У нас вы можете посмотреть бесплатно शिवास कोणते बिल्वपत्र अर्पण करावे? | Aniruddha Bapu | महाशिवरात्र или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
दि. २६ फेब्रुवारी २०२६ हा नंदीपक्षातील शेवटचा गुरुवार असल्याने सर्वप्रथम श्रद्धावानांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्यानंतर सद्गुरु अनिरुद्ध बापूंनी, त्यानंतर केलेल्या आपल्या पितृवचनात एका वेगळ्याच विषयाला हात घातला. तंत्रज्ञान जसजसे प्रगत होत चालले आहे, तसतसा त्याचा दुरुपयोगही वाढत चालला आहे. सध्या 'डिजिटल अरेस्ट' ह्या प्रकाराचा सगळीकडे बोलबाला आहे. ह्याबद्दलच्या अर्धवट माहितीने सुशिक्षित समाजामध्येही ह्याबाबत धास्तीचे वातावरण आहे. सद्गुरु बापूंनी गुरुवारच्या पितृवचनाची सुरुवात ह्याच मुद्याने केली. 'डिजिटल अरेस्ट' नावाचा प्रकार संवैधानिक दृष्ट्या अस्तित्वातच नसून, उलट तो बेकायदेशीर व 'स्कॅम'च आहे. त्यामुळे असा प्रकार घडला तर घाबरून जाऊ नका, असे सांगून बापूंनी श्रद्धावानांना आश्वस्त केले व त्या अनुषंगाने, महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस ह्यांचे ह्यासंदर्भातील विधानसभेतील निवेदनही सद्गुरु बापूंनी ऐकवले. अध्यात्ममार्गात यायचे ते घाबरट बनण्यासाठी नाही, तर भीती कायमची नष्ट करण्यासाठी, असे ठाम प्रतिपादन बापूंनी केले. आता कोणी विचारेल की आज बापूंनी पितृवचनात अर्थात अध्यात्मात हे काय मध्येच सुरू केले, तर इथे बापूंनी ह्या आक्षेपाला सडेतोड उत्तर देत, अध्यात्म म्हणजे केवळ देवाचे नाव घेणे, पूजापाठ करणे नव्हे असे सांगून, 'अध्यात्माचा आपल्या रोजच्या जीवनाशी कसा जवळचा संबंध आहे आणि अध्यात्माचे नक्की ध्येय काय', ते स्पष्ट केले. शिवाची उपासना करण्यासाठी कुठल्याही कर्मकांडाची आवश्यकता नाही, कारण तो 'पशुपतिनाथ' आहे. त्यामुळेच आपण आपल्या आयुष्याची दोरी त्याच्याच हाती सोपविली पाहिजे, असे बापूंनी ह्यावेळेस सांगितले. त्याचबरोबर, शिवलिंगाबद्दल पसरवल्या जाणाऱ्या चुकीच्या संकल्पना सद्गुरु बापूंनी ह्यावेळी खोडून काढल्या, तसेच 'हरि' आणि 'हर' ह्यांच्यातील अ-द्वैत आध्यात्मिक ग्रंथांतील दाखल्यांच्या सहाय्याने स्पष्ट केले. शेवटी नंदीपक्षाच्या निमित्ताने सद्गुरु बापूंनी श्रद्धावानांकडून 'बं बं भोलेनाथ डं डं भूतनाथ' हा गजर करून घेतला व श्रद्धावानांनी शिवास कोणते बिल्वपत्र अर्पण केले पाहिजे ते सांगितले. #AniruddhaBapu #DigitalArrest #mahashivaratri Courtesy of video on Digital Arrest - / @bestofdevendrafadnavis ©℗ ---------------------------------- Join the WhatsApp Channel - https://whatsapp.com/channel/0029Vb9c... For more information about Sadguru Shree Aniruddha (Bapu) - Aniruddha Devotion Sentience site - https://aniruddha-devotionsentience.com/ Samirsinh Dattopadhye blog - https://sadguruaniruddhabapu.com Watch live events - https://www.aniruddha.tv Know more about the Devotional Services carried out under the guidance of Sadguru Shree Aniruddha (Bapu) - http://www.aniruddhasadm.com https://aniruddha-aadeshpathak.com ----------------------------------