У нас вы можете посмотреть бесплатно Vijasan Buddhist Cave | Bhadrawati | भद्रावतीची लेणी или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
भांदकची प्राचीन बौद्ध लेणी........................ डॉ. जयंत वडतकर लेणी, गुफा किंवा इंग्रजीत केव्ह (Cave) म्हटले कि आपल्याला आठवतात त्या अजंठाच्या बौद्ध गुफा, वेरूळचे कैलास लेणे, घारापुरी म्हणजेच एलिफंटा केव्ह, कान्हेरीच्या गुफांचा समूह, नाणेघाट, कार्ले अशा लेण्यांची नावे. अर्थात त्या अतिशय भव्य, सुंदर व जगप्रसिद्ध आहेत. आपल्या देश्यात सुमारे हजार तरी लेण्या आणि गुफा असतील त्यापैकी सुमारे ८०० लेण्या आपल्या महाराष्ट्रात आहेत हे एकूण अनेकांना आश्चर्य वाटेल, मी जेव्हा पहिल्यांदा हे वाचले होते तेव्हा मला पण वाटले होते. महाराष्ट्राचा पूर्व भाग म्हणजे विदर्भ, येथे सुद्धा अनेक प्राचीन लेण्या आहेत, याची अनेकांना माहिती सुद्धा नाही. त्याचे कारण एकतर या गुफा आकाराने लहान, सौंदर्य दृष्टीने पाहता दुय्यम, आणि त्याबाबत फारसे लिखाण सुद्धा झालेले नसून, तितकी प्रसिद्धी न मिळाल्यामुळे दुर्लक्षित राहिल्या आहेत. विदर्भातील या प्राचीन लेण्यांपैकी सर्वात प्राचीन आणि सुंदर म्हणावी अशी एक लेणी आहे ती भद्रावती येथे. भद्रावती किंवा भांदक हे विदर्भातील एक प्राचीन गाव. चंद्रपूर येथून सुमारे २५ किमी अंतरावर असलेल्या भद्रावती या गावाचा इतिहास सुमारे दोन हजार वर्ष इतका मागे जातो. या ठिकाणी प्रागैतिहासिक काळापासून ते मध्ययुगीन काळापर्यंतचे अनेक प्राचीन अवशेष, किल्ला, मंदिरे आणि लेण्या आहेत. गावाच्या पश्चिम दिशेस असलेल्या विजासन टेकडीमध्ये एक बुद्ध लेणी कोरलेली असून परिसरात इतरही अनेक लहान लहान व अर्धवट लेण्या आहेत. विजासन बुद्ध लेणी निर्मितीचा काळ सुमारे दोन हजार वर्षापूर्वीचा तरी असावा असा अंदाज आहे. चीनी प्रवासी ह्यून ए त्संग याने ह्या लेण्यास भेट दिली असा प्रवाद आहे. भद्रावती गावाच्या पश्चिमेस विजासन गावालगत असलेली ही लेणी विजासन टेकडीवर मध्यभागात कोरलेली असून, लेनिपर्यंत सुमारे १५ पायऱ्या चढून जावे लागते. लेणीच्या उजव्या बाजूने थेट टेकडीच्या माथ्यावर जाता येते, वर चढून आल्यावर थोडा विसावा घ्यावा. येथून समोर पूर्वेकडे भद्रावती गाव एका नजरेच्या टप्प्यात दिसते आणि टेकडीच्या मागे विजासन गाव आणि गावालगत विजासन तलाव सुद्धा दिसतो. पायऱ्या चढून आल्यावर काळ्या पाषाणात प्रथम लेणी पर्यंत रस्ता खोदलेला असून समोर पूर्वमुखी मुख्य लेणी व दोन बाजूला उत्तर व दक्षिण मुखी अश्या दोन आणखी लेणी आहेत. लेणी पर्यंत जातांना खोदलेल्या दगडात काही शिल्प, स्तूप, कलश अश्या आकृती कोनाडे आणि बसण्यासाठी ओटे खोदलेले दिसतात. येथील पूर्वमुखी मुख्य लेणी सुमारे ७४ फुट खोल, ०९ फुट रुंद व १४ फुट उंच अशी अति भव्य असून शेवटी गौतम बुद्धाची भव्य अशी आसनस्थ प्रतिमा कोरलेली आहे. बाजूच्या दोन लेण्यापैकी उत्तर मुखी लेणी सुमारे ३५ फुट खोल, ०९ फुट रुंद व १२ फुट उंच आणि दक्षिण मुखी लेणी सुमारे ४७ फुट खोल, ०९ फुट रुंद व १२ फुट उंच असून या दोन्हीही लेण्यांमध्ये बुद्धाच्या भव्य प्रतिमा असून त्यातील दक्षिण मुखी लेणी सध्या बंद करून ठेवण्यात आली आहे. There are 2000 years old Buddhist caves in Vijasan Tekdi at Vijasan village near Bhadrawati town. This is a very curiously planned Buddhist cave. A long tunnel is driven straight into the hill to a distance of 71 feet at the end of which is a shrine containing a colossal Buddha seated upon a bench. On the right and left of the entrance to this Cave other two smaller caves, one on either side, are driven in at right angles to this first one, and each of these has a shrine and colossal Buddha. Local legend has it that the central Buddha is the image of king Pandu-the image in the right gallery his son-that in the left his nephew. On the scarped side of the approach to the entrances to these galleries is a very much worn inscription in cave character. Another one belonging to the 9th century has been removed to the Nagpur Museum and has been referred to at length in the History chapter.These caves have hosted International Buddha Dhamma conventions. Several leaders and Monks of Buddha Dhamma from all over the world have represented at the convention. Camera & Gear used – 1) Video shoot with : Canon Power Shot SX50HS 2) Photographs - Canon Power Shot SX50HS Music credits- YouTube Library - https://www.youtube.com/audiolibrary/... Category –History & Education #Bhadrawati#Bhandak#Vijasan#BhandakCave#भांदकची बुद्ध लेणी#विजासन#BuddhistCave#Chandrapur#Vidarbha#BuddhJayanti#