У нас вы можете посмотреть бесплатно Modern Highschool Sakharale SSC 1997 Batch Get Togather 2022 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
मॉडर्न हायस्कूल, साखराळे इयत्ता दहावी, बॅच 1997, शिक्षक कृतज्ञता व विद्यार्थी स्नेह मेळावा, दिनांक 28 ऑक्टोबर 2022 दहावी झाल्यानंतर सर्व विद्यार्थी मित्र मॉडर्न हायस्कूल मधून बाहेर पडले. प्रत्येकाने आपापल्या वेगवेगळ्या वाटा ठरवून त्या दिशेने वाटचाल सुरू केली. सन 1997 ते सन 2022, जवळपास 25 वर्षानंतर एकाच वेळी काही अपवाद वगळता जवळपास (50 विद्यार्थी 30 विद्यार्थिनी व 30 शिक्षक) सर्व वर्गमित्र - मैत्रिणी एकमेकांना भेटत होतो. सर्वांना खूप आतुरता होती या दिवसाची... स्नेह मेळावा आयोजित करण्यासाठी हिरीरीने पुढाकार घेऊन सर्व नियोजन करणाऱ्या मित्रांना हा स्नेह मेळावा यशस्वी होईल का? किती मित्र-मैत्रिणी येतील? याबद्दल शंका होती. तरीही खूप चांगल्या पद्धतीने हा स्नेह मेळावा पार पडला. विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांची उपस्थिती खूपच उल्लेखनीय होते. कारण या स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने शिक्षकही अनेक वर्षांनी एकमेकांना भेटत होते. अनेक वर्षानंतर एकमेकांना भेटताना खूप आनंद झाला. प्रत्येकाची परिस्थिती वेगवेगळी असली तरी या स्नेह मेळाव्यासाठी येणारे सगळे मित्र हे एकाच स्तरावर होते. न कोणी मोठा न कोणी लहान. इथे फक्त एकच मैत्रीचे नाते दिसत होते. शालेय जीवनातील महत्त्वाच्या आठवणींना उजाळा मिळाला. विद्यार्थी तसेच शिक्षक यांनी आपली मनोगते व्यक्त केली. स्नेहभोजनाचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमानंतरही सर्व मित्र मैत्रिणींमध्ये औपचारिक रित्या गप्पागोष्टी झाल्या. या स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने पुन्हा एकत्र जुळलेले स्नेहबंध आपल्या पुढील आयुष्यामध्ये असेच अतूट राहतील व सुदृढ होती यासाठी सर्वजण प्रयत्नशील राहतील. पुन्हा एकदा अशा कार्यक्रमाचे लवकरच नियोजन होईल अशी आशा आहे. @ गजेंद्र लोहार,