У нас вы можете посмотреть бесплатно न्यूजशाही ची श्रावण धारा या मालिकेतील तीर्थक्षेत्र श्री विठ्ठलाई देवीची महिमा" पहा विशेष भाग" или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुका निसर्गाच्या दृष्टीने सुंदर आहे.आणि याच तालुक्यामध्ये दुर्गमानवड या गावांमध्ये श्री विठलाई देवीचे स्थान आहे. श्री विठलाई देवीचे स्थान हे जागृत आहे नवसाला पावणारी देवी तसेच चांगल्याशी चांगलच आणि वाईटाशी वाईट अशी ही कृपादुष्टी असणारी ही देवी आहे असे येथील ग्रामस्थांच्याकडून समजलं. ह्या देवीला महाराष्ट्रसह कर्नाटकातील अनेक भाविक दर्शनासाठी येत असतात.श्री विठ्ठलाई देवीची मूळ स्थान हे गावापासून थोड्या अंतरावर आहे.या ठिकाणी तुळशी नदीचा उगम होतो. न्यूजशाहीची श्रावणधारा या मालिकेतील आजचा विशेष भाग आम्ही घेऊन आलो आहोत जगतजननी तीर्थक्षेत्र दुर्गमानवाड येथील श्री विठ्ठलाई देवी" निसर्गरम्य वातावरणात आमचा प्रवास सुरू झाला. दुर्गमानवाड गावामध्ये देवीचे मंदिर आहे मंदिराच्या प्रवेशद्वारामध्ये दीपमाळ आहे मंदिराचा सभामंडप भव्य आहे. या मंदिराचे एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराचा कळस हा 51 फुटावर आहे. तसेच मंदिराच्या शिखरावर अनेक छोटे कळस आहेत मंदिरातील श्री विठ्ठलाई देवीची खडक डमरू त्रिशूल पानधारी काळया पाषाणातील चतुर्भुज मूर्ती आहे. मूर्ती साधारण दोन ते अडीच फूट आहे.सध्या देवीची पितळी मुखवट्यावर आकर्षित पूजा बांधण्यात येते.देवीचे नित्य पूजा ही गुरव समाजाकडे पूर्वीपासून आहे. देवीचा मुख्य उत्सव हा गुढीपाडव्याच्या दोन दिवस अगोदर असतो यावेळी यात्रा भरते या यात्रेला महाराष्ट्र कर्नाटक राज्यातील लाखो भाविक दाखल होतात. यात्रेच्या मुख्य दिवशी पहाटे गुरव समाज ग्रामस्थांच्या वतीने देवीला अभिषेक घालतात व पूजा झाल्यानंतर साधारण दहा वाजता मंदिर दर्शनासाठी खुले होते दुपारी बारा वाजता दुर्गमानवाड येथून पालखी सड्यावरच्या भैरीला जाते दुर्गमानवाड परिसरातील सर्व ग्रामस्थ बलुतेदार नैवेद दाखवून प्रसादाचा लाभ घेतात. त्यानंतर सायंकाळी पाच वाजता पालखी सड्यावरून खाली मंदिरात येते. ह्या देवी बद्दल अनेक अफवा पसरलेल्या आहेत पण येथे आम्ही जाऊन तेथील ग्रामस्थांच्या आम्ही प्रतिक्रिया घेतल्या श्री विठ्ठलाई भक्तांची आई आहे आणि ती प्रत्येकाला पावत असते देवीवर श्रद्धा ठेवावी पण अंधश्रद्धा नको असे येथील ग्रामस्थांनी सांगितले. न्यूजशाहीच्या श्रावणधारा या मालिकेत आपण इथेच थांबू" भेटू आता पुढच्या भागात धन्यवाद