У нас вы можете посмотреть бесплатно कौशल्या विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय आणि गोल्डन रॉक्स इंग्लिश स्कूल,वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
विश्वात्मा शिक्षण प्रसारक मंडळाच्या स्नेहसंमेलनात सांस्कृतिक रंगांची उधळण पाटेगाव (छत्रपती संभाजीनगर): विश्वात्मा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कौशल्या विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय आणि गोल्डन रॉक्स इंग्लिश स्कूल, पाटेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दि. १७ जानेवारी २०२६ रोजी वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या सोहळ्यात विद्यार्थ्यांनी ४५ हून अधिक गाण्यांवर नृत्याविष्कार सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मा. प्रा. चंद्रकांतजी गायकवाड होते. प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त शिक्षण उपसंचालक मा. भाऊसाहेबजी तुपे व सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी मा. मधुकरजी देशमुख उपस्थित होते. सपीठावर संस्थेचे सचिव मा. वाल्मिकजी सुरासे, मा. विजयजी द्वारकुंडे, मा. विठ्ठलजी पैठणकर, मा. सौ. देवयानीताई गायकवाड, दत्तात्रय सुरासे, संजीवनी रावस, गोकुळजी रावस, अशोकरावजी रावस, फकीरचंद घेवारे, सतिषजी कर्पे, श्रीराम रावस, सुधीरजी रावस, विष्णू नवले, नानाजी नवले, बाबुरावजी रावस, भूषणजी करकंसे, सुभाषरावजी ससाणे आणि दिलीपजी सनवे या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांचे मार्गदर्शन मा. मधुकरजी देशमुख: "शाळेचा परिसर अतिशय निसर्गरम्य असून असे सांस्कृतिक कार्यक्रम प्रत्येक शाळेत होणे गरजेचे आहे," असे मत त्यांनी व्यक्त केले. त्यांनी पालक आणि शाळेच्या नियोजनाचे विशेष कौतुक केले. मा. भाऊसाहेबजी तुपे: विविध कलागुणांमुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला वाव मिळतो, असे सांगून त्यांनी स्नेहसंमेलनास शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय भाषणात प्रा. चंद्रकांतजी गायकवाड यांनी शाळेच्या स्थापनेपासूनच्या प्रवासाचा आढावा घेतला. पालकांच्या मोठ्या उपस्थितीबद्दल आनंद व्यक्त करत त्यांनी विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांचे कौतुक केले. सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी 'गजानना गजानना गौरनंदन', 'चला जेजुरीला जाऊ', 'अंबाबाई गोंधळला ये' अशा भक्तीगीतांनी कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर 'झुलवा पाळणा', 'आला बैलगाडा', 'साऊथ इंडियन व महाराष्ट्रीयन सण', 'चाक भूम भूम', 'मा मुझे स्कूल नही जाना', 'तुझमे रब दिखता है', 'जुबी डुबी' आणि 'फॅन्सी ड्रेस' अशा तब्बल ४५ गाण्यांवर विद्यार्थ्यांनी बहारदार सादरीकरण केले. नियोजन आणि आभार कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव श्री. वाल्मिकरावजी सुरासे यांनी केले. त्यांनी शाळेचा वटवृक्ष कसा झाला, याचे वर्णन करत शिक्षकांच्या कार्याचा गौरव केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नारायण औटे यांनी केले, तर आभार प्राचार्य श्री. निलेशजी गायकवाड यांनी मानले. यशस्वीतेसाठी कष्ट घेणारे शिक्षक वृंद: हा सोहळा यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक निलेश गायकवाड, नंदकिशोर पातकळ, बालाजी नलभे, विजय सपकाळ, स्वप्नजा पाटील, सोन्याबापू पालवे, भाऊसाहेब गायकवाड, अमोल गायकवाड, प्रकाश कामडी, अनिता तारख, आकेश दांडेकर, प्रविण काळे, शितल थिटे, अस्मिता भिसे, स्वप्निल गव्हाणे, अनिता मापारी, प्रियंका देशमुख, अक्षय शेळके, ओंकार औटे, निखील पापुलवार, सतिष पवार, विठ्ठल त्रिभुवन, महेश गायकवाड तसेच गोल्डन रॉक्सच्या शिक्षिका मीनाक्षी आव्हाड, प्राजक्ता गोसावी, वेदश्री काळे, किरण केरकळ, अंजली थोरात, योगेश्वरी निवारे, कविता मोरे, सुनीता पटेल आणि संध्या डोंगरे यांनी परिश्रम घेतले. 📍 आजची मोठी बातमी: आज छत्रपती संभाजीनगर (पैठण) येथे आयोजित कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण आणि संपूर्ण अपडेट्स या व्हिडिओमध्ये पहा. ✅ आमच्याशी जोडले जा: ताज्या घडामोडींसाठी चॅनेलला Subscribe करा आणि बेल आयकॉन दाबा!