У нас вы можете посмотреть бесплатно मराठी भाषा पुरस्कार सोहळ्यात डॉ. दीपक पवार यांनी व्यक्त केलेले मनोगत. или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
आमच्या कार्यात सहभागी व्हा लिंक : https://tinyurl.com/mw3xt6tk मराठी अभ्यास केंद्राचे २०२४ चे भाषा पुरस्कार जाहीर तारीख : ०१ मार्च २०२६ वेळ : सकाळी १० वा. स्थळ : शाहू सभागृह, शिवाजी मंदिर, दादर मराठी अभ्यास केंद्राच्या कार्यालयाचा पत्ता : मराठी अभ्यास केंद्र, खोली क्र ४, पहिला मजला, श्री शिवाजी मंदिर, न. चिं. केळकर मार्ग, दादर (प), मुंबई ४०००२ मराठी भाषा, शिक्षण आणि माध्यम क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या चार मान्यवरांना ‘मराठी अभ्यास केंद्र’ या संस्थेतर्फे २०२४ सालचे विविध पुरस्कार जाहीर झाले आहेत. अनंत पांडुरंग देशपांडे, मधुरा राजवंशी, राजेंद्र साठे आणि छाया चंद्रकांत गाडे यांची यासाठी निवड करण्यात आली आहे. या पुरस्कारांचे वितरण रविवार, १ मार्च रोजी सकाळी १० वाजता दादर येथील शिवाजी मंदिरातील शाहू सभागृहात होणार असून, पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम व मानपत्र असे आहे. ‘अधिवक्ता शांताराम दातार आणि रविंद्र सुर्वे मराठी भाषा आग्रही पुरस्कार’ ज्येष्ठ विज्ञान प्रसारक अनंत पांडुरंग देशपांडे यांना जाहीर झाला आहे. अभियांत्रिकी क्षेत्रातील दीर्घ सेवेनंतर त्यांनी मराठीतून विज्ञान प्रसारासाठी अनेक दशके अखंड कार्य केले आहे. विज्ञानाच्या संकल्पना मातृभाषेतून शिकल्यास विद्यार्थ्यांना लवकर स्पष्ट होतात. यासाठी मराठी विज्ञान परिषदेसह विविध संस्थांमध्ये त्यांनी नेतृत्व केले असून, विज्ञान विषयावर हजारो लेख, शेकडो व्याख्याने, आकाशवाणी- दूरदर्शनवरील कार्यक्रम तसेच अनेक पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर विज्ञान प्रसाराचे कार्य त्यांनी सातत्याने केले आहे. ‘जयवंत चुनेकर प्रयोगशील मराठी शिक्षक पुरस्कार’ मधुरा राजवंशी यांना प्रदान करण्यात येणार आहे. फलटण येथील कमला निंबकर बालभवन या प्रयोगशील शाळेत त्या गेली १५ वर्षे कार्यरत असून इंग्रजी व लैंगिकता शिक्षण विषयांचे अध्यापन करतात. टाटा सामाजिक विज्ञान संस्थेतून त्यांनी प्राथमिक शिक्षण विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. २०२३-२४ मध्ये त्यांना ‘फुलब्राइट डिस्टिंग्विश्ड अवॉर्ड्स इन टीचिंग’ ही आंतरराष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळाली. ग्रामीण मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी शिक्षण सर्जनशील आणि जीवनाभिमुख करण्यासाठी त्यांनी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत. ‘दिनू रणदिवे मराठीस्नेही माध्यमकर्मी पुरस्कार’ ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र साठे यांना जाहीर झाला आहे. गेली ३६ वर्षे वृत्तपत्र, दूरदर्शन आणि डिजिटल माध्यमांमध्ये त्यांनी संपादक व विश्लेषक म्हणून काम केले आहे. ‘सकाळ’, ‘लोकसत्ता’, ‘महाराष्ट्र टाइम्स’ आदी वृत्तपत्रांपासून ते इटीव्ही मराठी व इटीव्ही भारतपर्यंत विविध माध्यमांत त्यांनी नेतृत्व केले. संपादकीय लेखन, अग्रलेख, राजकीय विश्लेषण आणि पत्रकार घडविण्याच्या कार्यात त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. ‘अशोक नाना चुरी आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार’ छाया चंद्रकांत गाडे यांना प्रदान करण्यात येणार आहे. पुण्यातील शिक्षणानंतर त्यांनी विश्रांतवाडी मिल्ट्री स्कूल, अहिल्यादेवी शाळा तसेच मुंबईतील पार्ले टिळक विद्यालयात तब्बल ३७ वर्षे सेवा बजावली; त्यापैकी सहा वर्षे मुख्याध्यापिका म्हणून कार्य केले. उपक्रमशील, विद्यार्थीप्रिय व मातृभाषा शिक्षणाबाबत जागरूक शिक्षिका म्हणून त्यांची ओळख आहे. निवृत्तीनंतरही मराठी बालवाडी, अभ्यासवर्ग व पालकशाळा उपक्रमांद्वारे त्या कार्यरत आहेत. मराठी भाषा, शिक्षण आणि माध्यम क्षेत्रात सातत्याने व परिणामकारक काम करणाऱ्या या मान्यवरांचा सन्मान करून ‘मराठी अभ्यास केंद्र’तर्फे त्यांच्या कार्याला गौरविण्यात येणार आहे. #महाराष्ट्रधर्म #मराठीकारण #मराठीप्रथम