У нас вы можете посмотреть бесплатно डाळिंब पिकातील आंबे बहार व्यवस्थापन | dalimb ambe bahar niyojan или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
✅घरबसल्या कृषि निगडीत सर्व उत्पादने भारी डिसकाऊंटसह खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा 👉https://krushidukan.bharatagri.com/ ============================================================ 👨🌾नमस्कार शेतकरी बांधवांनो! 🙏 🌱भारतअॅग्रीमध्ये आपले स्वागत आहे. ✅आजचा विषय - 🌱डाळिंब पिकातील आंबे बहार व्यवस्थापन👍 1️⃣नमस्कार शेतकरी मित्रांनो ,आज आपण डाळिंब पिकातील आंबे बहार नियोजन कसे करावे या संदर्भात जाणून घेऊया . पण सर्वात प्रथम तुम्हाला माहित आहे का ? डाळिंब पिकात तीन प्रमुख बहार असतात . 2️⃣मृग बहार (मे ते जून ), हस्त बहार (सप्टेंबर ते ऑक्टोबर ) आणि शेवटचा आंबे बाहेर -( जानेवारी ते फेब्रुवारी ) . शेतकरी मित्रनवो आंबे बाहेर का जास्त घेतला जातो , कारण या मध्ये किड आणि रोगाचे प्रमाण कमी असते ,हो आणि एक महत्वाची गोष्ट, ज्यांचा कडे पाणी मुबलक प्रमाणात आहे त्यांनी तर हा बहार अवश्य घ्यावा . 3️⃣चला तर मग आपण जाणून घेऊया आंबे बहारासाठी काय नियोजन करावे ? तर बघा शेतकरी मिंत्रानो आंबे बाहार मध्ये तीन क्रिया खूप महत्वाच्या आहे ,पहिली क्रिया विश्रांती ,दुसरी क्रिया ताण आणि तिसरी महत्वाची क्रिया पानगळ . 4️⃣ प्रथम विश्रांती काळातील महत्वाची कामे कोणती आणि विश्रांती काळ किती दिवस असावा ? - विश्रांती काळ कमीत कमी ३ महिन्या पर्यंत असावा , पूर्वीच्या बागेतील किड आणि रोग ग्रस्त झालेली फळे ,फांद्या छाटणी करून ,पाने गोळा करून,बिनकामाची फुले बागेच्या बाहेर योग्य प्रकारे विल्हेवाट लावून बागेत स्वच्छता ठेवावी . 5️⃣ नंतर बेडला दोन्ही बाजूने नांगर च्या साहयाने रेषा मारून त्यात बहारा च्या वेळी जो आपण खताचा डोज टाकतो त्या मधील १० % डोज अवश्य टाकून घ्यावा . तसेच बागेचं पाणी हळू हळू आपण कमी करत जावे ,म्हणजे कास ? आर्धा आर्धा तासाने कमी करावं . 6️⃣विश्रांतीकाळात आपण फवारणी कडे दुर्लक्ष न करता एक दोन अधून मधून सध्या बुरशीनाशक /बोर्डो च्या फवारण्या केल्या पाहिजे . काडी मध्ये स्टोरेज बनवण्यासाठी काही फवारण्या - 👉 ( ००:५२:३४ - ५ ग्रॅम + मिक्रोनिट्रिएंट्स- १ ग्राम ) 👉( ००:००:५०- ५ ग्रॅम +मिक्रोनिट्रिएंट्स- १ ग्राम ) 👉( ००:५२:३४ - १० ग्रॅम +मिक्रोनिट्रिएंट्स १ ग्रॅम ) 👉(००:००:५०- १० ग्रॅम + मिक्रोनिट्रिएंट्स १ ग्रॅम) आपल्याला या चार फवारण्या आलटून पालटून कराव्या लागतात . 7️⃣आता बघा विश्रांती नंतर आपण ताण देतो या मध्ये आपण बागेचे पूर्ण पाणी बंद करतो ,आता तुम्हाला प्रश्न पडला असेल पाणी बंद किती दिवस करावे बरोबर ना तर बघा आपल्याला आपल्या जमिनी नुसार १ ते २ महिने ताण द्यावा लागतो . 