य जमीन आहे तसेच जेथे शेती होते आणि त्यासाठी लागणारे मनुष्यबळ उपलब्ध आहे अशा ठिकाणास गाव असे म्हटले आहे. गुहागर तालुक्यामधील आमचं छोटस एक गाव काजुर्ली.गावाबद्दल सांगायचं म्हणजे गाव तस छोटसच पण बाकी सगळ्या गोष्टींमध्ये मोठं.गावामध्ये जवळ जवळ सहाशे पर्यंत घर आहेत त्यात दहा वाड्या आणि पंधराशे इतकी गावाची लोकसंख्या आहे.त्याचबरोबर गावचे क्षेत्रफळ 1104.00 हेक्टर इतके आहे. गाव जिल्ह्यापासून 60 की.मी. अंतरावर आहे. तसेच जिल्हा मार्ग गावामधून गेला आहे.गावात बहुतांशी सुविधा उपलब्ध आहेत.मुख्य म्हणजे शाळा व हायस्कूल आहेत. प्रत्येक वाडीमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय आहे. त्याच बरोबर दवाखाना आहे आपत्कालीन परिस्थिती मध्ये डॉक्टर आहेत.गावापासून 2-3 कि.मी. अंतरावर प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. धार्मिक स्थळे आहेत त्यात मंदिरे आणि विहार आपल्याला पाहायला मिळतील. दळण वळणासाठी बस सुविधा व खाजगी गाड्यांची सुद्धा सुविधा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे.तसेच सब पोस्ट ऑफिस गावात उपलब्ध आहे. त्याचबरोबर गावाची लोकसंख्या 600 च्या वरती असल्यामुळे ग्रामपंचायत सुद्धा गावामध्ये स्थापन आहे.परंतु गावात बाजारपेठ नसली तरी खुप दुकाने मात्र आहेतच त्यामुळे गावातील लोकांना खुप वेळा बाजारात जावं लागतं नाही. आमच्या गावामध्ये शेती हा प्रमुख व्यवसाय आहे मग त्याला काही जोडधंदे आहेतच. काही लोक कामानिमित्त मुंबई ला असतात मग ते कोकणातला प्रमुख सण म्हणजे गणपतीला मोठ्या उत्साहानं येतात. आनंदानं सांगायचं म्हणजे गावामध्ये मोठी कापशी नदी आहे. त्याच बरोबर सुंदर असे निसर्ग रम्य ठिकाणे आहे.त्यामुळे आमचं हे कोकणातलं रत्नागिरी जिल्ह्यातील काजुर्ली गाव खूप सुंदर आणि प्रसिद्ध आहे. #kajurli #काजुर्ली #कोकणचीशान #kokanchishan videography- video editing- अंकेश धांगडे कैलास धांगडे Thanks for you gave me a your valuable time👍👍 keep supporting / ankesh.dhangade