У нас вы можете посмотреть бесплатно राजयोग शिक्षणासाठी वडजी ता. भडगाव येथे ब्रह्माकुमारीज् अध्यासन केंद्राचे उदघाटन или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#BkJalgaonSubZone #Brahmakumaris #mountabu राजयोग शिक्षणासाठी वडजी ता. भडगाव येथे ब्रह्माकुमारीज् अध्यासन केंद्राचे उदघाटन परीसरातील नागरीत घेतील प्राचिन सहज राजयोग ध्यानाभ्यासाचे लाभ वडजी : प्रतिनिधी आध्यात्मिक व नैतिक मूल्यांच्या प्रसारासाठी तसेच भारतीय प्राचीन सहज राजयोगाच्या अभ्यासासाठी Brahma Kumaris संस्थेच्या वतीने वडजी (ता. भडगाव) येथे नव्याने उभारण्यात आलेल्या “ब्रह्माकुमारीज राजयोग पाठशाळा” अध्यासन केंद्राच्या इमारतीचे भव्य उद्घाटन उत्साहात संपन्न झाले. या केंद्राच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांना प्राचीन सहज राजयोग ध्यानाभ्यासाचा लाभ घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे. या अध्यासन केंद्रामध्ये आध्यात्मिक शिक्षण, राजयोग ध्यान प्रशिक्षण, गीता अध्ययन तसेच नैतिक मूल्यांवर आधारित विविध उपक्रम नियमितपणे राबविण्यात येणार आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये आध्यात्मिक जागरूकता वाढवणे, सकारात्मक विचारसरणी विकसित करणे आणि संस्कारमूल्यांची जपणूक करणे या उद्देशाने हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. सदर अध्यासन केंद्राचे उद्घाटन राजयोगीनी ब्रह्माकुमारी मीनाक्षी दीदीजी (सबझोन इंचार्ज, जळगाव), ब्र. कु. मिरादीदी (पाचोरा) तसेच जळगाव उपक्षेत्रातील वरिष्ठ ब्रह्माकुमारी बहिणींच्या प्रमुख उपस्थितीत झाले. या प्रसंगी ब्रह्माकुमारीज् मुख्यालय आबू पर्वताहून संस्थेचे महासचिव राजयोगी ब्रह्माकुमार करुणाभाईजी आणि वरिष्ठ राजयोग शिक्षिका ब्रह्माकुमारी उषादीदीजी यांनी ऑनलाइन माध्यमातून विशेष शुभेच्छा देत या उपक्रमाचे कौतुक केले. उदघाटन कार्यक्रमात सहभागी मान्यवर कार्यक्रमास परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यामध्ये मा. बाळासाहेब प्रदीपराव गुलाबराव पाटील (माजी जिल्हा परिषद सभापती, बांधकाम व आरोग्य विभाग), जिबुसो राजेंद्र महादू पाटील (माजी नगराध्यक्ष, भडगाव), अभिमन सिताराम पाटील (माजी सभापती, पंचायत समिती भडगाव), आप्पासो संजय श्रावण पाटील (माजी जिल्हा परिषद सदस्य, जळगाव), युवराज धोंडू सूर्यवंशी (माजी विकास सोसायटी चेअरमन, वडजी), नानासो सुभाष कौतिक पाटील (माजी सरपंच, वडजी), कैलास रामदास पाटील (माजी उपसरपंच, वडजी), नारायण हिम्मत पाटील (माजी विकास सोसायटी चेअरमन, वडजी), डी. वाय. पाटील (माजी सरपंच, वडजी), रामकृष्ण अभिमन पाटील (माजी सभापती, पं. स. भडगाव), सौरव राजेंद्र पाटील (जिल्हा बुथ प्रमुख, शिवसेना जळगाव) तसेच प्रदीप भिकन पाटील (तालुका सरचिटणीस, भाजप भडगाव) यांचा समावेश होता. माऊंट आबूहून उपस्थित मान्यवर याशिवाय ब्रह्माकुमारीज् मुख्यालय, आबू पवर्त (आबूराज) येथून बी.के. विलासभाई (दादी कॉटेज), बी.के. ईश्वरभाई (डायमंड हाउस), बी.के. दत्तूभाई (ट्रॉमा सेंटर), बी.के. विलासभाई (पांडव भवन), बी.के. पप्पूभाई (ग्लोबल हॉस्पिटल), बी.के. संदीपभाई (ज्ञान सरोवर किचन भंडारा), बी.के. कैलाशभाई (आनंद सरोवर) तसेच ब्रह्माकुमारी सविता बहन (शांतीवन) यांनीही कार्यक्रमासाठी शुभेच्छा व सहकार्य दिले. कार्यक्रमाचे नियोजन प्रकाश पाटील, रामकृष्ण पाटील, भूषण पाटील, बी.के. ईश्वर पाटील आणि बी.के. ज्ञानेश्वर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या नव्या अध्यासन केंद्रामुळे वडजी आणि परिसरातील नागरिकांना राजयोग ध्यान, आध्यात्मिक शिक्षण आणि नैतिक मूल्यांवर आधारित जीवनशैलीचा लाभ घेता येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. क्षणचित्रे : परीसरातील नागरीकांना मिळणार प्राचिन राजयोगाचे धडे भारतीय प्राचिन परंपरा आणि आध्यात्मिकतेवर मार्गदर्शन राजयोग वर्ग, ध्यानकक्ष आधुनिक सोईसह नागरीकांच्या सेवेस ग्रामीण परीसरातील युवकांना समूपदेशन सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी उपक्रमाचे केले कौतुक मराठी वृत्त सेवा ✍️डॉ. सोमनाथ वडनेरे महाराष्ट्र राज्य समन्वयक मीडिया प्रभाग माउंट आबू 9850693705 www.bkmahamedia.com