8️⃣ शेतकरी मित्रांनो ताण कळत सर्वात महत्वाचे काम म्हणजे पाणी बंद करणे आणि बागेची पानाची परिपक्वता करणे . 9️⃣तर बघा शेतकरी मित्रांनो दोन कामे झाली आता शेवटचा मुद्दा म्हणजे पानगळ - पानगळ हा दुर्लक्ष न करणारा मुद्दा आहे या मध्ये किती टक्के पानगळ होते या नुसार इथ्रेल चा डोज ठराव लागतो ,तो आपण बघू . १ ) ३० ते ४० % इथ्रेल -२ मिली + ००:५२:३४ -५ ग्रॅम +स्टिकर -०. ५ मिली / लिटर २) ४० ते ५० % इथ्रेल १. ५ मिली + ००:५२:३४ -५ ग्रॅम +स्टिकर -०. ५ मिली / लिटर ३) ५० ते ६० %-इथ्रेल- १ मिली + ००:५२:३४ -५ ग्रॅम +स्टिकर -०. ५ मिली / लिटर ४) ६० % असेल तर-इथ्रेल- ०. ५ मिली + ००:५२:३४ -५ ग्रॅम +स्टिकर -०. ५ मिली / लिटर 🔟आपण या मध्ये डोज बघितला, आता छाटणी आपण सॉफ़्ट करू शकतो कारण हार्ड छाटणी करू नाही शकत कारण असे ,पेन्सिल काडी मध्ये स्टोरेज असते. ही छाटणी इथ्रेल फवारणी अगोदर किंवा नंतर पण करू शकतो . 1️⃣1️⃣इथ्रेल फवारणी च्या १० दिवंसाच्या आता पहिले पाणी द्यावे , बेसल डोज देतानी जमीन जास्त काळ उघडी ना ठेवता लवकर खात झाकून पाणी घ्यावा कारण उघडी राहील तर हवेतील नत्र जमिनीत प्रवेश करून बाग तगारीवर जाते. शेणखत - २० ते ३० किलो १०:२६:२६ - ५०० ते ७०० ग्रॅम नीम पेंड - १ किलो गांडूळ खत- १ किलो फुरदान - २५ ते ३० ग्रॅम बाकी खते आपण ड्रीप ने देतो त्याचा अवस्था नुसार . 1️⃣2️⃣शेतकरी मित्रांनो आपण या मध्ये तीन प्रमुख काम बघितली आता पुढे काय असा प्रश्न निर्माण होतो ना ? तर बघा पुढे पाहिलं पाणी दिली नंतर १० ते १५ दिवसात चौकी अवस्था असते नंतर २ ते २.५ महिने सेटिंग काळ , तिथून पुढे १.५ महिन्यांनी साईज वाढ आणि कलर हिरवा होतो आणि तिथून पुढे १.५ ते २ महिने कलर आणि गोडे भरणे अवस्था चालू होते . मग सर्व प्रक्रियेला पहिल्या पाण्यापासून ते काढणी पर्यंत ६ ते ६.५ महिने जातात . 1️⃣3️⃣शेतकरी मित्रांनो डाळिंब हा विषय एका व्हिडिओ मध्ये संपणारा नाही ,आता आपण आंबे बहारा विषय थोडक्यात बगितलं , परत एकदा डाळिंब बागेवर किड आणि रोग या विषावर काय उपाययोजना केल्या पाहिजे हे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ च्या माध्यमातून बघू . तुम्हाला हा व्हिडीओ 📱 आणि दिलेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये सांगायला 💁♂️ विसरू नका ! तसेच हा विडियो तुमच्या इतर शेतकरी मित्रांना देखील शेयर करा 👍 ✅आमची इतर सोशल मीडिया पेजेस - 👉भारतअॅग्री ऍप - http://bit.ly/2ZyV2yl 👉फेसबुक हिन्दी - https://bit.ly/36KuGOe 👉फ़ेसबुक मराठी - https://bit.ly/36KuGOe 👉इंस्टाग्राम - https://bit.ly/3B9Ny8G 👉वेबसाइट - www.bharatagri.com 👉लिंक्ड इन - https://bit.ly/3TWtK0Z 👉भारतअॅग्री मराठी यूट्यूब चैनल - https://bit.ly/3Ryf3zt 👉भारतअॅग्री हिन्दी यूट्यूब चैनल - https://bit.ly/3L2cRxF #bharatagri #agriculture #hindi #farming #bharatagrihindi #kisan #kheti #fasal