У нас вы можете посмотреть бесплатно दयानंद कला महाविद्यालयात 'फ्युजन २०२६' राज्य स्तरीय फॅशन शो संपन्न- Part-08 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
दयानंद शिक्षण संस्था अंतर्गत दयानंद कला महाविद्यालय, लातूर येथील फॅशन आणि ड्रेस डिझाईन विभागाच्या वतीने भव्य व दिमाखदार ‘फ्युजन २०२६’ राज्यस्तरीय फॅशन शो स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. संगिता लोहाटी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी डॉ. पद्मा तोष्णीवाल-बियाणी , परीक्षक वसुधा माने, श्रद्धा सोनटक्के (बेंगरुळु ), संस्थेचे सदस्य विशालजी अगरवाल , प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, उपप्राचार्य डॉ. दिलीप नागरगोजे, पर्यवेक्षक डॉ. प्रशांत दीक्षित , IQAC समन्वयक डॉ. संतोष पाटील, स्मिता , देवकन्या मंत्री, निकिता भार्गव , शांता जैन, जयमाला गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. २२ महाविद्यालयांतील २६० युवकांचा सहभाग महाराष्ट्रातील २२ महाविद्यालयांमधील २६० युवक-युवतींनी स्पर्धेत सहभाग नोंदविला. विविध फॅशनमधून पार पडलेल्या या स्पर्धेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कार्यक्रमात दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमणजी लोहाटी व सचिव रमेशजी बियाणी विद्यार्थी यांनी शुभेच्छा दिल्या. १५ वर्षांपासून दिले जातेय शिक्षण; विजेत्यांना बक्षीस • फॅशन आणि ड्रेस डिझाईन विभाग मागील १५ वर्षांपासून बी. ए. व एम.ए. वर्गासाठी शिक्षण देत आहे, अनेक विद्यार्थी यशस्वी उद्योजक म्हणून कार्यरत आहेत. • स्पर्धेत प्रथम पारितोषिक ११,००० रुपये, द्वितीय ९,००० रुपये, तृतीय ५,००० रुपये देण्यात आले. • तसेच प्रत्येक थीमनुसार प्रथम १,०००, द्वितीय ७०० व तृतीय ५०० रुपये अशी एकूण २५ बक्षिसे, ट्रॉफी व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. • सूत्रसंचालन डॉ. मीना धुमे व प्रा. सविता कोतावर यांनी केले.