У нас вы можете посмотреть бесплатно Gau Tech पुण्यात 'गौ टेक २०२६' : २० ते २३ मार्च दरम्यान पुण्यातील अॅग्रीकल्चर कॉलेज ग्राउंडवर येथे или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#Pune #cow गौ टेक 2026 आंतरराष्ट्रीय परिषद, प्रदर्शन पुण्यात आयोजित:गौ आधारित उद्योग, तंत्रज्ञान, संशोधनाला जागतिक व्यासपीठ मिळेल पुण्यात 'गौ टेक 2026' या आंतरराष्ट्रीय शिखर परिषद आणि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. 20 ते 23 मार्च 2026 दरम्यान पुण्यातील अॅग्रीकल्चर कॉलेज ग्राउंडवर हा भव्य कार्यक्रम पार पडेल. गौ आधारित उद्योग, विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन आणि नवोन्मेषाला जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या परिषदेचा मुख्य उद्देश आहे. या परिषदेत देश-विदेशातील धोरणकर्ते, शास्त्रज्ञ, उद्योगपती, स्टार्ट-अप्स, गुंतवणूकदार आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत, मेक इन इंडिया आणि व्होकल फॉर लोकल या संकल्पनांना बळकटी देईल. 'गौ टेक 2026' महोत्सवात 300 हून अधिक स्टॉल्स, विविध परिसंवाद, B2B बैठका आणि विदेशी प्रतिनिधींचा सहभाग असेल. भारतीय संस्कृतीत गौमातेला कामधेनू मानले जाते आणि तिच्या उत्पादनांचे केवळ धार्मिकच नव्हे, तर औद्योगिक आणि पर्यावरणीय महत्त्वही मोठे आहे. हा कार्यक्रम भारताच्या 'ब्राऊन रिव्होल्यूशन'ला जागतिक स्तरावर पोहोचवेल. यातून महिलांसाठी रोजगार निर्मिती, स्टार्ट-अप्सना प्रोत्साहन आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचे कार्य केले जाईल. दूध, गौमूत्र, शेण आणि पंचगव्य यांसारख्या गौ उत्पादनांवर आधारित उद्योगांना चालना मिळेल. आयोजनामुळे गौ आधारित उद्योगांना जागतिक गुंतवणूक मिळण्याची शक्यता आहे. 'गौ टेक 2026' हे एक महत्त्वाचे व्यासपीठ बनून भारताला आत्मनिर्भर आणि सुसंस्कृत बनवण्याच्या दिशेने एक ठोस पाऊल टाकेल, अशी अपेक्षा आहे.