У нас вы можете посмотреть бесплатно #malvan или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
👉 मालवणचा प्रत्येक सण-उत्सव शिवकालीन परंपरेच्या धाग्याने जोडला गेला आहे. या उत्सवांपैकी प्रमुख सोहळा म्हणजे मालवणची ग्रामदैवते श्री देव रामेश्वर श्री देव नारायण नारायण पालखी उत्सव होय...! देव रामेश्वर-नारायण देवता आपले राऊळ (मंदिर) सोडून भक्तांच्या भेटीला निघतात. बलिप्रतिपदा दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने होणाऱ्या या सोहळ्यात मालवणसह जिल्हावासीय सहभागी होतात अन हा सोहळा आनंदोत्सव बनतो. या ऐतिहासिक सोहळ्याची भव्यता दरवर्षी वाढत असताना भक्तांची मांदियाळी ग्राम देवतांच्या भेटीला एकत्र येते अन उत्सवाच्या निमित्ताने लाखोंची उलाढाल मालवणच्या बाजारपेठेत होते. देवतांच्या आशीर्वादासोबत लक्ष्मीची पावले घेवून येणाऱ्या या देव श्री रामेश्वर-नारायण पालखी उत्सवात मालवणकरांची दिवाली खऱ्या अर्थाने आनंद सोहळा ठरते. मालवण शहराचे प्रवेशद्वार असलेल्या देऊळवाडा येथील श्री देव रामेश्वर, श्री देव नारायण आपली मंदिरे सोडून पालखीत बसून निघतात. मार्गावरील मंदिरात जाऊन आपल्या बहिण-भावांनाही भेटी देतात. देव भावंडांच्या भेटीचा हा सोहळा अपूर्व असाच असतो. देवतांचे स्वागत मालवणवासीय सडा-रांगोळी, पुष्पवृष्टी, पताका, अतिषबाजी या माध्यमातून सर्वत्र करतात. 👉 साधारण ३५० वर्षापूर्वी छत्रपती शिवरायांनी किल्ले सिंधुदुर्गच्या मोरयाचा धोंडा येथील पायाभरणी समारंभावेळी मालवणच्या ग्रामदेवता श्री देव रामेश्वर-नारायणाची पूजा करताना विधिवत शुद्धीकरण व पुनःप्रतिष्ठापना केली.त्यावेळीपासूनच हा सोहळा सुरु झाला असे जाणकारांतून बोलले जाते. पालखी सोहळा दरवर्षी त्याच मार्गाने आणि किल्ले सिंधुदुर्गच्या साक्षीने मार्गक्रमण करत असताना आपली भव्यता वाढवत जातो. मालवणचा हा पालखी सोहळा भाविक, नागरिक, व्यापारी यांसह लहान-थोर आणि तरुणाई सर्वांसाठी आपलेपणाचा ठरतो. शेकडो वर्षापासून मालवणच्या अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून ज्या मासेमारी व्यवसायाकडे पहिले जाते त्या दर्याचा राजा मच्छिमार बांधवाकडूनही देव रामेश्वर-नारायणाचे होणारे स्वागत परंपरा जोपासत अनोखे असेच असते. समुद्रातील बोट सेवा सुरु असताना प्रमुख बंदरांपैकी एक असलेले मालवण बंदर आणि याला जोडून असलेली मालवण बाजारपेठ. जाणकार आणि इतिहासकारांच्या भाषेत सांगायचे तर 'मालवण बाजारपेठेतून त्याकाळी सोन्याचा धूर निघायचा'. म्हणजेच त्याकाळीलाखोंची उलाढाल व्हायची. मात्र बोट सेवा बंद झाल्यावर मालवणचे वैभव मागे पडले की काय अशी स्थिती निर्माण झाली असताना मासेमारी बरोबरच पर्यटनाने मालवणला साथ दिली. मालवणचे पर्यटन बहरत गेले, त्यामुळे मालवणची वाटचाल पुन्हा संपन्नतेच्या मार्गाने सुरु झाली. मच्छिमार, पर्यटन व्यावसायिक या सोबत मालवण बाजारपेठेतील व्यापारी बांधव व नागरिकांकडून पालखीचे स्वागत मोठ्या उत्साहात, आनंदात जल्लोषात केले जाते. 👉 ग्रामदैवतांची मार्गक्रमणा... मालवणची ग्रामदेवता श्री देव रामेश्वर व श्री देव नारायण बुधवार २२ ऑक्टोबर २०२५ रोजी पालखी सोहळ्याच्या निमित्ताने राऊळ सोडून परंपरेनुसार मालवणवासीयांच्या मार्गावरील रस्ते फुलून जातात, रोषणाईने दुकाने घरे सजून जातात. देव रामेश्वर नारायण भेटीला येतात अन आनंदाची उत्साहाची उधळण सर्वत्र करतात. असा ऐतिहासिक सोहळा मालवणवासीयांसाठी अमूल्य ठेवाच ठरला आहे. भेटीला निघत आहेत. रामेश्वर मंदिर येथून दुपारी एक वाजता देवी पावणाई, देवी भावई, देवी सातेरी देवतांना सांगणे करून पालखी गाव प्रदक्षिणेसाठी मार्गस्थ होते. आडवण, तानाजी नाका, देव भूतनाथ मंदिर येथून पुढे समुद्रीमार्गे मोरेश्वर (मोरयाचा धोंडा), दांडेश्वर मंदिर, श्री काळबादेवी मंदिर, जोशी मांड, येथून बाजारपेठ रामेश्वर मांड येथे पालखी रात्री दर्शनासाठी थांबते. हजारो भाविकांची उपस्थिती यावेळी होती. त्यानंतर रात्री बाजारपेठ, भरड, देऊळवाडामार्गे पुन्हा पालखी मंदिरात जाते. देवस्थान मंडळी व भाविक यांच्या मेळ्यांबरोबरच ढोल-ताशाच्या गजर, फटक्यांची आतषबाजी अशा आनंद सोहळ्यात मालवणवासीय न्हाऊन निघतात. माहिती संकलन- ✒️ पत्रकार श्री.अमित खोत,मालवण ९४०४४५७७८८