У нас вы можете посмотреть бесплатно बुलढाणा : कोमलची कमाल! 10 सेकंदांत भारतातील सर्व राज्यांची नावे; इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील डोणगाव येथील कोमल देविदास खनपटे हिने आपल्या विलक्षण बुद्धिमत्तेची झलक दाखवत अनोखा विक्रम प्रस्थापित केला आहे. अवघ्या 10 सेकंदांत भारतातील सर्व राज्यांची नावे अचूकपणे सांगत कोमलने इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदवले आहे. श्री शिवाजी हायस्कूलमध्ये दहावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या कोमलच्या या उल्लेखनीय यशामुळे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात तिचे कौतुक होत आहे. तिच्या वेगवान स्मरणशक्तीमुळे आणि ज्ञानामुळे तिला आता “गुगल गर्ल” म्हणूनही ओळख मिळत आहे. कोमलच्या या यशामुळे कुटुंबीय, शिक्षक आणि स्थानिक नागरिकांकडून तिचे अभिनंदन करण्यात येत असून तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत. / @samvidhannewstv संविधान न्यूज (Samvidhan News) हे महाराष्ट्रातील विश्वासार्ह, तटस्थ आणि वेगवान न्यूज प्लॅटफॉर्म आहे. भारताच्या सर्वोच्च कायद्यास मानल्या जाणाऱ्या “भारतीय संविधान” विषयक माहिती, राजकीय घडामोडी, महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील ताज्या बातम्या, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अपडेट्स आम्ही 24x7 मराठीमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवतो. भारतीय संविधान हे देशाचे मूलभूत कायदेशीर दस्तावेज असून 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने ते अंगीकारले आणि 26 जानेवारी 1950 पासून लागू झाले. 395 अनुच्छेद, 8 अनुसूच्या आणि सुमारे 1,45,000 शब्दांनी बनलेले हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. 2 वर्ष 11 महिने कालावधीत 11 सत्रांदरम्यान 167 दिवस संविधान सभेने प्रत्येक अनुच्छेदावर सखोल चर्चा करून अंतिम स्वरूप दिले. संविधान न्यूज तुम्हाला महाराष्ट्रातील राजकारण, कायदेविषयक विश्लेषण, ब्रेकिंग न्यूज, पुणे-मुंबई-नाशिक-नगर-कोल्हापूरसह सर्व शहरांतील अपडेट्स, तसेच बिझनेस, स्पोर्ट्स, तंत्रज्ञान, ऑफबीट स्टोरीज यांचे विश्वसनीय कव्हरेज देते. संविधान, लोकशाही, कायदे, निवडणुका, समाज आणि शासन यावर सर्वसमावेशक आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी आमच्यासोबत राहा. मराठीमध्ये सखोल, संशोधित आणि जबाबदार पत्रकारितेचा अनुभव घेण्यासाठी Samvidhan News ला Subscribe करा!