У нас вы можете посмотреть бесплатно श्री साईबाबा महाविद्यालय शिर्डी Shri Saibaba College Shirdi-योग दिन २०२२ или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
श्री साईबाबा महाविद्यालय शिर्डी Shri Saibaba College Shirdi साईबाबा महाविद्यालयात योग दिन साजरा शिर्डी- संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव आणि प्रशासकीय अधिकारी दिलीप उगले यांच्या मार्गदर्शनाखाली श्री साईबाबा संस्थानच्या श्री साईबाबा महाविद्यालय शिर्डी येथे उच्च शिक्षण संचालक यांचे आदेशान्वये आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून प्राचार्य विकास शिवगजे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना म्हणाले की, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता.संयुक्त राष्ट्रांच्या १९३ देशांपैकी १७५ देशांचे सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठींबा दिला होता.सुरक्षा आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य असलेले अमेरिका, इंग्लंड, चीन, फ्रान्स, रशिया यासारखे देशही या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी आहेत. यावर विस्तृत चर्चा होवून डिसेंबर २०१४ मध्ये या दिनाला मान्यता देण्यात आली.२१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा करण्यात आला. भारतीय धर्म संस्कृतीमधील "योग" संकल्पनेची मांडणी श्रीमदभगवद्गीता ग्रंथात केलेली आहे.याच जोडीने भगवान पतंजली मुनी यांनी आपल्या योगसूत्राद्वारे मानवाच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकासाची संकल्पना स्पष्ट केली आहे. याद्वारे आध्यात्मिक उन्नतीही साधता येते असे पातंजल योगसूत्र ग्रंथात सांगितले आहे.जगभरातून स्वीकारले गेलेले भारतीय संस्कृतीतील योगाचे महत्त्व अधोरेखित होण्याचे प्रयत्न या दिवसाच्या निमित्ताने होते. यावर्षीच्या योग दिनाची थीम ‘ योगा फॉर ह्युमानिटी‘ आहे, असेही प्राचार्य शिवगजे यांनी यावेळी सांगितले. यावेळी क्रीडा संचालक डॉ. विक्रम सातपुते यांनी योग प्रात्यक्षिके सादर केली. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, सर्व प्राध्यापक उपस्थित होते. प्रा.मुबिन शेख यांनी प्रास्ताविक केले. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.संतोष औताडे यांनी आभार मानले.