У нас вы можете посмотреть бесплатно Vijaydurg Maratha History - Best fort in the world - Konkan vlog in Marathi - मराठा दुर्ग इतिहास или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Indian navy history gives us best forts in the world especially Maratha history. This konkan marathi vlog tells us about Vijaydurg which played a role in anglo maratha wars. Story of vijaydurg fort undeasea wall, vijaydurg drone shots. it is also one of the - konkan best places to visit विजयदुर्ग किल्ला सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर टोकाला वाघोटन नदीच्या मुखावर आहे. रत्नागिरीहून सुमारे दोन तासात इथं जाता येते. जवळचे रेल्वे स्टेशन कुडाळ असून कणकवली हूनही इथं जाऊ शकता. एक प्रचंड, अभेद्य आणि विशाल दुर्ग म्हणजे विजयदुर्ग. वाघोटण नदीच्या मुखाशी गिर्ये गावाजवळ हा किल्ला आजही मोठ्या दिमाखात उभा आहे...शिलाहार राजांच्या काळात १२ व्या शतकाच्या अखेरीस या दुर्गाची बांधणी झाली असे इतिहासकार मानतात...छत्रपती शिवरायांनी १६५३ मध्ये विजय संवत्सरात जिंकला आणि त्याचं बारसं झालं - विजयदुर्ग. आणि मग तिहेरी तटबंदी आणि २७ भक्कम बुरुज बांधून शिवरायांनी किल्ला बळवंत केला. विजयदुर्गाच्या वायव्य दिशेला समुद्रात पाण्याखाली बांधलेली भिंत आहे. या शिवकालीन भिंतीला धडकून शत्रूची कैक जहाजे रसातळाला गेली. कमांडर विजय गुपचुप आणि डॉ शील त्रिपाठी यांनी या अनोख्या भिंतीबद्दल संशोधन केले आहे. या ठिकाणी दगडी नांगर, हत्यार म्हणून वापरल्या जाणाऱ्या लोखंडी बेचक्या आणि काही मातीची भांडी असे अवशेष नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीच्या संशोधनात सापडले आहेत. पश्चिमेकडे दूर समुद्रात आंग्रे बँक नावाची प्रवाळांची उंची आहे, जिथं समुद्राची खोली अचानक कमी होते..यावरही एनआयओ च्या संशोधकांनी डायविंग करून बरीच माहिती घेतली आहे. या अभेद्य किल्ल्याला इंग्लिश आरमाराने पूर्वेकडील जिब्राल्टर असा किताब दिला होता... आरमार म्हणजे स्वतंत्र एक राज्यांगच आहे. जसे ज्यास अश्वबल त्याची पृथ्वी प्रजा आहे, तद्वतच. ज्याच्याजवळ आरमार त्याचा समुद्र. याकरता आरमार अवश्यमेव करावे- या शब्दांत छत्रपती शिवरायांनी आरमाराचा संकल्प मांडला सरखेल कान्होजी आंग्रेंच्या काळात मराठा आरमाराचा दरारा पश्चिम किनाऱ्यावर निर्माण झाला... १७१८ साली चार्ल्स ब्राऊन आणि मॅन्युअल डी कॅस्ट्रो च्या इंग्लिश आरमारी हल्ल्याला २०० माणसे गमावून पराभव पत्करावा लागला. पुढे १७२० मध्ये ब्राऊनने पुन्हा विजयदुर्ग मोहीम काढली... किल्लेदार रुद्राजी अनंतांनी ब्रिटिशांना पुन्हा एकदा पराभूत केले. डचांच्या प्रबळ आरमाराचा तुळाजी आंग्रेंनी विजयदुर्गाजवळ पराभव केला..१७५६ साली मात्र आंग्रेंच्या आरमारावर इंग्रजांशी संधान बांधून हल्ला करण्याचा नानासाहेब पेशव्याने निर्णय घेतला. आंग्ऱ्यांचे आरमार नष्ट केले गेले आणि विजयदुर्ग काही काळ इंग्रजांच्या ताब्यात गेला...विजयदुर्ग किल्ल्याच्या आणि मराठ्यांच्या इतिहासातील आत्मघाताचा एक कलंकित क्षण म्हणून ही घटना नोंदली गेली आहे.. १८६८ साली झालेलं खग्रास सूर्यग्रहण निरीक्षण करण्यासाठी नॉर्मन लॉकियर ने या ठिकाणाची निवड केली होती.