У нас вы можете посмотреть бесплатно शिवजयंती उत्सव 2026 बायकोला घेऊन शिवनेरीवर😍🚩 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
शिवजयंती उत्सव 2026 बायकोला घेऊन शिवनेरीवर😍🚩#शिवजयंती #शिवनेरी #youtube #marathmolijodi शिवनेरी किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. शिवनेरीचा हा प्राचीन किल्ला महाराष्ट्र राज्यात जुन्नर शहराजवळ, पुण्यापासून १०५ किलोमीटरवर आहे. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २६ मे, इ.स. १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. शिवनेरी १९ फेब्रुवारी १६३० रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी गडावर झाला होता. हा किल्ला खूप प्रसिद्ध आहे. या किल्ल्याला चारही बाजूंनी कठीण चढाव असून त्याला जिंकावयास कठीण असा बालेकिल्ला आहे. किल्ल्यावर शिवाई देवीचे छोटे मंदिर व जिजाबाई व बाल-शिवाजी यांच्या प्रतिमा आहेत. या किल्ल्याचा आकार शंकराच्या पिंडीसारखा आहे.शिवनेरी किल्ला - शिवरायांचे जन्मस्थळ शिवनेरी अगदी जुन्नर शहरात आहे. जुन्नरमधे शिरतानाच शिवनेरीचे दर्शन होते. किल्ला तसा फार मोठा नाही. १६७३ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीतील डॉ. जॉन फ्रायर याने या किल्ल्याला भेट दिली होती. त्याने आपल्या साधनग्रंथात, या किल्ल्यावर हजार कुटुंबांना सात वर्षे पुरेल एवढी शिधासामुग्री आहे असा उल्लेख केला आहे. सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने शकांचा नाश केला आणि जुन्नर व येथील सर्व परिसरावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. नाणेघाट हा पुरातन व्यापारी मार्ग आहे. या मार्गावरून फार मोठ्या प्रमाणात वाहतूक चालत असे. यावर नजर ठेवण्यासाठी या मार्गावरील दुर्गांची निर्मिती करण्यात आली. सातवाहनांची सत्ता स्थिरावल्यानंतर त्यांनी येथे अनेक ठिकाणी लेणी खोदवून घेतली. सातवाहनांनंतर शिवनेरी चालुक्य व राष्ट्रकूट या राजवटींच्या सत्तेखाली होता. ११७० ते १३०८ च्या सुमारास यादवांनी येथे आपले राज्य स्थापन केले आणि याच काळात शिवनेरीला गडाचे स्वरूप प्राप्त झाले. इ.स. १४४३ मध्ये मलिक-उल-तुजार याने यादवांचा काळात सेवेत असलेल्या स्थानिक कोळी सरदारांचा पराभव करून किल्ला सर केला. अशा प्रकारे किल्ला बहमनी राजवटीखाली आला. इ.स. १४७० मध्ये मलिक-उल-तुजारचा प्रतिनिधी मलिक महंमद याने किल्ला नाकेबंद करून पुन्हा सर केला. १४४६ मध्ये मलिक महंमदच्या वडिलांच्या मृत्यूनंतर निजामशाहीची स्थापना झाली. पुढे १४९३ मध्ये इथली राजधानी गडावरून अहमदनगरला हलवण्यात आली. इ.स. १५६५ मध्ये सुलतान मूर्तिजा निजामाने आपला भाऊ कासीम याला या गडावर कैदेत ठेवले होते. यानंतर इ.