У нас вы можете посмотреть бесплатно Akola Murtizapur News | खंडणीखोर पती पत्नी मूर्तिजापूर पोलीसांच्या जाळ्यात @LoknayakNews или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
१ लाखाची खंडणी घेताना रंगेहाथ पकडले #akola_news #akolakar #akolanewsnetwork #blackmailer #blackmailcase अकोला येथील एका व्यापाऱ्याला ब्लॅकमेल करुन मूर्तिजापूर तालुक्यातील खरब ढोरे येथील आरोपी पती - पत्नीने १९ लाख रुपयांचा गंडा लावला, नेहमी पैशाची मागणी होत असल्याने सदर व्यापाऱ्याने मूर्तिजापूर पोलीसांना माहिती देत तक्रार दाखल केली. तक्रारी नुसार पोलीसांनी सापळा रचून पती - पत्नी दोघांनाही रंगेहात अटक केली. अकोल्यात व्यवसाय करणारे व्यापारी यांच्यानुसार, “ स्टेट बँक ऑफ इंडीया च्या मेन ब्रॉन्च टावर चौक अकोला येथे खात्यात पैसे जमा करण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी तेथे एक अनोळखी ३२ वर्षीय महीला त्यांच्या जवळ आली व तीने मला तुमच्याशी बोलायचे आहे असे म्हणुन फीर्यादी यांचा मोबाईल क्रमांक प्राप्त केला. त्यानंतर तीने फीर्यादी यांना बरेच वेळा कॉल केले. त्यानंतर तीने फीर्यादी यांना सांगीतले की, “ मला तुमच्याशी बोलायला आवडते असे म्हणुन तीने फीर्यादी यांना तीचे पती बाहेर गावी जाणार आहे असे सांगुन त्यांना २ जुलै रोजी तीचे गावी खरब ढोरे येथे बोलाविले. घरी गेले असता आरोपी महिला लता नितेश थोप हीचे सोबत बोलत असतांना तिचा पती नितेश प्रभाकर थोप याने त्याचे घराचा दरवाजा आतुन लावुन फिर्यादी सोबत त्याची पत्नी लता हीचा फोटो काढून, “ तु माझ्या पत्नीशी जबरदस्ती करत होता, तुने माझ्या पत्नीवर अत्याचार केला. याची पोलीसात तक्रार करेल अशी धमकी देत, तुझा फोटो तुझ्या नातेवाईकांना पाठवतो, अन्यथा ३ लाख रुपये दे ! भितीपोटी फिर्यादी व्यापाऱ्याने त्यांना ३ लाख रुपये दिले. त्यांनतर आरोपींनी फीर्यादीस वेळोवेळी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन रोख व ऑनलाईन माध्यमाने १८ लाख ७४ हजार रुपये खंडणी स्वरूपात उकळले. घटनेच्या दिवशी फिर्यादी पती - पत्नी पुन्हा ५ लाख रुपयांची मागणी केली. आपल्याकडे एक लाख रुपये जुळले असून तेवढेच मी देतो, असे सांगून कर्जबाजारी झालेल्या व्यापाऱ्याला आरोपींकडून होत असलेल्या मागणीने त्रस्त होउन त्यांनी या प्रकाराची तक्रार मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे नोंदविली. दरम्यान पोलीसांनी ३० ऑगस्ट रोजी राष्ट्रीय महामार्गावर काटेपूर्णा टोल नाका दरम्यान सापळा रचून १ लाख रुपयांची खंडणी घेताना आरोपींना अटक करुन त्यांच्या कडून एक लाख रुपये रोख, दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या. आरोपी पत्नी लता नितेश ढोरे वय ३२ वर्ष ही ‘ सावज ’ शोधून घरी बोलवायची व पती ब्लॅकमेल करुन अनेकांकडून पैसे उकळत असावी असा पोलीसांचा कयास असून हे प्रकरण पुढे काय वळण घेते ? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. फोनवरून :- श्रीधर गुट्टे, ठाणेदार, मूर्तिजापूर प्रतिनिधी सुमित सोनोने मूर्तिजापूर अकोला