У нас вы можете посмотреть бесплатно युवा दर्पण लाईव्ह बातमीपत्र:18/2/26; महादेव मुंडे प्रकरणी वाल्मीक कराडसह मुलाच्याही अडचणी वाढल्या или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
दिनांक 17 2 2026 रोजी बीड एलसीबी पथकाला गुप्त माहिती मिळाल्यावरून युसूफ वडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत मौजे सातेफळ येथे बन्सी महादेव घाडगे यांच्या गट नंबर 127 मधील शेतात एलसीबीचे PI श्री शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने जाऊन छापा मारला असता कांद्याच्या पिकामध्ये बेकायदेशीर रित्या दहा गुंठे जमिनीमध्ये अफूचे पीक लावल्याचे आढळून आले, सदर पिक हे अफू असल्याचे कृषी अधिकारी यांनी खात्री केली असून सदर ठिकाणी छापा मारून जवळपास 13 किलो 260 ग्रॅम वजनाच्या अफूची झाडे किंमत 3 लाख 31 हजार 500 रुपये जप्त करून यातील आरोपी बन्सी महादेव घाडगे राहणार सातेफळ तालुका केज याच्याविरुद्ध युसुफवडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पुढील तपास वडगाव पोलीस हे करत आहेत, सदरची कामगिरीही पोलीस अधीक्षक श्री नवनीत काँवत, अप्पर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई श्रीमती चेतना तिडके, एलसीबी चे पी आय श्री शिवाजी बंटीवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय महेश विघ्ने, पोलीस हवालदार दिलीप गीते, महेश जोगदंड, दीपक खांडेकर, भागवत शेलार, विकास राठोड, गणेश मराडे व पोलीस ठाणे वडगाव येथील एपीआय शेंडगे, पीएसआय मांजरे, डोंगरे यांनी मिळून केली. बीड जिल्हा पोलिसांच्या वतीने अमली पदार्थांबाबत माहिती देण्यासाठी,NDPS कक्ष प्रमुख एपीआय रत्नाकर घोळवे यांच्या 88 88 82 41 00 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा तर माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल असे आवाहन करण्यात आले आहे.