У нас вы можете посмотреть бесплатно धुळ्यात BJP मध्ये अंतर्गत स्फोट! | सुबोध पाटीलांचा राजीनामा भाजपासाठी धोक्याची घंटा? | Bol MH или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
धुळ्यात BJP मध्ये अंतर्गत स्फोट! | सुबोध पाटीलांचा राजीनामा भाजपासाठी धोक्याची घंटा? | Bol MH धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजताच धुळ्याच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप झाल्याचं चित्र दिसत आहे. ज्या धुळ्यात भाजपने आतापर्यंत शिस्तबद्ध आणि संघटित पक्ष म्हणून ओळख निर्माण केली होती, त्याच भाजपमध्ये आज अंतर्गत बंडखोरी, नाराजी आणि आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे. या सगळ्या घडामोडींचं केंद्रबिंदू ठरला आहे भाजपचे शहर जिल्हा महानगर चिटणीस सुबोध पाटील यांचा राजीनामा. गेल्या आठ वर्षांपासून पक्षासाठी निष्ठेने काम करणाऱ्या सुबोध पाटील यांना उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर त्यांनी थेट पदाचा राजीनामा दिला. यामुळे धुळे भाजप, BJP Dhule, Dhule Mahanagarpalika Election 2025 या चर्चांना मोठं उधाण आलं आहे. स्थानिक राजकीय वर्तुळात सध्या एकच चर्चा सुरू आहे – भाजपमध्ये उमेदवारी देताना नेमके निकष काय लावले गेले? तिकीट सट्टा, मसल पॉवर, पैशांचा प्रभाव, आणि दोन नंबरवाल्यांची चलती असल्याचे गंभीर आरोप समोर येत आहेत. ज्यांनी बूथ पातळीवर काम केलं, पक्ष वाढवला, जनतेचे प्रश्न मांडले, अशा निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावललं जात असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये तीव्र आहे. भाजपमधील या अंतर्गत गोंधळाचा थेट परिणाम महायुतीवर होताना दिसतोय. एकीकडे भाजप अडचणीत असताना, दुसरीकडे शिंदे गटाच्या शिवसेनेने धुळे मनपा निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा करून राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलून टाकली आहेत. यामुळे BJP vs Shinde Sena, Mahyuti Crisis in Dhule, Dhule Political News हे मुद्दे अधिकच तापले आहेत. या सगळ्याचा फायदा कोणाला होणार? भाजपमधील नाराज नेते आता शिंदे शिवसेना, अजित पवार गट, तर काही ठिकाणी अपक्ष लढण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. त्यामुळे येत्या २४ तासांत धुळ्यात मोठा आयाराम-गयाराम पाहायला मिळू शकतो. दरम्यान, महाविकास आघाडी (MVA) मात्र जागावाटपात बऱ्यापैकी आघाडीवर असल्याचं चित्र आहे. काँग्रेस, उबाठा शिवसेना, राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांचे गणित जवळपास ठरल्याचं सांगितलं जात आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत जवळ आल्याने, आज धुळे मनपा कार्यालयात मोठी गर्दी उसळण्याची शक्यता आहे. या व्हिडिओमध्ये आम्ही सविस्तरपणे पाहणार आहोत – 👉 सुबोध पाटील यांच्या राजीनाम्याचा भाजपावर होणारा परिणाम 👉 भाजपातील बंडखोरी आणि तिकीट वाटपाची पार्श्वभूमी 👉 महायुतीतील फूट आणि शिंदे सेनेचा स्वबळाचा नारा 👉 महाविकास आघाडीचं गणित 👉 धुळे मनपा निवडणूक 2025 मधील संभाव्य राजकीय उलथापालथ धुळेकरांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीचा कच्चा चिठ्ठा उघड करणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास Like, Share करा आणि Comment मध्ये तुमचं मत नक्की कळवा. धुळे आणि उत्तर महाराष्ट्रातील प्रत्येक राजकीय अपडेटसाठी आमच्या चॅनलला Subscribe करायला विसरू नका. 👇 Follow kara: 📲 WhatsApp Channel: 👉 https://whatsapp.com/channel/0029Vb5C... 📸 Instagram: 👉 / bolmh_