У нас вы можете посмотреть бесплатно Bible Vachan 31-12-2025 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
यहोवा देवाचे राज्य सर्वकालचे आहे, ऐश्वर्य व सामर्थ्य त्याचेच आहे. स्तोत्रसंहिता १४५:१-२१ दावीद राजा यहोवा देवाची स्तुती आराधना करतो. तो म्हणतो, माझ्या देवा, हे राजा, मी तुझी स्तुती प्रशंसा करीन, मी सदासर्वकाल तुझ्या नावाचा (यहोवाचा) धन्यवाद करीन. प्रतिदिवशी मी तुझा धन्यवाद करीन, आणि मी सदासर्वकाल तुझे नाव (यहोवा) स्तवीत जाईन. यहोवा थोर आणि परमस्तुत्य आहे, आणि त्याचा महिमा शोधणे अशक्य आहे. एक पिढी दुसऱ्या पिढीला तु केलेल्या कृत्यांची प्रशंसा करील आणि तुझ्या पराक्रमाची कार्ये सांगतील. यहोवा देवाच्या थोरवीचे गौरवी ऐश्वर्य आणि तुझ्या अदभुत कार्याचे दावीद म्हणतो मी ध्यान करीत जाईन. यहोवाच्या भयकारक कार्यांच्या पराक्रमाविषयी मनुष्ये बोलतील, आणि मी तुझा महिमा गाईन. तुझ्या थोर चांगुलपणाविषयी आठवणी आम्ही काढू आणि मोठयाने तू केलेल्या न्यायीपणाविषयी गायन करीत जाऊ. यहोवा देव, कृपाळू व दयाळू, मंदक्रोध आणि फारच प्रेमदयाळू आहे. यहोवा देव सर्व मानव जातीशी चांगला आहे, त्याच्या अतिकरुणा त्याच्या सर्व कृत्यांवर आपल्याला दिसतात. हे यहोवा, तू केलेल्या सर्व कृत्यांबद्दल सर्व मानवजात तुला धन्यवाद देतील, आणि तुझे भक्त तुला धन्यवादित म्हणतील. ते तुझ्या राज्याच्या वैभवाविषयी बोलतील आणि तुझ्या पराक्रमाविषयी सर्व लोकांना सांगतील. हे यासाठी होईल कि तुझे पराक्रम आणि तुझ्या राज्याचे ऐश्वर्य काय आहे ते मानव जातीने सर्व मनुष्य संतानांस कळवावे. हे यहोवा, तुझे राज्य सर्वकालचे राज्य आहे, आणि तू सर्व जगावर राज्य करतोस. आणि तुझा राज्याधिकार सर्व पिढंयामध्ये चालणारा आहे. पडत असलेल्या सर्वाना यहोवा देव आधार देतो, आणि जे अन्यायाने दबलेले किंवा चिंतीत आणि वाकून गेलेले आहेत त्यांना तो उभे करतो. सर्व मानवजातीचे डोळे तुझ्याकडे लागलेले असतात, आणि वेळच्यावेळी तू त्यांना त्यांचे अन्न देतोस. तसेच तू आपला हात उघडून सर्व जीवजंतूंची इच्छा तृप्त करतोस. यहोवा देव आपल्या सर्व मार्गात न्यायी आणि आपल्या सर्व कार्यात कृपाळू आहे. जे सर्व यहोवा देवाला हाक मारतात, ते जर सगळे सत्यतेने त्याला हाक मारतात, त्यांना तो आपल्या जवळ घेईल. जे यहोवा देवाला भितात व त्याच्या आज्ञा व नियम पाळतात त्यांची इच्छा तो पुरवील, तो त्यांची आरोळी ऐकून त्यांना सर्व संकटातून तारील व निभावून नेईल. जी सगळी मानवजात त्याची आवड धरतात त्यांना यहोवा देव रक्षीतो, परंतु सर्व दुष्टांचा यहोवा देव नाश करील. दावीद राजा म्हणतो, माझे मुख यहोवा देवाची सदासर्वकाल स्तुती करील आणि सर्व प्राणिमात्र सदासर्वकाल यहोवा देवाच्या पवित्र नावाचा धन्यवाद करोत. आपण यहोवा देवाने व येशू ख्रिस्ताने दिलेल्या पहिल्या आज्ञेप्रमाणे एकच यहोवा देवाला भजूया. हाललु याह आमेन. श्री. अॅथोनी जॉन परेरा, यहोवा देवाचा सेवक (परेरा बिल्डर्स)