У нас вы можете посмотреть бесплатно श्री दत्त स्तुति | तुम्हा वीण दत्ता मला कोण तारी | Shree Datta Stuti | नकारात्मकताकमी होण्यासाठी или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
|| दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा || श्रीदत्तात्रेय हे दैवत वरवर पहाता वैराग्यदर्शक, नि:संग व अलिप्त असले तरी सामान्य संसारी जनांना व्यवहारिक अडिअडचणी, विवंचना, अनारोग्य, तणाव व नकारात्मकता यांचे परिणाम कमी होण्यासाठी "श्री गुरुदेव दत्त” ची ही अतिशय सुंदर शब्द रचनेतील स्तुति अतिशय उपयुक्त व प्रभावी ठरते..... 🙏🏻 Everest Bhakti Latest Song - • Everest Bhakti Latest Song ♪ Song Available on ♪ WYNK - https://bitly.ws/395tH Gaana - https://bitly.ws/395tx Amazon Music - https://bitly.ws/395tT JioSaavn - https://bitly.ws/395u5 Apple Music - https://bitly.ws/395uf Spotify - https://bitly.ws/395us Artist Credits: Singers: Dattatray Mestri Music Composed: Paresh Shah (Bombay Paresh) Lyrics: Traditional Music Programmed by: Harshil Mistry & Jay Joshi Recorded by: Kamlesh Sharma (Line in Studio - Mumbai) Vocal Supervision: Mohan Morajkar Mix & Master by: Jay Joshi Video Concept: Kreative Kings Video Edit & Graphics: Elite Hub - (Vishal Luhana) श्री दत्ता ची स्तुति यतीरूप दत्तात्रयादंडधारी पदी पादुका शोभती सौख्यकारी दयासिंधु ज्याची पदें दुःखहारी तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी पदें पुष्करा लाजवीती जयाचीं मुखाच्या प्रभे चंद्र मोहुनि याची घडो वास येथें सदा निर्विकारी तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी सुनीटा असती पोटऱ्या गुल्फ जानू कटिं मौंज कौपीन ते काय वानूं गळां माळिका ब्रह्मसूत्रासि धारी तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी गळां वासुकीभूषणे रुद्रमाळा टिळा कस्तुरी केशरी गंध भाळा जयाची प्रभा कोटिसूर्यासी हारी तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी जटाभार माथां प्रभा कुंडलांची । त्रयास्यें भुजा शास्त्र सायूध साची । त्रिशूळ माळादिक छाटिधारी । तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी कली पातका पातका वाढवाया। तयाने जनां मोहिले गाढ वायां । जगीं अवतरे दुःखहारा असुरारी। तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी अनुसूया सत्त्व हारावयासी त्रिमुर्ति जातां करी बाळ त्यांसी निजे पालखीं सर्वदा सौख्यकारी तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी प्रसिद्ध असती क्षेत्रतीर्थे तयांचा । कली पातलया जाहला लोप साचा ।। करी तत्प्रसिद्धी मिषे ब्रह्मचारी । तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी मुखें वेद नीचाचिया बोलवीले। श्रिशैल्या क्षणे तंतुकालागि नेलें । सुदेही करी विप्रकुष्टा निवारी । तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी दरिद्रें बहु कष्टला विप्र त्यासी क्षणें द्रव्य देऊनि संतोषवीसी दिला पुत्र वंध्या असुनी वृद्ध नारी तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी मनी इच्छि विप्रैक व्हाया अन्नदान । असें जाणुनी कौतुका दावि पूर्ण ॥ करी तृप्त लेशान्निं जो वर्ण चारी । तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी विलोकूनिया शूद्रभक्ती मनीं ती । कृपें दीधले पीक अत्यंत शेतीं । । करी काशियात्रा कुमारा अधारी । तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी नृपस्थानिं रंकासही स्थापियेलें । मदें व्यापिले विप्र निर्गर्व केले।। कृपादृष्टिनें स्फोटकातें निवारी | तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी ॥ द्विजाच्या घरी घेवडा वेल ज्याने । मुळापासुनी तोडिला तो तयाने ॥ दिली संतती संपदा दुःखहारी । तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी शुष्कासुनी काष्ठही वृक्ष केला । गतप्राण तो पुत्र सजीव केला ॥ औदुंबरी आवडे वास भारी । तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी त्रिलोकीं अशी कीर्ति केली अगण्य । अगम्यागमा ख्यातिही ज्याची धन्य ॥ स्मरे भक्तिनें तद्भवदुः दुःखहारी । तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी अनंतावधी जाहले अवतार । परी श्रीगुरुदत्त सर्वांत थोर ।। त्वरें कामना कामिकां पूर्णहारी । तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी अनंतावधी जाहले अवतार परी श्री गुरुदत्त सर्वांत थोर त्वरें कामना कामिकां पूर्णहारी तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी तपें तीर्थ दाने जपादी करीती । स्वहीतार्थ ते दैवताला स्तवीती। परी केलिं कर्मे वृथा होती सारी तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी सदा आसरी दत्त सर्वार्थकामा । त्वरें भेटती टाकुनी सर्व कामा । मना माझिया आवरी दैन्यहारी । तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी ॥ मनी आवडी गायनाची प्रभुला । करी सुस्वरें नित्य जो गायनाला । तयाच्या त्वरेंसंकटातें निवारी। तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी असे क्षेत्र काशी शिवाची पुरी ते। प्रभातींकरी स्नान गंगातिरी तें। करी कर्विरी अन्हिं भिक्षार्थ फेरी । तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी निशीं जाय निद्रार्थ मातापुरासी । सवें कामधेनू वसे तेजरासी ॥ तसे श्वानरूपी सवें वेदचारी । तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी जनां मुक्तिचा मार्ग दावावयासी । कळाया स्वरूपप्रचीती तयांसी । त्रिलोकी करी जो निमीषाधि फेरी । तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी ॥ असें रूप ठावें तुझे असतांना । वृथा हिंडलो दैवतें तीर्थ नाना ॥ परी शेवटी पायिं आलो भवारी। तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी जधी जन्मलों नेणुंदुःखा सुखाला । अयुर्दाय अज्ञानिं तो व्यर्थ गेला ॥ कळू लागतां खेळलों खेळ भारी । तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी तृतीयांश आयुष्य ऐसेंचि गेले। परी नाहिं त्वन्नाम मी आठवीलें । अतां यौवन प्राप्त झालें अपारी । तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी परद्रव्य कांता पराची पहातां । स्मरादी रिपू ओढिती मानसाऽतां ।। कसा ध्याउं तूतें मधुकैटभारी । तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी पुढें वृद्धता प्राप्त होईल वाटे। तिच्या यातना देखतां चित्त फाटे ।। कधी भेटसी केवि हो चक्रधारी । तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी आयुष्यार्ध निद्रार्णवामाजि गेलें पणा तीन शेषांत ते जाण केले॥ तयांनी मना गोविलें दुःखभारी । तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी अशा घोर मायासमुदा पहातां । भिवोनी पदीं पातलों तुमच्याsतां ॥ तरी क्लेश चिंतादि दुःखासि हारी। तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी ॥ ॥अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त॥