У нас вы можете посмотреть бесплатно स्वामी विवेकानंद पब्लिक स्कूल कुं पिंपळगाव येथे शास्त्रशुद्ध पद्धतीने सूर्यनमस्कार प्रशिक्षण ध्यान или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
रथसप्तमी निमित्त आज शनिवार दि. 07/02/2026 रोजी सकाळी 9:30 वा स्वामी विवेकानंद पब्लिक स्कूल कुंभार पिंपळगाव येथे शास्त्रशुद्ध पद्धतीने सूर्यनमस्कार प्रशिक्षण - स्पर्धा आणि ओंकार ध्यान साधना शिबीर संपन्न झाली असून या मध्ये मत्स्योदरी कन्या विद्यालय, शंकरराव तौर प्राथमिक विद्यालय, श्री सरस्वती भुवन, मत्स्योदरी विद्यालय नाथनगर आणि स्वामी विवेकानंद पब्लिक स्कूल या शाळेतील इयत्ता पाचवी ते 10 वी च्या एकूण 950 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून प्रत्येकी 12 सूर्यनमस्कार करुन तीन तासात एकूण 11400 सूर्यनमस्कार केले. राज्य समन्वयक योगतज्ञ मास्टर ट्रेनर श्री देवा चित्राल सरांनी शास्त्रोक्त पद्धतीने श्वसनाची माहिती सह प्रात्यक्षिकेतून विद्यार्थ्यां संगीताच्या ध्वनी वर योगिक जॉगिंग, वॉर्म अप घेऊन ओमकार ध्यान साधना योगिक प्रार्थनेने सुरुवात करुन सूक्ष्म व्यायाम घेऊन सूर्यनमस्कार ची पूर्वतयारी निमित्त बटरफ्लाय, शिशुपालासण आणि मार्जरी व नाडी विभाजन ह्या पवनमुक्त हालचाली करून घेतल्या. प्रशिक्षणासाठी बीज मंत्रा सह 4 सूर्यनमस्कार घेऊन सराव करुन घेतला. शेवटी स्पर्धे च्या निमित्ताने एकूण 12 सूर्यनमस्कार घेऊन लयबद्ध हालचालीत उत्कृष्ट व कलात्मक पद्धतीने सूर्यनमस्कार चे प्रशिक्षण सरावं आणि स्पर्धा पूर्ण करुन आदर्श स्थिती मध्ये उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या 15 मुले आणि 20 मुलींची निवड करून सर्वांना गोल्ड मेडल देऊन गौरव करण्यात आला. शिक्षकांनी सुद्धा उत्कृष्ट पद्धतीने प्रशिक्षणात सहभाग नोंदवून सूर्य उपासना दरम्यान सूर्य साधनेचा आनंद घेत विद्यार्थ्यांचे निरीक्षण करुन परीक्षण करत उत्साह वाढविण्यासाठी मेहनत घेतली. श्री कल्याण भाऊ तौर प्रमुख पाहून म्हणून उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन सर्वांना चॉकलेट वितरीत केले. अध्यक्ष श्रीमती कीर्ती उढाण मॅडम यांच्या मार्गदर्शनाने विद्यालयाचे व्यवस्थापक श्री विलास सिरसाट तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. श्रीमती कीर्ती उढाण यांनी उपक्रमासाठी सर्व व्यवस्था उपलब्ध करुन तब्बल तीन तास सातत्याने चालू असलेल्या सूर्यनमस्कार साधनेचा आनंद घेत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन उपस्थित सर्वांचे कौतुक केले. शिक्षण विभागाच्या वतीने केंद्र प्रमुख श्री सुनील खोडदे, श्री प्रमोद येडले यांनी शुभारंभ प्रसंगी शुभेच्छा दिल्या आणि पंचायत समिती च्या वतीने श्री देवा चित्राल यांनी सर्वांचे आभार मानले.