У нас вы можете посмотреть бесплатно Mehrangharh Fort Jodhpur (Rajasthan series Episode 4) или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
मेहरानगढ हा भारताच्या राजस्थान राज्यातील जोधपूरमधील एक किल्ला आहे. १४६०साली जोसवणाऱ्या राव जोधा या राजाने मेहरानगढ किल्ल्याची उभारणी केली. जोधपुर शहरापासून ४१५ मीटर उंचीवरील हा किल्ला मोठ्या भिंतीमुळे अभेद्य बनला आहे. मेहरानगढचा किल्ला प्रख्यात लेखक रूडयार्ड किप्लिंग याने वर्णन केल्या प्रमाणे "हे महाल महाकाय लोकांनी बांधल्यासारखे आणि सूर्याने रंगवल्यासारखे दिसतात". मेहरानगढ [१] हा किल्ला जोधपूर शहरातील कोणत्याही भागातून दिसून येतो. शहरातील उंच टेकडीवर हा किल्ला बांधला असून अतिशय पुरातन बांधकाम आहे. अतिशय उंच भिंती अभेद्य तटबंदी. किल्ल्याच्या भिंती ३६ मीटर उंच आणि २१ मीटर रुंद आहेत. किल्ला वास्तुरचनेचे अतिशय उत्तम् उदाहरण. येथून शहराचे विहंगम दृश्य दिसते. किल्यावरून शहराकडे नजर टाकल्यास शहरातील निळ्या रंगाची घरे नजरेत भरतात ही घरे शहरातील ब्राह्मण समाजाची आहे. किल्यामध्ये राजघराण्याचे संग्रहालय आहे व आजही जतन केलेला सोनेरी महाल आहे. हा महाल ८० ते १०० किलो सोन्याने मढवलेल्याचा अंदाज आहे. या महालात मैफिली वगैरे पार पडत. किल्ल्याच्या प्रवेशद्वाराबाहेरच किरात सिंह सोडा या किल्ल्याचे रक्षण करताना धारातीर्थी पावलेल्या सैनिकाची छत्री आहे. प्रवेश करून आत गेल्यावर जयपूरच्या सैन्याने हल्ला करताना बंदुकीच्या गोळ्यांनी पडलेली भिंतीवरील भोके तसेच एक निखळून पडलेला दरवाजा अजूनही दिसतो. किल्ल्यात असणाऱ्या सात भव्य दरवाजांमध्ये महाराजा मानसिंह ने बांधलेला 'जय पोळ' (बांधकाम इ.स.१८०६ ) तसेच महाराज अजित सिंह यांनी बांधलेला, मुघलान्वरील विजयाचे प्रतिक असणारा 'फतेह पोळ'(बांधकाम इ.स.१७०७ ) आहेत. लोह पोळ या शेवटच्या दरवाज्यावर १८४३ मध्ये राजा मानसिंह यांच्या बरोबर सती गेलेल्या राण्याच्या हातांचे ठसे आहेत. दुधाकांग्डा पोळ, अमृत पोळ, गोपाल पोळ आणि भेरू पोळ असे एकूण सात दरवाजे या गडाला आहेत. किल्ल्यात अनेक सुंदर महाल आहेत. मोती महाल, शिश महाल, फुल महाल, सिलेह खाना, दौलतखाना असे अनेक महाल बघण्यासारखे आहेत. महालातील संग्रहालयात पुरातन पालख्या, हौदे, पाळणे, शस्त्र, कपडे, लघु चित्रे यांचे संग्रह आकर्षकपणे मांडलेले आहेत.