У нас вы можете посмотреть бесплатно शिक्षक होणं सोपं नसतं… или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
शिक्षक होणं सोपं नसतं… आज School Day च्या निमित्ताने लेकरांसोबत एक वेगळा आणि भावनिक अनुभव घडला. आज मी त्यांच्याशी गुरुजी म्हणून नाही तर त्यांच्या आयुष्याच्या प्रवासातला एक सोबती म्हणून मनमोकळं बोललो. शिक्षक होणं म्हणजे फक्त पुस्तक शिकवणं नाही. शिक्षक होणं म्हणजे अनेक स्वप्नांना दिशा देणं… अनेक डोळ्यांमध्ये आशेचा दिवा लावणं… आणि प्रत्येक लेकराच्या मनात चांगल्या माणसाचा अंकुर रुजवणं. आज लेकरांनी अगदी शांतपणे, मन लावून माझं प्रत्येक शब्द ऐकला. त्यांच्या डोळ्यांमध्ये कुतूहल होतं, आदर होता आणि एक विश्वासही होता… की गुरुजी जे सांगतात ते आयुष्य घडवणारं असतं. मी त्यांना सांगितलं — शिक्षक हा फक्त वर्गात उभा असलेला माणूस नसतो. तो राष्ट्राच्या भविष्यास आकार देणारा शिल्पकार असतो. समाजात डॉक्टर, इंजिनियर, अधिकारी, शास्त्रज्ञ तयार होतात… पण त्या सगळ्यांच्या पाठीशी उभा असतो तो एक शिक्षक. म्हणूनच शिक्षकाचं काम म्हणजे एक नोबेल व्रत आहे. हे व्रत प्रेमाचं, संयमाचं आणि जबाबदारीचं आहे. आज बोलताना मनात एकच भावना होती — ही लेकरं मोठी होतील, आपापल्या वाटेवर जातील… पण त्यांच्या आयुष्यात कुठेतरी गुरुजींचे दोन शब्द, दोन संस्कार कायम जिवंत राहतील. आणि शिक्षकासाठी यापेक्षा मोठं समाधान दुसरं काहीच नसतं… #SchoolDay #TeacherLife #गुरुजी #शिक्षणसंस्कार #बालमन #विद्यार्थीजीवन #शिक्षकआणिविद्यार्थी #Education