У нас вы можете посмотреть бесплатно रायरेश्वर किल्ला-पठार l Raireshwar fort l छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य शपथ सोहळा l YUVA TREKKER I или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
रायरेश्वर किल्ला-पठार l Raireshwar fort l छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य शपथ सोहळा l YUVA TREKKER I #रायरेश्वर किल्ला-पठार# Raireshwar fort#छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य शपथ सोहळा#YUVA TREKKER रायरेश्वर किल्ला.... नमस्कार मित्रांनो.... जय जिजाऊ! जय शिवराय! जय शंभुराजे!!! युवा ट्रेकर या आपल्या मराठी यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. आपण आपल्या या व्हिडिओमार्फत रायरेश्वर किल्ला हा पाहणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी 27 एप्रिल 1645 रोजी रायरेश्वरच्या मंदिरात स्वराज्याची शपथ घेतली. या स्वराज्याच्या कार्यात कान्होजी जेधे, बाजी पासलकर, तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, येसाजी कंक, झुंजारराव मरळ, सूर्याजी काकडे, बापूजी मुदगल , नरस प्रभू गुप्ते, सोनोपंत डबीर इत्यादी सहकारी तसेच बारा मावळातील अनेक सहकारी उपस्थित होते. या हिंदवी स्वराज्य शपथ सोहळ्यात त्यांनी परकीय सत्तेतून मुक्तता मिळून स्वराज्याची स्थापना करण्याची आणि हिंदू संस्कृतीचे रक्षण करण्याचा निर्धार केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या करंगळीच्या बोटातून रक्त अभिषेक शिवपिंडी वरती करून या ठिकाणी शपथ घेतली . रायरेश्वर हा किल्ला पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील किल्ला आहे. या किल्ल्याचे समुद्रसपाटीपासूनची उंची 4589 फूट इतकी आहे. रायरेश्वर हा गिरीदुर्गातील प्रकारातील किल्ला आहे. रायरेश्वर किल्ला हा आपल्याला चढण्यासाठी सोप्या श्रेणीतील किल्ला आहे.पुण्याहून एका दिवसात पाहून येण्यासारखा हा किल्ला आहे. रायरेश्वर किल्ल्यावरती प्राचीन शिव मंदिर हे पांडवकालीन मंदिर आहे. रायरेश्वर किल्ल्यावर आपल्याला पाहण्यासारखे पांडवकालीन शिवमंदिर, सात रंगांची माती,पांडवकालीन लेणी, गोमुख कुंड तसेच किल्ल्यावरती सुंदर सूर्योदय व सूर्यास्त आपल्याला पाहायला मिळतो. रायरेश्वर पठारावरती सुंदर फुले आपल्याला तसेच अनेक औषधी वनस्पती या ठिकाणी पाहायला मिळतात. रायरेश्वर किल्ल्याला जाण्यासाठी पुणे भोर मार्गे तसेच सातारा वाई मार्गे जाता येते. आपली गाडी ही गडाच्या पायथ्यापर्यंत नेण्याची व्यवस्था या ठिकाणी आहे. रायरेश्वर किल्ल्यावरती जननी देवीचे मंदिरही आहे.गडावरती साधारण 40 ते 45 कुटुंब राहतात.हॉटेल शिवशंभू तर्फे आपण या ठिकाणी रात्री टेन्ट मध्ये मुक्काम करू शकतो आपली जेवणाची व नाश्त्याची सोय या ठिकाणी होते. आपल्याला रायरेश्वर किल्ल्यावरती विविध प्रकारची फुले ही पाहायला मिळतात. रायरेश्वर पठार हे ऑगस्ट ते नोव्हेंबर या काळात विविध रंगाची फुले उमलतात त्यामुळे संपूर्ण रायरेश्वर पठारावरती फुलांचा गालिचा पसरलेला दिसतो. या पठारावरती दहा ते पंधरा प्रकारची फुले दिसतात. संपूर्ण रायरेश्वर पठार आपल्याला फिरण्यासाठी चार ते पाच तास इतका वेळ हा आपल्याला लागतो. संपूर्ण रायरेश्वर पठाराची लांबी सुमारे 12 km आहे. तर रुंदी 1.5 km इतके आहे.आपणही आपल्या व्हिडिओ मार्फत संपूर्ण रायरेश्वर किल्ल्याची माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपला व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.धन्यवाद.... 🙏🙏🙏🙏🙏🙏