У нас вы можете посмотреть бесплатно जिल्हा परिषद मैदानात स्वच्छता или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
सातारा : जिल्हा परिषद ग्राउंड परिसरातील वाढता कचरा, दारूच्या बाटल्या व प्लास्टिक कचऱ्यामुळे अस्वच्छता निर्माण झाली होती. याची दखल घेत आज सकाळी विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. रुद्र अकॅडमीचे जाधव यांच्या सहकार्याने आरोग्य सभापती व कार्यकुशल नगरसेवक धनंजय जांभळे ऊर्फ पिंटूदादा, सामाजिक कार्यकर्ते धनंजय कदम, राहुल साबळे तसेच नगरसेवक रवी पवार यांच्या पुढाकारातून ही मोहीम पार पडली. सकाळी ६ ते ९ या वेळेत ग्राउंड लेव्हलवर प्रत्यक्ष साफसफाईचे काम करण्यात आले. दारूच्या रिकाम्या बाटल्या, प्लास्टिक कचरा व इतर खरखटे गोळा करून संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला. यावेळी प्रभाग १६ विसावा-कल्याणी येथील मुकादम चंद्रभान चव्हाण व त्यांची टीम उपस्थित होती. तसेच झेडपी ग्राउंड मॉर्निंग ग्रुपचे सदस्यही या उपक्रमात सहभागी झाले होते. नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये व स्वच्छता राखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.