У нас вы можете посмотреть бесплатно "राजा घडविणारी माता | राजमाता जिजाऊ साहेब भोसले जयंती विशेष भाषण | 3 January" или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
"राजा घडविणारी माता | राजमाता जिजाऊ साहेब भोसले जयंती विशेष भाषण | 3 January" #bolkyakavita #jijau_jayanti #motivation #shivajimaharaj #3january #bhashan_kase_karave #marathibhashan संपूर्ण भाषण... आजचा दिवस अभिनंदनाचा नाही अभिवादनाचा आहे आजचा दिवस समाधानाचा नाही स्वाभिमानाचा आहे कारण आज आपण एका राजाच्या जन्माची जयंती साजरी करत नसून राजा घडविणाऱ्या महाशक्तीची जयंती साजरी करतोय आणि ती शक्ती म्हणजे राजमाता जिजाऊ साहेब भोसले सन्माननीय विचार मंच, आदरणीय मान्यवर, आणि इतिहास जिवंत ठेवणाऱ्या माझ्या बंधू-भगिनींनो आजचा दिवस केवळ जयंतीचा नाही आजचा दिवस विचारांच्या पुनर्जन्माचा आहे. कारण आज आपण स्मरण करतोय त्या आईचं जिच्या विचारांनी तलवारीला दिशा दिली, आणि या भारताला स्वराज्याची उषा दिली. इतिहासाच्या वळणावर अनेक माता झाल्यात परंतु इतिहासाला वळण देणारी माता आज जन्मली होती. इतिहासात अनेक पराक्रमी राजे झाले असतील परंतु पराक्रमांसोबतच नैतिकतेचा जाणता राजा जिजाऊंनी निर्माण केला. त्यांनी बाल शिवबाला शिकवलं तलवार चालवण सोप आहे परंतु न्यायासाठी ताठ राहणारी मान घडवणं कठीण आहे. गुलाम होण सोप आहे पण पराभव आटळ असला तरी, स्वराज्यासाठी लढत राहणं कठीण आहे. हा असा स्वाभिमान या मातेने महाराष्ट्राच्या मातीत पेरला जो गेली साडेतीनशे वर्ष या मातीतील नरवीरांच्या रक्तातून धगधगतो आहे. स्वराज्य, स्वधर्म आणि स्वाभिमान या प्रेरणेने हा महाराष्ट्र आजपरर्यत आपलं वेगळं अस्तित्व टिकवून आहे ते मासाहेब जिजाऊंच्या संस्कारामुळेच. ज्या काळात स्त्रीला समाजात दुर्बल म्हटलं जात होतं त्या काळात स्त्री दुर्बल नसते ते दुर्लक्षित असते ही गोष्ट जिजाऊनी आपल्या कर्तुत्वातून सिद्ध करून दाखवलली. पुत्र युद्धात असताना मागे उभी असलेली जिजाऊ केवळ आई नव्हती, ती स्वराज्याची ढाल होती, राजा चुकला तर दुरुस्त करणारी, थकला तर धीर देणारी आणि भरकटला तर मार्ग दाखविणारी गुरु होती. अठरा पगड जातीतील मावळ्यांना एकत्र घेऊन, अशक्य वाटणारं स्वराज्याच स्वप्न या माऊलीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात रुजवल. सोन्याच्या नांगरणे जमीन नांगरून शेतकऱ्यांना सोन्याचे दिवस आणण्याचा स्वप्न मासाहेब जिजाऊंनी पाहिलं होत परंतु जातीपातीचा राजकारण करणाऱा आजचा समाज आणि दुर्बळ परिस्थितीत जगणारा आजचा शेतकरी पाहून मासाहेब जिजाऊंना काय वाटत असेल. आज आपण स्वतंत्र झालो आहोत, स्वराज्यात जगतो आहोत, परंतु स्वतःला एक प्रश्न विचारावासा वाटतो आपल्या आतला स्वाभिमान जिवंत आहे का? आज जिजाऊ असत्या तर त्यांनी विचारलं असतं तुम्ही सुशिक्षित आहात पण अन्यायाविरुद्ध कधी उभे राहता काय? तुम्ही आपल्या देशासाठी, आपल्या भाषेसाठी, आपल्या माणसांसाठी उभे राहतात काय? मित्रांनो आज शत्रू बाहेर नाही तो आपल्या आताच लपला आहे. तो म्हणतो जुळवून घे, गप्प रहा, सहन कर पण जिजाऊनी आम्हाला शिकवतात न्यायांसाठी उभा राहणारा एक जरी असेल तरी अन्याय पराभूत होतो. मित्रांनो आज गरज नव्या तलवारीची नाही तर जिजाऊंच्या नव्या विचारांची आहे. कारण जिथे संस्कार जिवंत असतात तिथे शिवबा पुन्हा जन्माला येतो. आज या राजमातेच्या जयंतीनिमित्त संकल्प करूयात. सत्याच्या बाजूने उभे राहुयात, स्वाभिमान आणि स्वधर्म जपूयात. कारण जिजाऊंच्या विचारांवर चालणारा समाज पराभूत होत नाही, कधीच पराभूत होत नाही... जय जिजाऊ, जय शिवराय... जय हिंद, जय महाराष्ट्र...