У нас вы можете посмотреть бесплатно Amit V.Deshmukh Speech/23 Annual General Meeting of Vilas CO.Opretive Sugar или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
मागच्या ४० वर्षात मांजरा परीवाराने लातूर जिल्हयातील ग्रामीण भागात आर्थिक क्रांती घडवण्याची उज्वल परंपरा निर्माण केली विलास सहकारी साखर कारखाना अधिमंडळाची २३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न सोमवार, २९ सप्टेंबर २०२५: मागच्या ४० वर्षात मांजरा परीवाराने लातूर जिल्हयातील ग्रामीण भागात आर्थिक क्रांती घडवण्याची उज्वल परंपरा निर्माण केली आहे. या कार्याचा विस्तार करुन आगामी ४० वर्षाच्या काळात ही पंरपरा अधिक उज्वल करण्याचा प्रयत्न राहील अशी ग्वाही दिली. सोमवार दि. २९ सप्टेंबर २५ रोजी दुपारी लातूर शहरातील हॉटेल वैष्णव बँकवेट हॉल येथे विलास सहकारी साखर कारखाना अधिमंडळाचीची २३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन वैशालीताई विलासराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी बोलताना विलास सहकारी साखर कारखान्याच्या २३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त सर्व सभासदांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी मांजरा परिवारातील साखर कारखान्यांच्या प्रगतीचा लेखाजोखा मांडला, तसेच शेतकऱ्यांच्या नुकसानीबद्दल राज्य सरकारवर तीव्र टीका केली. मांजरा परिवाराची यशस्वी वाटचाल आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी सुरू केलेल्या मांजरा शेतकरी साखर कारखान्याची ४१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. मांजरा परिवाराने मागील ४० वर्षांच्या प्रगतीचा लेखाजोखा घेऊन पुढील ४० वर्षांचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. मातृसंस्था असलेल्या मांजरा कारखान्याच्या नेतृत्वाखालील इतर सर्व साखर कारखान्यांची वाटचाल उल्लेखनीय असून, यात ऊस उत्पादक शेतकरी सभासद, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान असल्याचे सांगीतले. प्रामाणिक कारभारावर विश्वास सहकारात प्रामाणिक कारभाराची आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी दिलेली शिकवण घेऊन आज आपला मांजरा परिवार काम करत आहे. आपल्यावर असलेल्या विश्वासाच्या बळावरच आजवर अनेक निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत, असे त्यांनी नम्रपणे सांगितले. दोन दशकांत सर्वांगीण विकास झाल्याचे सांगतांना ते पुढे म्हणाले, दोन दशकात आपण सर्वांनी मिळून आपल्या संस्थेचा सर्वांगीण विकास केला. आज आपण इथेनॉल, कंप्रेस्ड गॅस तयार करतो आणि वाहनांसाठी सीबीडी गॅस येणाऱ्या काळात तयार करणार आहोत. ऊसातून केवळ साखर उत्पादन न ठेवता, अन्य उत्पादन घेत असल्याने ऊसाला चांगला भाव देता येईल. शेतकऱ्यांच्या नुकसानीवर सरकारला फटकारले यावेळी महाराष्ट्र गीत ऐकले जात असताना राज्यातील शेतकऱ्यांच्या वेदना पाहून अतीव दुःख होत असल्याचे आमदार देशमुख यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, एकट्या लातूर जिल्ह्यातील नुकसानीचा आकडा ३ ते ४ हजार कोटी रुपयांपर्यंत जाईल, तर राज्याचा आकडा ५० हजार कोटींच्या घरात जाण्याची शक्यता आहे. मात्र, विद्यमान सरकारच्या काळात भ्रष्टाचार बोकाळला आहे. सरकारी अधिकारी 'गबाळ मारण्याच्या' विचारात असल्यासारखे वाटत आहे आणि सरकार अतिवृष्टीच्या नुकसानीबाबत निधीबाबत सकारात्मक असे ठोस बोलायला तयार नाही. सध्या आपण गेंड्याच्या कातडीचे सरकार पाहत आहोत असे सांगीतले. नोकरभरती आणि आगामी गाळपाचे नियोजन उच्च शिक्षण घेऊनही आज रोजगार उपलब्ध नसताना, मांजरा परिवाराने वेगवेगळ्या पदांवर आणि हार्वेस्टरच्या माध्यमातून १८ महिन्यांत १० हजार तरुणांना नोकऱ्या देण्याचे काम केले आहे. १००% यांत्रिकीकरणासाठी मांजरा परिवाराने पुढाकार घेतला असला तरी, चांगले काम करणाऱ्या ऊस तोड कामगार व मुकादम टोळ्यांचा रोजगार जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. मागील ४० वर्षांत मांजरा परिवाराने जी प्रगती साधली, त्यापेक्षाही अधिक प्रगती, अधिक विकास आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांची अशीच आर्थिक क्रांती आपल्याला येणाऱ्या ४० वर्षांत करायची आहे, असे सांगून आमदार देशमुख यांनी कारखान्याच्या संचालक व अधिकाऱ्यांना आगामी गाळप हंगामापूर्वी दसरा ते दिवाळीदरम्यान शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी आणि रस्ते पाहणी करण्याच्या सूचना दिल्या. तसेच, झोमॅटो प्रमाणे ऊस तोडणीसाठीसुद्धा तंत्रज्ञानाचा वापर करावा, जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील ऊस तोडणीचे वेळोवेळी अपडेट मिळतील. सध्या आसमानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना संपूर्ण नुकसान भरपाई मिळेपर्यंत शांत बसणार नाही, वेळप्रसंगी आंदोलन देखील करू, असा शब्द आमदार अमित देशमुख यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिला. --- Subscribe For More Updates: ---------------------------------------------- YouTube: / amitdeshmukhofficial Facebook: / amitdeshmukhofficial Twitter: / amitv_deshmukh