У нас вы можете посмотреть бесплатно Railway Break Fail Video : लोणावळ्याजवळ खंडाळा घाटात मालगाडीचं ब्रेक फेल, कारण काय? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#PuneNews #KhandalaRailwayVideo #RailwayBreakFailVideo मुंबई-पुणे मार्गावर लोणावळा ते कर्जत दरम्यान पळसदरी येथे घाट उतरताना मालगाडीचा ब्रेक फेल झाला. दरम्यानचा जो भाग आहे ह्या भागात पळसधरी दरम्यान पुण्याहून मुंबईकडे येणारी मालगाडीचा घाट उतरताना ब्रेक फेल मुळे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी नियंत्रणाच्या बाहेर धावत होती.त्यामुळे परंतु मोठा अनर्थ टळला व दुर्घटनाही टळली. घटनेचा एक व्हिडिओ समोर आला असून यामध्ये मालगाडी प्रचंड वेगाने पळसधरी दरम्यान धावत आहे, मध्य रेल्वेच्या कर्जत ते लोणावळा दरम्यान खंडाळा घाटातली ही घटना असून गुरुवार 26 फेब्रुवारी रोजी तीन इंजिन असलेली ही के एल एम जी मालवाहू गाडी उतारावर अचानक वेगाने धावू लागली. दरम्यान पळसधरी ते खंडाळाच्या मध्ये बँकर लोको चा ब्रेक यंत्रणेमध्ये काहीतरी बिघाड झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे. प्रसंगावधान साधून बँकर लोको (म्हणजे इंजिन, जो रेल्वे च्या इंजिन ला खेचतो) डब्ल्यू ए जी 12 इंजिन चे लोको पायलट आणि ट्रेन मॅनेजर म्हणजे टी एम यांनी समन्वय साधत कर्जत च्या पुढे ही गाडी सुरक्षित रित्या थांबवली. या मालगाडीला असलेले काही लोको पायलट सर्व कर्मचारी सुरक्षित असून कोणतीही जीवित आणि अथवा दुर्घटना झालेली नाही. या मध्ये काही प्रशिक्षणार्थी लोको पायलट होते.दरम्यान ब्रेक फेल झाला कसा झाला याच्यामध्ये कोणाची चुकी याचा संपूर्ण तपास रेल्वे यंत्रणे कडून चालू असल्याची माहिती सूत्राकडून भेटली आहे. यातील चुका शोधून दोषी कोण आहे त्याच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.परंतु कुठलीही जीवितहानी झाली नसली तरीही अशी मोठी दुर्घटना झाल्यास, ती रोकण्यास कोणतीही यंत्रणा रेल्वे प्रशासनाकडे नाही. जेणेकरून घाट उतरताना किंवा असं काही प्रकार झाला तर अशा ब्रेक फेल झालेल्या गाड्यांना कसं थांबवण्यात याव याची यंत्रणा खंडाळा घाटा मध्ये खंडाळा दरम्यान मंकी हिल स्टेशन जवळ आहे. परंतु मंकी हिल ते कर्जत दरम्यान गाडी नियंत्रण करण्यासाठी जी काही यंत्रणा केली जाते, त्याचे घाटामध्ये आणखीन पर्याय असावेत अशी आता चिंता काही प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे. 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook: / mumbaitak Instagram: / mumbaitak Twitter: / mumbai_tak • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |... #maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.