У нас вы можете посмотреть бесплатно 2000 वर्षांचा रहस्यपूर्ण वारसा | कोकणातील Hidden Place 😲 | कुडा बुद्ध लेणी | Vlog No.04 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
कुडा बौद्ध लेणी कोकण किनारपट्टीत कोरल्या गेलेल्या अनेक शैलकृत लेणी समूहातील कुडा लेणी समूह एक महत्त्वाचा लेणी समूह आहे. येथे दोन स्तरांत कोरलेली सव्वीस शैलकृत लेणी आणि अकरा पाण्याची टाकी आहेत. लेणी क्रमांक एक ते पंधरा खालिल स्तरावर, तर उर्वरित लेणी बारा मीटर उंचीवरील दुसऱ्या स्तरावर कोरलेली आहेत. कुडा लेण्यांत पाच चैत्यगृहे (लेणी क्र. १, ६, ९, १५, २१) आणि अन्य विहार आहेत. लेणी क्रमांक ६ हे येथील सर्वात मोठे चैत्य गृह आहे. या चैत्यगृहाचे छत हे सपाट असून गुहेतील मंडपाच्या भिंतींवर मिथुन शिल्पे, कमलपुष्प, बुद्धमूर्ती, नाग, चक्र आदिंचे अलंकरण केलेले आहे. लेण्याच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस गजशिल्प कोरलेले असून त्यातील डाव्या बाजूचे शिल्प खंडित झालेले आहे. लेण्याच्या मागील बाजूस एक शैलकृत स्तूप आहे. या व्यतिरिक्त अन्य लेणी साध्या, अलंकरण विरहित आहेत. पूर्वीच्या काळी लेण्यांमध्ये मातीच्या गिलाव्यावर रंगीत चित्रे रेखाटलेली होती. कुडा लेण्यांची स्थापत्य शैली काले लेण्यांशी मिळतीजुळती आहे परंतु ही लेणी इसवी सनाच्या दुसऱ्या, तिसऱ्या शतकात कोरलेली आहेत. लेण्यांतील काही बुद्धमूर्ती इ. स. पाचव्या सहाव्या शतकात कोरलेल्या आहेत. कुडा लेणी निर्माण करण्यास दिल्या गेलेल्या दानधर्मांचा उल्लेख येथे कोरलेल्या अभिलेखांत केलेला आढळतो. या तीस पेक्षा अधिक अभिलेखांत बौद्ध भिक्षू, सामान्य उपासक यांच्याबरोबरच मंत्री, लेखक, वैद्य, सावकार, फुलविक्रेते यांचे अभिलेख उल्लेखनीय आहेत. या लेणी समूहाची निर्मिती इसवी सनाच्या दुसऱ्या शतकापासून ते चौथ्या शतकापर्यंत केली गेली. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहात — 👉 कुडा बुद्ध लेणीचा इतिहास 👉 लेण्यांची रचना आणि वैशिष्ट्ये 👉 निसर्गसौंदर्य आणि शांततेचा अनुभव 👉 कोकणातील एक Hidden Historical Place जर तुम्हाला इतिहास, प्रवास आणि निसर्ग आवडत असेल तर हा व्हिडिओ नक्की पाहा ❤️ व्हिडिओ आवडल्यास Like 👍 | Share 🔁 | Subscribe 🔔 करायला विसरू नका! #कुडाबुद्धलेणी #KudaCaves #BuddhistCaves #कोकण #HiddenPlace #HistoricalPlaces #IndianHistory #TravelMaharashtra #ExploreMaharashtra #ancientindia