У нас вы можете посмотреть бесплатно महाराष्ट्र राज्याची माहिती मराठी / maharashtra state information in marathi или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
महाराष्ट्र हे भारताच्या पश्चिम भागातले एक राज्य आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र भारतातील तिसरे व लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य आहे. महाराष्ट्र हे भारताच्या सर्वांत विकसनशिल राज्यांपैकी एक आहे. महाराष्ट्र राज्याची सीमा गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा, कर्नाटक, गोवा आणि दादरा आणि नगर-हवेली या केंद्रशासित प्रदेशांशी जोडलेली आहे. राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची ७२० कि.मी.ची किनारपट्टी आहे. जवळपास ११ कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. मुंबईत साधारण १.८ कोटी लोक राहतात. नागपूर शहर महाराष्ट्राची उपराजधानी आहे. मध्ययुगीन महाराष्ट्र सातवाहन राजवंश राष्ट्रकूट राजवंश, पश्चिम चालुक्य, मुघल आणि मराठ्यांच्या साम्राज्याचा समावेश आहे. #kuberclasses #maharashtrarajya #maharashtrastate #महाराष्ट्रराज्य विस्तार १, १८, ८०९ चौरस मैल (३,०७, ७१३ चौरस किमी) असून, तो पश्चिम आणि कर्नाटक, तेलंगणा, गोवा, गुजरात, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि दादरा आणि नगर हवेली भारतीय राज्यांना अरबी समुद्र लागून आहे. महाराष्ट्राला जगद्गुरू संत तुकाराम, संत ज्ञानेश्र्वर, संत चोखामेळा, संत एकनाथ, संत नामदेव, संत गाडगेबाबा संत मुक्ताई यासारख्या अनेक महान संतांचा वारसा लाभला आहे, त्यामुळे या राज्यास "संतांची भूमी" असेदेखील म्हणले जाते.पंढरपूर हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. मुंबई भारतातील टॉप शहर असून येथूनच अभिनेते, राजकारणी आणि क्रिकेट खेळाडू तयार होतात. जगात महाराष्ट्राचे नाव गाजविणारे सचिन तेंडुलकर हे क्रिकेट खेळाडू महाराष्ट्रातले आहेत. मुघल साम्राज्याविरुद्ध लढा देऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज याच राज्यातील आहेत.या राज्याला खुप मोठा इतिहास आहे.महाराष्ट्रात शेतकरी वर्ग खुप आहे. राजधानी मुंबई नियामक मंडळ महाराष्ट्र विधानमंडळ कार्यकारी मंडळ महाराष्ट्र विधानसभा अधिकृत भाषा मराठी भाषा राज्यपाल/राष्ट्रपती रमेश बैस (इ.स. २०२३ – ) सरकारचे प्रमुख एकनाथ शिंदे (महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, इ.स. २०२२ – ) स्थापना मे १, इ.स. १९६० सर्वोच्च बिंदू कळसूबाई शिखर लोकसंख्या ११,२३,७२,९७२ (इ.स. २०११) क्षेत्र ३,०७,७१३ ±1 km² मागील बॉम्बे संस्थान Hyderabad State (1948-1956) पासून वेगळे आहे महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य हे भारतीय उपखंडाच्या साधारण पश्चिम-मध्य दिशेलाआहे. महाराष्ट्राची जमीन प्राकृतिकदृष्ट्या एकसारखी (homogeneous) आहे व खूप मोठे क्षेत्र (महाराष्ट्र देश) पठारी आहे. डेक्कन वा दख्खन असे या पठारांना संबोधले जाते. दख्खनचा पठारी प्रदेश विविध नद्यांनी व्यापलेला आहे. महाराष्ट्राच्या पश्चिमेस व अरबी समुद्राला समांतर अशा सह्याद्री पर्वतरांगा (किंवा पश्चिम घाट) आहेत ज्यांची उंची सुमारे २१३४ मी. (अंदाजे ७,००० फूट) आहे. या पर्वतरांगांमधून गोदावरी, नर्मदा आणि कृष्णेसह इतरही अनेक नद्या उगम पावतात. अरबी समुद्राच्या व सह्याद्री पर्वतरांगाच्या मध्ये असलेल्या भागास कोकण म्हणतात. कोकण भागाची रुंदी ५०-८० कि.मी आहे. राज्याच्या उत्तरेस सातपुडा तर पूर्वेस भामरागड-चिरोळी-गायखुरी पर्वतरांगा आहेत. राज्यात मौसमी पाऊस पडतो. महाराष्ट्रातील काळी बेसाल्ट मृदा कापसाच्या लागवडीसाठी उपयुक्त आहे. मुंबईसह पश्चिम महाराष्ट्राचा विकास झाला पण विदर्भ, मराठवाडा व कोकण हे भाग मागास राहिले. महाराष्ट्रातील राजकारणात व नोकरशाहीतही पश्चिम महाराष्ट्राचा अधिक प्रभाव आहे[ संदर्भ हवा ]. राज्याचे २००४ सालचे वार्षिक उत्पन्न (gross state domestic product) १०६ अब्ज अमेरिकन डॉलर इतके आहे. महाराष्ट्र भारताच्या दुसरे सर्वांत जास्त शहरीकरण झालेले राज्य आहे. एकूण राष्ट्रीय औद्योगिक उत्पन्नापैकी १३% महाराष्ट्राचे योगदान आहे. ६४.१४% लोक कृषी व संबंधित उद्योगात रोजगार मिळवतात. एकूण वार्षिक उत्पन्नापैकी (GSDP) ४६% हिस्सा हा कृषी व संबंधित उद्योगातून मिळतो. महाराष्ट्रातील प्रमुख उद्योगधंदे - रासायनिक आणि संबंधित उत्पादने, विद्युत आणि साधी यंत्रे, कापड, पेट्रोलियम आणि तत्सम उद्योग हे आहेत. इतर महत्त्वाचे उद्योगधंदे - धातू उत्पादने, वाईन (द्राक्षापासून तयार केले जाणारे मद्य), दागिने, औषधे, अभियांत्रिकी सामान, यांत्रिक सामान, पोलाद व लोह उद्योग, प्लास्टिक वायर्स. महत्त्वाची पिके- आंबा, द्राक्षे, केळी, संत्री, गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी आणि कडधान्ये. सन २०११ च्या जनगणनेनुसार,महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता ३६५ प्रति चौरस किमी इतकी झाली आहे. सन २००१ मध्ये ती ३१५ इतकी होती. महाराष्ट्र हा भौगोलिक, ऐतिहासिक, धार्मिक, आर्थिक अश्या सर्व दृष्टीने संपन्न आहे. प्रवासासाठी चांगले लोहमार्ग, पक्के रस्ते, चांगली आणि स्वस्त उपाहारगृहे, धर्मशाळा यांची येथे रेलचेल आहे. महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास मंडळाने महाराष्ट्रातील पर्यटन व्यवसायाच्या प्रगतीसाठी प्रयत्न केले असून डेक्कन ओडिसी नावाची विशेष रेल्वे गाडी सुरू केली आहे. लेणी, मुंबई, थंड हवेची ठिकाणे, किल्ले व इतर ऐतिहासिक स्थळांवर मोठ्या प्रमाणात पर्यटक दिसून येतात. #महाराष्ट्रराज्यमाहितीमराठी #maharashtrastateinformationinmarathi #maharashtrarajyachimarathimahiti #maharashtrastatemarathiinformation #महाराष्ट्रराज्याचीमराठीमाहिती #maharashtrarajyamahitimarathi