У нас вы можете посмотреть бесплатно हल्ल्याने वैतागला सौदी, अमेरिकेला...! लिंक👇कमेंटमध्ये... или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
पश्चिम आशियातील युद्धामुळे सौदी अरब आता अमेरिकेवरच प्रचंड चिडला आहे. अमेरिकेने संरक्षणाचे वचन दिले असतानाच इराणने सौदीला टार्गेट केले आहे. त्यामुळे आता सौदी अरबने चीन सोबत एक मोठी शस्रास्र करार केला आहे. एव्हीएशन इंडस्ट्री कॉर्पोरेशन ऑफ चायना (AVIC) आणि सौदीच्या जनरल अथोरिटी फॉर मिलिट्री इंडस्ट्रीज ( GAMI ) दरम्यान हा ५ अब्ज डॉलरचा करार झाला आहे. या करारातील महत्वाचा भाग म्हणजे जेद्दाहमध्ये विंग लूंग -3 ( Wing Loong-3 ) या मानवरहित विमान म्हणजे ड्रोनची खरेदी केली जाणार आहे. या फॅक्ट्रीत दरवर्षी ४८ ड्रोन तयार केले जाणार आहेत. त्यामुळे सौदी अरबच्या संरक्षण सज्जतेत वाढ होणार आहे. चीन आता मध्य पूर्वेत एक भागीदार म्हणून पुढे आला आहे. त्यामुळे अमेरिकेला हा सौदीने दिलेला मोठा झटका दिलेला आहे. विंग लूंग-3 चीनचा हाय एण्ड कॉम्बॅट युएव्ही मानला जात आहे. याची काही प्रमुख क्षमता यास खास बनवत आहेत. एंटी जॅमिंग क्षमता – आधीच्या मॉडलपेक्षा 40 टक्के चांगला उड्डाणाचा कालावधी – सुमारे 40 तास ऑपरेशनल रेंज – 10,000 किलोमीटरहून जादा हा ड्रोन दीर्घकाळ टेहळणी आणि स्ट्राईक मिशन दोन्ही करु शकतो. यामुळे यास मल्टी रोल युएव्ही म्हटले जात आहे. धुळीच्या वादळातही ड्रोन काम करणार मध्य पूर्वेतील हवामान खूपच आव्हानात्मक असते. येथे धुळीची वादळे येत असतात आणि तापमान 50 डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहचते. विंग लूंग-3 खास याच परिस्थितीसाठी तयार करण्यात आले आहे. याच्या इंजिनात मल्टी-स्टेज डस्ट प्रोटेक्शन आणि एडव्हान्स कुलिंग सिस्टीम लावण्यात आली आहे. त्यामुळे रेतीच्या वादळातही हा ड्रोन न थांबता काम करतो. रियाद डिफेन्स एक्स्पोमध्ये याचे यशस्वी प्रदर्शन केले होते. पर्वतमय परिस्थितीत देखील जास्त शानदार उड्डाण घेते. या प्रदर्शनाने चीनी शस्रास्रांच्या रिलायबिलीटीवर उठणाऱ्या सर्व प्रश्नांना समाप्त केले आहे. आता हे ड्रोन सौदी अरबच्या सीमांवर तैनात होऊन कोणत्याही धोक्यांचा मुकाबला करण्यास सज्ज आहे. चीन ग्लोबल डिफेन्स मार्केटमध्ये मोठा भागीदार चीनचे हे पाऊल खास करुन पश्चिम देश खासकरुन अमेरिकेच्या एकाधिकार शाहीला मोठे आव्हान आहे. चीन केवळ शस्रास्रे विकत नाही तर त्याने रियाद येथे एक मोठे लॉजिस्टीक्स हब बनवण्याचा निर्णय घेतला आहे. येथे २ हजाराहून अधिक सुट्या पार्ट्सचा स्टॉक उपलब्ध असणार आहे. ज्यांना ४८ तासात कोणत्याही आखाती देशात पोहचवणे शक्य होणार आहे. यासोबत सौदीच्या पायलटना डिजिटल ट्विन व्हर्च्युएल सिस्टीमवर ट्रेंनिग दिली आहे. जी F-15 लढाऊ विमानांच्या ऑपरेटिंग सिस्टीमशी मेळ खाते. त्यामुळे पायलट कमी वेळात युद्धासाठी तयार होऊ शकणार आहेत. ही संपूर्ण इकोसिस्टीम चीनला ग्लोबल डिफेन्स मार्केटमध्ये मोठा भागीदार म्हणून सिद्ध करणार आहे.