У нас вы можете посмотреть бесплатно ऑर्किड नेचर फाऊंडेशन, जळगाव/ दोन दिवसीय गॉड -ग्रीन ट्रीप /दि. १२ व १३ जुलै २०२५/ भाग-२/ वान प्रकल्प или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
ऑर्किड नेचर फाऊंडेशनची दोन दिवसीय (God Green Trip) शेगाव, वान प्रकल्प सहल संपन्न आमच्या ऑर्किड नेचर फाऊंडेशनची दि. १२ व १३ जुलै रोजी दोन दिवसीय गॉड ग्रीन ट्रीप उत्साहात संपन्न झाली. १२ जुलै रोजी मेहुण येथील संत मुक्ताई, तापी पूर्णा संगमावरील श्री संत चांगदेव मंदिर, श्रावण बाळाची हत्या झाली ज्याचा रामायणात उल्लेख आला आहे असा हरताळा तलाव, नागझरी, शेगाव येथील श्री. गजानन महाराज देवस्थान यांना भेट देऊन दर्शन घेतले. सकाळी ६:०० वाजता जळगावहून दृतगती महामार्गावरून गाडी सुसाट निघाली. काही वेळातच सूर्योदय बघितला. आजूबाजूला हिरवीगार शेते. डोंगर टेकड्या हिरव्यागार झालेल्या. नजर जाईल तिकडे हिरव्या रंगाच्या अनेक छटा दिसत होत्या. 'हिरवे हिरवे गार गालिचे, हरित तृणांच्या मखमालीचे' या बालकवींच्या 'फुलराणी' कवितेतील ओळी मनात रूंजी घालू लागल्या. संध्याकाळी शेगाव येथील पर्यावरण संवर्धनासाठी मोलाचं कार्य करणारी गो-ग्रीन संस्थेने संवर्धीत केलेल्या आठव्या 'ओमकार वनास' भेट दिली. तिथे गो- ग्रीन संस्थेचे उपाध्यक्ष विठ्ठल मिरगे, श्री. प्रशांत खत्री, प्रसिद्धी प्रमुख दीलिपजी इंगळे, श्री. प्रल्हाद साबे, श्री. भेरूलालजी राठी, प्रमोद इंगळे, एकनाथ भिसे, आनंद बरनेला, धम्माल आंग्रे हे सर्व पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते. गो-ग्रीन संस्थेच्या सदस्यांनी मिळून शेगावच्या पावन भूमीत निसर्ग संवर्धनासाठी विविध उपक्रम सातत्याने राबवीले आहेत. कमी जागेत जास्तीत जास्त भारतीय प्रजातीची वृक्ष लागवड करून लोकसहभागातून आणि श्रमदानातून विविध ठिकाणी एकूण आठ वने उभारली आहेत. त्यापैकी एक असलेल्या 'ओमकार वनास' भेट देऊन लावलेल्या वृक्षांची पहाणी केली. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन गो- ग्रीन संस्थेस "पर्यावरण मित्र" सन्मानपत्र देऊन अध्यक्ष श्री. आर. एन. कुलकर्णी यांच्या हस्ते सर्व सदस्यांच्या उपस्थितीत गौरव करण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या वनश्री पुरस्काराने सन्मानित श्री. विठ्ठल मिरगे सरांनी त्यांच्या संस्थेच्या कार्याची माहिती दिली. तसेच आमच्या ऑर्किड नेचर फाऊंडेशनचाही सन्मान पत्र देऊन गौरव केला. शेगाव येथील आनंद विहार आणि मंदिराच्या संपूर्ण परिसरातील स्वच्छता, शिस्तबध्द नियोजन, निस्वार्थ सेवा देणारे सेवेकरी भक्त सगळंच जगात नंबर एक. दि. १३ जुलै रोजी वारी हनुमान आणि कारंजा लाड येथील दत्तगुरूंच्या गुरूमाई मंदिरास भेट देऊन दर्शन घेतले. वारी हनुमानास जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवीगार शेते सातपुडा डोंगररांगा बघत गाडी वेगात निघाली. वान नदीवरील महाकाय अशा हनुमान वान प्रकल्प बघितला. ह्याच धरणातून संपूर्ण शेगाव आणि आजुबाजूच्या तालुक्यांना पाणीपुरवठा केला जातो. या परिसरात निसर्ग सौंदर्य आणि वान नदीचे लहान-मोठे स्रोत खळखळून वाहत होते. पुढेही प्रशस्त चौपदरी राष्ट्रीय महामार्गामुळे प्रवासाचा शीण अजिबात जाणवला नाही. सदर सहलीसाठी अध्यक्ष श्री. राजेंद्र कुलकर्णी व सौ. आरती कुलकर्णी, श्री. किशोर महाजन व सौ. आरती महाजन, श्री. दीलिप भारंबे, सौ. कल्पना भारंबे, श्री. श्रीरंग कुलकर्णी व सौ. हर्षदा कुलकर्णी, सौ. माधुरी कोल्हे व श्री. अतुल कोल्हे, सौ. सुनीता महाजन व श्री. सोमनाथ महाजन या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. तसेच सौ. माधुरी चौधरी, श्री. रघुनाथ बऱ्हाटे व सौ. मिनाक्षी बऱ्हाटे , सौ. तेजल किनगे, श्रीमती सिंधु आरोटे यांनी सहभागी होऊन सहकार्य करत आनंद लुटला. अशाप्रकारे आमच्या ऑर्किड नेचर फाऊंडेशनची दोन दिवसीय सहल उत्साहात संपन्न झाली. ऑर्किड नेचर फाऊंडेशनची दोन दिवसीय सहल/ग्रो- ग्रीन फाऊंडेशनच्या ओमकार वनास भेट/ शनिवार दि. १२ जुलै २०२५ व्हिडिओ लिंक • ऑर्किड नेचर फाऊंडेशन, जळगाव/सहलीत शेगाव ये...