स. १५९५ मध्ये किल्ला व जुन्नर प्रांत मालोजी राजे भोसले यांच्याकडे आला. जिजाबाईंचे वडील जाधवराव यांच्या हत्येनंतर १६२९ मध्ये जिजामाता गरोदर असताना शहाजीने त्यांना ५०० स्वार त्यांच्या सोबत देऊन रातोरात शिवनेरीवर नेले. ‘शिवनेरी गडावर श्रीभवानीमाता शिवाईला जीजाऊने नवस केला जर आपल्याला पुत्र झाला तर तुझें नाव ठेवीन. शके १५५१ शुक्ल नाम संवत्सरे, फाल्गुन वद्य तृतीयेला, शुक्रवारी सूर्यास्तानंतर शिवाजीराजे यांचा जन्म जाला. तारीख होती १९ फेब्रुवारी, इसवी सन १६३०. इ.स. १६३२ मध्ये जिजाबाईने शिवाजीसह गड सोडला आणि १६३७ मध्ये किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला. सन १६३२मध्ये किल्ल्याचे किल्लेदार सिधोजी विश्वासराव हे होते. त्यांच्या कन्येचा विवाह शहाजी पुत्र संभाजी राजे यांचाशी झाला होता. जुन्नर रणसंग्रामात शहाजीपुत्र थोरले संभाजी राजे यांनी पराक्रम केला होता.(इतिहासात दुर्लक्षित युद्ध ) शायिस्ताखानाने जुन्नर जिकलं पण संभाजी राजांच्या अतुलनीय पराक्रमामुळे शिवनेरी जिंकता आले नाही. त्यामुळे जुन्नर मोघलाईत तर शिवनेरी निजामशाहीत अशी परिस्थिती होती. सन १६५० मध्ये मोगलांविरूद्ध येथील महादेव कोळ्यांनी बंड केले. यांचे नेतृत्व सरनाईक आणि किल्ल्याचे किल्लेदार खेमाजी रघतवान यांनी केले. यात मोगलांचा विजय झाला. पुढे इ.स. १६७३मध्ये शिवनेरीचा किल्लेदार अजीजखान याला फितवून किल्ल्याला माळ लावून सर करण्याचा अयशस्वी प्रयत्न शिवाजी राजांनी केला. शिवरायांच्या उत्तरेकडील मोहिमेवेळी पेशवे मोरोपंत पिंगळे यांनी शिवनेरी घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना यश आलं नाही. शिवरायांना त्यांच्या जीवनात जंजिरा आणि शिवनेरी जिंकता आले नाही अशी नोंद आहे.( पण स्वराज्याचा सीमा ह्या साल्हेर पर्यंत होत्या. त्यामुळे जुन्नर/शिवनेरी सारखा प्रांत नसणे शंकास्पद आहे. तसेच चावंड, हडसर, जीवधन सारखे किल्ले स्वराज्यात होते. तसेच शंभूराजांवेळी औरंगझेबाने रामशेजला वेढा टाकणाऱ्या मोघली सरदारांना जुन्नरवर हल्ला करून ताब्यात घेण्यास सांगितले असे पुरावे आहेत) मोघलाईत शिवनेरीचे अनेक किल्लेदार होते. अजीजखान, फत्तेखान, मुन्शी काझी यासारखे अनेक होते. आबाभट नावाच्या व्यक्तीने धर्मांतर करून मोघलाईत प्रवेश केला.[ संदर्भ हवा ] औरंगझेबाने त्याला शिवनेरीचा किल्लेदार म्हणून नेमले. यातील अजीजखान हा पराक्रमी होता. इ.स. १६७८ मध्ये जुन्नर प्रांत लुटला गेला आणि मराठ्यांनी किल्ला घेण्याचा परत एकदा प्रयत्न केला, मात्र अपयश पदरात पडले. पुढे ३८ वर्षांनंतर १७१६ मध्ये शाहूमहाराजांनी किल्ला मराठेशाहीत आणला व नंतर तो पेशव्यांकडे हस्तांतरित करण्यात आला. Songs used in this video are taken from yo utube studio and belongs to their copyright holders and not to me songs used - cavelry- by gandhi Jungle - by gandhi #shivneri #shivnerifort #marathmolijodi #youtube #travel #maratha #gadkot #शिवजयंती #shivjayanti2026 #marathe #marathi #forts