У нас вы можете посмотреть бесплатно गजानन चालीसा By Kanaka Harkare | Shree Gajanan Maharaj Sansthan, Shegaon | Meenakshi Gorantiwar или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
प्रगट दिनाच्या शुभ पर्वावर सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या सेवेत प्रथमच आम्ही भाविकांसाठी घेऊन येतो आहोत.. श्री गजानन चालीसा श्रध्दा सुमने विशेषतः शेगाव या पावन भूमीत जन्मलेल्या. मीनाक्षी गोरंटीवार यांच्या लेखणीतून साकारलेली आणि मोरेश्वर निस्ताने यांनी संगीतबद्ध केलेली ही गजानन चालीसा भक्ती रंगात रंगलेली आहे.. गायक कलावंत :-- मुकुल पांडे ,मोरेश्वर निस्ताने ,प्रसन्ना जोशी ,दत्ता हरकरे ,राजेश तीतरमारे, गौरी गायकवाड शिंदे ,श्रेया खराबे टाकसाळे, अंकिता टकले टिकेकर, स्वस्तिका ठाकूर ,कनका हरकरे या नामांकित गायक गायिकांचे सूर या चालीसाला लाभले आहेत. चित्रीकरण/ संकलन :--मनोज पिदडी यांचे आहे ध्वनिमुद्रक :-नितीन कायरकर ध्वनिमुद्रण :-अनाहद रेकॉर्डिंग स्टुडिओ 🙏आम्ही ऋणी आहोत यातील प्रत्येक कलावंताने आपले योगदान दिले आहे.. आपली सेवा श्रीचरणांशी समर्पित केली आहे.. महाराजांच्या कृपेने ही चालीसा भाविकांच्या घराघरात पोहचेल असा आम्हाला दृढ विश्वास आहे.कारण महाराज आपल्या भक्तांचे मनोरथ पूर्ण करतात हा भक्तांचा स्वानुभव आहे. जय गजानन 🙏🙏 १) श्री गजानन चाळिसा.🙏🙏 १) गुरुदेवा गजानना गुरुदेवा हरी देवा गजानना गुरुदेवा २) जन्म मृत्यूचा चुकवा फेरा कृपा करा गुरूवरा ३) कार्यारंभी स्मरण करावे गजाननाचे नाम जपावे ४) संकटकाळी धावुनी येतो तिमिरामधुनी वाट उजळतो ५) माघवद्य सप्तमी दिनी प्रगट जाहला दिनमणी ६) पातुरकरांच्या वाड्यावरचा अनुप सोहळा ऋतुशांतीचा ७) भोजनास त्या बसल्या पंक्ती योगीवर ते शिते वेचती ८) कृतीस त्यांंच्या देखोनिया बंकट गेला भारावुनिया ९) भाव भक्तीच्या नाण्यावरती प्रसन्न होई सद्गुरू मुर्ती १०) काशीच्या त्या गोसाव्याचा हट्ट पुरविला तू चिलमिचा ११) सचित्त स्वरूपा आत्मारामा धडा शिकवशी जानकीरामा १२) क्षणात आणिले जल विहरिला भास्कर मागे क्षमा गुन्ह्याला १३) उदक लागले तव भक्तीचे पिक येऊ दे सत्कर्माचे १४) आग उसळता मोहळ उठले हा हा म्हणता लोक पळाले १५) लाडू खाण्या जमती सारे संकटकाळी फिरती वारे १६) पाटील बंधू उर्मट सारे अरेतुरेचे बोलणे न्यारे १७) अखेर तुजला शरण आले नि:सीम पुढे भक्त जाहले १८) आदेश दिला ब्रह्मगिरीला त्याग म्हणाले अवडंबराला १९) पावन तुझ्या सहवासाने द्वाडपण सोडले अश्वाने २०) सुकलालाची ती गोमाता शांत जाहली चरणी येता २१) तुझ्या कृपेने भास्कर तरला प्रयाण केले वैकुंठाला २२) कितीक गाऊ देवा महती आज्ञा पालन काकही करती ......... २३) भक्तासाठी धावुनी गेला वाचविले तू गणु जवऱ्यला २४) भक्त शिरोमणी पितांबराने पालवी आणिली गुरू कृपेने २५) अतूट श्रद्धा बाबांवरती रोगमुक्त झाला गंगाभारती २६) बंडूतात्या कर्जात बुडाला तुम्हीच दिले द्रव्यघटाला २७)नौका फुटली ओंकारेश्वरी माय नर्मदा लावी किनारी २८ ) प्रसाद टिळकांनी ग्रहण केला गीतारहस्य जन्मास आला २९) दिल्या पादुका पुंडलिकाला स्वप्नामध्ये तुम्ही पुजनाला ३०) कवराची ती झुनका भाकर तुम्ही केली जगी अजरामर ३१) बायजाबाई जनाई समही भक्तीस तिच्या तोडच नाही ३२) धारण करुनी विठ्ठल रूपाला बापू काळ्यांना साक्षात्कार दिला ३३) महाराज वंदले प्रिय हरीला थोडे दिवस मी संगतीला ३४) भाद्रपद शुद्ध पंचमीला गजाननाने प्राण रोधिला ३५ ) शेगाव ग्रामी वसली माऊली डोईवर राहो तिची सावली ३६) नित्य भाविकांचा भरतो मेळा तृप्त होती देखोनी सोहळा ३७) डंख विखारी रोज मनाला छळ छळ छळती प्रत्येकाला ३८) सदा लाभो अम्हा जिव्हाळा मोक्ष पदाला न्यावे दयाळा ३९) श्री चालीसा नित्य पठावा गुरू कृपेचा महिमा जाणावा ४०) काय वर्णावी मी दिव्य गाथा तुझिया चरणी ठेविते माथा मीनाक्षी गोरंटीवार ...✍️ ..................... CREDITS : SONG : GAJANAN CHALISA LYRICS : MINAKSHI GORANTIWAR SINGAR : MORESHWAR NISTANE, PRASANNA JOSHI, MUKUL PANDE, DATTA HARKARE, RAJESH TITARMARE, ANKITA TAKLE TIKEKAR, GOURI GAYKVAD SHINDE, KANKA HARKARE, SHRYA TAKSALE KHARABE, SWASTIKA THAKUR MUSIC : MORESHWAR NISTANE SONG PROGRAMED/ ARRANGED BY : RAJESH /PUSHKAR SONG RECORDED AT : ANAHAD STUDIO RECORDING ENGG : NITIN KAYARKAR INSTRUMENTS PLAYER SHAHNAI : KHADSE MRUDAGAM / TABLA : DEVENDRA YADAV GUITAR : SANJAY GADE VIDEO CREDIT : VIDEO SHOOT / EDITING SPECIAL EFFECTS BY : SHREE EDIT : MANOJ MANOHAR PIDDI POSTER DESIGN BY WAISHALI KOLARKAR SPECIAL THANKS TO AMRUT PRATISHTHAN You can also listen 🎧 to the song on your Fav Streaming Platforms 🎧 Spotify: https://open.spotify.com/album/0mrLpp... 🎧 Gaana: https://gaana.com/album/gajanan-chalisa 🎧 Apple Music: / gajanan-chalisa 🎧 JioSaavn: https://www.jiosaavn.com/album/gajana... 🎧 Wynk: https://wynk.in/u/LH2xUjyfj 🎧 Amazon Music: https://music.amazon.com/albums/B0CWX... 🎧 YouTube Music: • Album - Gajanan Chalisa Worldwide Distributed by www.RHYFIL.com (Rhythms & Films Media) #gajanan_maharaj_shegaon #gajananchalisa #gajananmauli