У нас вы можете посмотреть бесплатно महाराष्ट्र बनणार जागतिक उत्पादन केंद्र! उद्योग GDP 1500 अब्ज डॉलरचे लक्ष्य | 50 लाख रोजगार или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
महाराष्ट्राला जागतिक उत्पादन केंद्र बनवण्याचा मोठा संकल्प राज्याच्या अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्योग क्षेत्राचा जीडीपी 123 अब्ज डॉलर्सवरून 1500 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट जाहीर केले. यासाठी उच्च विकास क्षमता असलेल्या क्षेत्रांसाठी मूल्य साखळी निर्माण करणे, प्रत्येक उदयोन्मुख जिल्ह्यात औद्योगिक समूह उभारणे आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसाठी (MSME) आर्थिक सहाय्य देण्याच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. तसेच Invest Maharashtra या एकसंध डिजिटल व्यासपीठाची निर्मिती करण्यात येणार आहे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग आयुक्तालय तसेच सेवा आयुक्तालय स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्यात MSME केंद्र उभारले जाणार असून त्यातून सुमारे 50 लाख रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे. बांबू विकास प्रकल्पाच्या माध्यमातून 50 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करून 5 लाख रोजगार निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तसेच मुंबई आणि पुणे येथे 50 अब्ज डॉलर्सचे मीडिया टेक आणि AVGC (Animation, Visual Effects, Gaming & Comics) केंद्र उभारण्याची योजना आहे. यासोबतच 400 नवीन ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स (GCC) आणि नवउपक्रम शहरांची उभारणी करून 30 लाखांहून अधिक रोजगार निर्मितीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. याशिवाय सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी सिंधुरत्न समृद्ध योजना तीन वर्षांसाठी राबवण्यात येणार असून कोकण भागात साकव बांधणी आणि दुरुस्ती कार्यक्रमही जाहीर करण्यात आला आहे. #MaharashtraBudget #InvestMaharashtra #MSME #IndustrialGrowth #Jobs #AVGC #MakeInMaharashtra #KonkanDevelopment #DevendraFadnavis #MaharashtraNews