У нас вы можете посмотреть бесплатно ONE-DAY NATIONAL SEMINAR или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
ONE-DAY NATIONAL SEMINAR ON SUSTAINABLE DEVELOPMENT IN INDIA : BALANCING ECONOMY, SOCIETY AND ENVIRONMENT शाश्वत विकास म्हणजे सर्वांगीण विकास होय : डॉ. यशवंत थोरात कोल्हापूर : आर्थिक विकास हा फक्त अर्थव्यवस्थेशी संबंधित असतो तर शाश्वत विकास हा अर्थव्यवस्था, समाज आणि पर्यावरण यांच्याशी संबंधित असल्यामुळे तो सर्वांगीण विकास आहे असे प्रतिपादन नाबार्डचे माजी चेअरमन डॉ.यशवंत थोरात यांनी केले ते देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेजमध्ये अर्थशास्त्र विभाग आणि विधी विभागाच्या वतीने आयोजित "सस्टेनेबल डेव्हलपमेंट इन इंडिया :बॅलन्सिंग इकॉनॉमी सोसायटी अँड एन्व्हायरमेंट" या विषयावर राष्ट्रीय परिसंवादात बीजभाषक म्हणून ऑनलाईन बोलत होते. ते पुढे म्हणाले, की स्वातंत्र्यानंतर भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे विकास दर वाढत आहे परंतु या वाढीबरोबरच पर्यावरणाच्या समस्याही वाढत आहेत परिणामी भविष्यकालीन पिढ्यांच्यासाठी पर्यावरण नष्ट होण्याचा धोका निर्माण होत आहे त्यामुळे शाश्वत विकास हा सर्वाधिक महत्त्वाचा आहे कारण तो सर्वांगीण विकास आहे. दिल्ली विधी विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. अजय सोनवणे यांनी भारतीय राज्यघटनेतील कलम 21 हे शाश्वत विकासाशी संबंधित आहे असे सांगून वसुधैव कुटुंबकम ही भारतीय संस्कृती आहे त्यामुळे पर्यावरण हे शोषणासाठी नसून संवर्धनासाठी आहे असे प्रतिपादन केले. यावेळी डॉ सोनवणे यांनी पर्यावरणाची रियूज, रिड्यूस, रिफ्युज रिपर्पज,रिसायकलिंग ही पंचसूत्री सांगितली अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ.विश्वनाथ मगदूम म्हणाले की मानवाच्या सर्व गरजा या निसर्गाच्या माध्यमातून पूर्ण होतात त्यामुळे निसर्गाचा विकास म्हणजेच मानव विकास होय आणि हा निसर्गाचा विकास शाश्वत विकासाच्या माध्यमातून पूर्ण होऊ शकतो. दुसऱ्या सत्रात डॉ व्ही. बी. जुगळे म्हणाले की कोणतही देश हा नैसर्गिक भांडवलाचा वापर करून विकासाकडे जात असतो. दारिद्र्य असेल तर विकासाकडे जाता येते परंतु विपुलता असेल या विपुलतेतून विपुलतिकडे जाण्याचा मार्ग हा खडतर असतो हा खडतर मार्ग सोपा करण्याचा एक उपाय म्हणजे शाश्वत विकास होय. यावेळी त्यांनी मानव विकास निर्देशांक ऐवजी भूतान या देशाचे उदाहरण देऊन प्रत्येक देशाने हॅपिनेस इंडेक्स मोजावा असे सांगितले. तिसऱ्या सत्रात शिवाजी विद्यापीठातील अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ .एम एस देशमुख म्हणाले की भारताची अर्थव्यवस्था ही पाच ट्रिलियन डॉलर इतकी होणार आहे. आणि हे ध्येय गाठण्यासाठी सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग देशांमध्ये वाढीला लागणे महत्त्वाचे आहे त्याशिवाय देशातील लोकसंख्या ही लोकसंख्या लाभांश मध्ये रूपांतरित होणार नाही आणि विकसित भारताचे स्वप्न पूर्ण होणार नाही. म्हणून यासाठी शाश्वत विकास महत्त्वाचा आहे. या राष्ट्रीय परिसंवादासाठी कौन्सिल ऑफ एज्युकेशनच्या अध्यक्षा सौ. रजनीताई मगदूम, उपाध्यक्ष डॉ. प्रसाद मगदूम, सचिव डॉ विश्वनाथ मगदूम,सदस्य ॲड.वैभव पेडणेकर,ॲड. अमित बाडकर यांचे मार्गदर्शन लाभले, या परिसंवादामध्ये विविध कॉलेजमधून 151 प्राध्यापक आणि संशोधकांनी नोंदणी केली होती तर 75 संशोधन पेपर सादर करण्यात आली. समारोप समारंभ नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स चे प्राचार्य डॉ उत्तम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. या परिसंवादाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्या डॉ वर्षा मैंदर्गी यानी केले उद्घाटन सत्राचे आभार उपप्राचार्य डॉ आर. एस. नाईक यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. डॉ. एस एस देसाई, डॉ.एन.एच.जाधव आणि प्रा. के.डी दिंडे यांनी करून दिला. दुसऱ्या सत्राचे आभार प्रा.पी.एन.देवळी यांनी मांडले तर समारोप सत्राचे आभार डॉ एस. एफ बोथीकर यांनी मांडले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.आर. जे. बिरजे आणि डॉ. सुरेखा सांगरुळकर यांनी केले. यावेळी प्रा.के.जी. कांबळे, प्रा .डॉ. ए.एस. बन्ने,डॉ.एस.बी.राजमाने, डॉ एस.एस. गवई,डॉ.सुप्रिया चौगले,ग्रंथपाल टी.एल.कांबळे, प्रा के सी.जोशी,प्रा. सोरटे तासगाव महाविद्यालयाचे डॉ.गावडे यांच्यासह विविध महाविद्यालयातील आणि शिवाजी विद्यापीठातील संशोधक विद्यार्थी आणि प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.