У нас вы можете посмотреть бесплатно सोंडाई किल्ला.. मुंबई जवळील एक अपरिचित किल्ला🚩🚩 | Sondai Fort..Best Family Trekking Fort Near Mumbai или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Facebook / mangesh.mane.9083 Instagram - / _mangesh_mane 𝗗𝗜𝗦𝗖𝗟𝗔𝗜𝗠𝗘𝗥 : Some contents are used for educational purposes under fair use. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, Allowance is made for " Fair Use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non- Profit, education, or personal use tips the balance in favor of fair use. All Credit for copyright material used in video goes to the respected owner. कर्जतच्या आसपास कोथळीगड, भिवगड, सोनगिरी, इरशाळगड, राजमाची, ढाक इ. अनेक परिचित आणि अपरिचित किल्ले आहेत. ह्या किल्ल्यांच्या मांदियाळीत एक छोटा आणि आटोपशीर असलेला सोंडाई किल्ला लपून बसला आहे. सोंडाई किल्ल्यावर सोंडेवाडी किंवा वावर्ले या दोन पायथ्याच्या गांवातून जाता येते. वावर्ले गांवातून किल्ल्यावर जाणारी वाट थोडी कठीण आणि वेळखाऊ (२-३ तास) असल्यामुळे बरेच जण सोंडेवाडी येथून किल्ल्यावर जातात. सोंडेवाडी गांव उंचीवर वसलेले असल्यामुळे जास्त चढावे लागत नाही आणि गांवापर्यंत चांगला रस्ता असल्यामुळे रिक्षा, टमटम किंवा स्वतःची गाडी घेऊन अगदी गांवापर्यंत पोहोचता येते. सोंडेवाडीतून किल्लावर जाणारी पायवाट चांगली मळलेली आहे. पहिल्यांदाच जाणार असाल तर गावातून वाटाड्या आवर्जून घेणे. साधारणपणे १५ मिनिटांत आपण पहिल्या पठारावर पोहोचतो. ह्याच पठारावर वावर्ले गांवातून येणारी वाट येऊन मिळते. दोन्ही वाटा एकत्र मिळाल्यानंतर किल्ल्याकडे जाणारी वाट डावीकडे वळते. वाटेवर दगडात खोदलेल्या पायऱ्या लागतात. ह्या वाटेने दुसऱ्या पठारावर जाताना एक छोटाशा कातळटप्पा (१०-१५ फुटांचा) पार करावा लागतो. ह्या कातळावर एकावेळी फक्त एकच पाउल ठेवायची जागा आहे आणि उजव्या हाताला दरी असल्यामुळे हा टप्पा फार काळजीपूर्वक पार करायचा. कातळटप्पा पार केल्यानंतर आपण दुसऱ्या टप्प्यावर पोचतो. पहिल्या पठारावरून साधारणपणे १५-२० मिनिटांमध्ये आपण दुसऱ्या पठारावर पोहोचतो. पठारावर कातळात खोदलेले पाण्याचे जोडटाके आहे. ह्या टाक्यात वर्षभर पाणी असले तरी उन्हाळ्यात पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे पाणी काढण्यासाठी दोरीचा वापर करावा लागतो. किल्ल्याच्या माथ्यावर सोंडाईदेवीचे स्थान असल्यामुळे माथ्यावर जाण्यासाठी गावकऱ्यांनी लोखंडी शिडी लावलेली आहे. लोखंडी शिडीच्या जवळच कोरडे पाण्याचे टाके आहे. सर्वोच्च ठिकाणी देवीचे स्थान असल्यामुळे माथ्यावर पादत्राणे घालून जाता येत नाही. लोखंडी शिडीच्या सहाय्याने कातळटप्पा चढून गेल्यानंतर उजव्या बाजूला खांबटाके आहे. परंतु ह्या टाक्यातील पाणी पिण्यायोग्य नाही. गडमाथा फार छोटा असून माथ्यावर असलेल्या झाडाखाली सोंडाई देवी आणि अजून एका देवतेची मूर्ती आहे. माथ्यावरून माथेरान डोंगर, इरशाळगड, मोरबे व वावर्ले धरण, कर्जत-चौक रस्ता, कर्जत शहर आणि आजुबाजूचा विस्तीर्ण परिसर दिसतो. किल्ला आणि माथ्यावर जाण्यासाठी लावलेली शिडी पाण्याचे जोडटाके सोंडाई देवी किल्ल्यावरून दिसणारे कर्जत शहर माथेरान आणि त्याच्यामागे प्रबळगड वावर्ले गांव आणि धरण मोरबे धरण आणि उजवीकडे इरशाळगड किल्ल्यावर टाक्यांशिवाय इतर कोणतेही अवशेष नसल्यामुळे किल्ला बघायला जास्त वेळ लागत नाही. तटबंदी, प्रवेशद्वार आणि इतर वास्तूंचा अभाव, किल्ल्याचा मागे असलेला उंच डोंगर ह्यांच्यावरून सोंडाई किल्ल्याचा मुख्य उपयोग टेहळणीसाठी आणि आजुबाजुच्या परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी केला जात असावा. किल्ला बघून झाल्यानंतर पुन्हा सोंडेवाडीत उतरायचे किंवा नवीन वाटेचा अनुभव घ्यायचा असेल तर दुसऱ्या वाटेने वावर्लेत उतरायचे. वावर्लेतून कर्जतला येण्यासाठी टमटम मिळतात. टेहळणीचे ठिकाण असलेला सोंडाई किल्ला एका दिवसाचा ट्रेक करण्यासाठी चांगला पर्याय आहे. सूचना: सुरक्षित भटकंती करा. एकट्याने ट्रेकला जाण्याचे धाडस करू नका. ट्रेकिंगला जाताना कमीतकमी ३-४ जणांच्या ग्रुपने जा. ट्रेकिंगला कुठे जात आहात ते घरात सांगून ठेवा. वाट माहिती नसल्यास गांवातून वाटाड्या बरोबर घ्या. मळलेल्या वाटेवरूनच जा, अनोळखी वाटेने जाण्याचे धाडस करू नये.... information copy by Pankaj blog #सोंडाईकिल्ला #SondaiKilla #Ghodekarfamily #Mangeshmane