У нас вы можете посмотреть бесплатно महाराष्ट्र विधिमंडळ हिवाळी अधिवेशन ; सन २०२५-२६ पुरवणी मागण्या или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
महाराष्ट्र विधिमंडळ हिवाळी अधिवेशन ; सन २०२५-२६ पुरवणी मागण्या. महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातील सन २०२५-२६ पुरवणी मागण्यांवरील चर्चेत, मतदारसंघातील जनतेच्या विविध प्रलंबित मागण्या, आव्हाने आणि आवश्यक विकासकामांबाबत मी सभागृहात मांडणी केली. मतदारसंघातील युसुफवडगाव, नेकनूर आणि अंबाजोगाई येथील मोडकळीस आलेल्या पोलीस निवासस्थाने आणि पोलीस स्टेशन इमारतींसाठी तातडीने निधी उपलब्ध व्हावा, अशी मी विनंती केली. वाढती लोकसंख्या, विद्यार्थ्यांची संख्या आणि विस्तारती शहरी मर्यादा लक्षात घेता, अंबाजोगाईमध्ये अतिरिक्त पोलीस स्टेशन, तसेच रविवार पेठ आणि लोखंडी सावरगाव येथे नवीन पोलीस चौक्या मंजूर होणे अत्यावश्यक आहे, यावर प्रकाश टाकला. अंबाजोगाई व केज शहरातील व्हीआयपी विश्रामगृहांच्या प्रस्तावांना मंजुरी देऊन निधी उपलब्ध करावा, तसेच वाडी, वस्ती व तांडे भागातील रस्त्यांना मार्ग क्रमांक देऊन त्यांचे मजबुतीकरण व डांबरीकरण तातडीने करावे, अशी मागणी केली. केज आणि अंबाजोगाई शहरांत वेगाने वाढणारी वाहतूक व सतत होणारे अपघात लक्षात घेता, दोन्ही राष्ट्रीय महामार्गांच्या जंक्शनवर उड्डाणपूल किंवा रिंग रोडच्या स्वरूपात बायपास मार्गाची तत्काळ मंजुरी मिळावी, हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा सभागृहात अधोरेखित केला. नगरविकास विभागांतर्गत केजचे नगरपालिकेत रूपांतर, नेकनूरचे नगरपंचायतीत रूपांतर, तसेच अंबाजोगाई शहराची हद्दवाढ हे प्रस्ताव शासनस्तरावर प्रलंबित आहेत. या सर्व प्रस्तावांना तत्काळ मंजुरी मिळावी, अशी ठाम मागणी केली. सेवानिवृत्त नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या थकीत देय रकमा संचित पोर्टलवरून मंजूर करून निधी उपलब्ध करण्यात यावा, अशी मागणी केली. मतदारसंघातील जलजीवन मिशनची कामे रखडल्यामुळे निर्माण झालेली पाणीटंचाईची गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन, या कामांना तातडीची गती देऊन नागरिकांना नियोजनबद्ध आणि सुरळीत पाणीपुरवठा उपलब्ध व्हावा, अशी मी विनंती केली. सभागृहात मांडलेल्या या सर्व मागण्यांना शासनाने गांभीर्याने विचार करून जनहिताचे निर्णय निश्चित घेतले जातील असा विश्वास वाटतो. #महाराष्ट्रविधिमंडळ #हिवाळीअधिवेशन२०२५ #पुरवणीमागण्या #जनहिताचेप्रश्न #मतदारसंघविकास #अंबाजोगाई #केज #नेकनुर #युसुफवडगाव #पोलिसनिवासस्थान #विकासकामे #रस्तेविकास #नगरविकास #जलजीवनमिशन #उड्डाणपूलमागणी #namitamundada