У нас вы можете посмотреть бесплатно Asawa Fort | पालघर जिल्ह्यातील हा किल्ला आपले दुर्गपणाचे अवशेष संभाळात आजही ताठ मानेने उभा आहे.🚩 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
किल्ले असावा- बहुतेकांना अपरिचित , पण सुंदरसा ,सुखद अनुभव देणारा ,मुंबई ठाण्याहून एका दिवसात करता येईल असा हा छोटेखानी किल्ला . (प्राचीनकाळी शूर्पारक, डहाणू , तारापूर, श्रीस्थानक/ स्थानकीय पत्तन (ठाणे), कालियान (कल्याण) इत्यादी बंदरातून मोठ्या प्रमाणात परदेशांशी व्यापार होत. या बंदरात उतरणारा माल विविध मार्गांनी देशावर जात असे. या मार्गांवर लक्ष ठेवण्यासाठी व संरक्षणासाठी किल्ले बांधले जात. यापैकीच एक आसावा किल्ला डहाणू व तारापूर बंदरांना देशाशी जोडणार्या मार्गांवर प्राचीन काळी बांधण्यात आला. ठाणे जिल्ह्यातील बोइसर हे एक महत्वाचे ठिकाण आहे . बोईसर ला उतरून , पुढे पाच दहा मिनिटे रस्त्याने चालत गेल्यास नवापूर येथे वारंगडे साठी दहा आसनी जीप मिळते . ती आपल्याला १५-२० मिनटा मध्ये विराज FACTORY च्या आधी आणून सोडते . तिथेच विराज FACTORY च्या आधी उजवीकडे वळणाऱ्या डांबरी रस्त्याने गडाकडे जाणारी वाट मिळते . गडाच्या माथ्यावर कातळात खोदलेली २ टाकी आहेत. किल्ल्याच्या दक्षिण टोकाला प्रचंड मोठे बांधीव टाकं आहे. या टाक्याची लांबी ५० फूट ,रूंदी २० फूट व खोली १५ फूट आहे. या टाक्याचे वैशिष्ट्य म्हणजे याच्या एका बाजूला कातळ आहे व उरलेल्या तीन बाजू घडीव दगडांनी बांधून काढलेल्या आहेत. टाक्याच्या पश्चिमेकडील भिंतीत टाक्यात उतरण्यासाठी पायर्या बनवलेल्या आहेत. कातळ उतरावरून येणारे पाणी टाक्यात जमा होण्यापूर्वी त्यातील गाळ निघून जावा यासाठी कातळात १ फूट व्यास व 6 इंच खोली असलेले वर्तूळाकार खड्डे कोरलेले आहेत. या टाक्याची भिंत फूटल्याने यात आता पाणी साठत नाही. हे टाकं पाहून उत्तरेकडे चालत जातांना डाव्या हाताला पश्चिमाभिमुख प्रवेशव्दाराची जागा दिसते. प्रवेशव्दार व त्यापुढील देवड्यांचे अवशेष पहायला मिळतात. प्रवेशव्दारातून खाली उतरून गेल्यावर डाव्या बाजूस भिंतीचे अवशेष दिसतात तसेच कातळात खोदलेल्या काही पायर्याही पहायला मिळतात. किल्ल्याच्या खालच्या बाजूस कातळात खोदलेली एक-दोन गुहा व टाकं आहे. . साधारण अर्धा तास चालून गेल्यावर त्या नजरेस पडतात . त्यासाठी बांधीव टाक्याच्या बाजूने खाली उतरून बारी गावाच्या दिशेला चालावे लागते . ती गुहा पाहून आपली गड फेरी संपते . Facebook - https://www.facebook.com/profile.php?... Instagram - @the_braveheart_mountaineer Ignore Hashtag- #fortsofmaharashtra #travelvlog #dji #maharashtra #mountains #nature #trekkers #youtubeindia #sahyadri #tourism #chatrapatishivajimaharaj #rajgad #raigad #konkan #gadkille