У нас вы можете посмотреть бесплатно जिल्हा परिषदमध्ये शिक्षण घेणारी, मजुराची मुलगी वसीमा शेख झाली उपजिल्हाधिकारी | Rajmudra News Live или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
जिल्हा परिषद मध्ये शिक्षण घेणारी, मजुराची मुलगी झाली उपजिल्हाधिकारी वसीमा महेबूब शेख यांचा थक्क करणारा प्रवास, आर्थिक परिस्थितीशी झुंज देत मिळविले यश नांदेड: लोहा तालुक्यातील जोशी सांगवी येथील वसीमा महेबूब शेख यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग तर्फे घेण्यात आलेल्या राज्य सेवा परीक्षेत महिला खुल्या वर्गातून महाराष्ट्रमध्ये तिसरा क्रमांक पटकावत उपजिल्हाधिकारीपदी वर्णी लावली. त्यांच्या या यशात त्यांचे वडील महेबूब शेख, भाऊ इम्रान शेख, आई शेख सलीमाबी,पती शेख हैदर यांचे मोलाचे सहकार्य त्यांना मिळाले. दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षेचे निकाल लागले आणि त्यात नांदेडचे नाव अभिमानाने वसीमा शेख यांनी यश मिळवत उंचावले. वसीमा यांनी अतिशय हलाखीच्या परिस्थितीतुन आपल्या जिद्द,चिकाटी आणि मेहनतीने हे यश संपादन केले. त्यांचे इयत्ता सातवी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा जोशी सांगवी येथे झाले. तर माध्यमिक शिक्षण गावातीलच बालब्रह्मचारी वैरागी माध्यमिक विद्यालय जोशी सांगवी येथुन झाले. सुरुवातीच्या शिक्षणामध्ये काही कोचिंग क्लास नसल्याने ग्रामीण भागामध्ये वेळेवर शिकवणे हेच त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचे होते. तेथे त्यांना ते शिक्षण मिळाले. त्यानंतर उच्च माध्यमिक शिक्षण कंधार येथील प्रियदर्शिनी मुलींची शाळा येथून पूर्ण केले. त्यांना इयत्ता 10 वर्गात 82% गुण आणि 12 वर्गात 83% गुण प्राप्त केले. हे माध्यमिक शिक्षण त्यांनी अत्यंत हलाकीच्या कौटुंबिक परिस्थितीमध्ये पूर्ण केले. तोच त्याचा जीवनातील वळण घेणारा क्षण आणि तेथुनच त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीला खरी सुरुवात झाली. त्यानंतर त्यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठातून बी. ए.ची पदवी पूर्ण केली आणि 2016 ला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा अभ्यास सुरू केला. त्यामध्ये 2018 साली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा गट ब विक्रीकर निरीक्षक हे पद मिळाले ते नागपूर येथे सध्या कार्यरत आहेत. नौकरी करता करता त्यांनी राज्यसेवेची तयारी करायाला सुरुवात केली आणि वरच्या पदावर जायचे ठरविले, ज्याला त्यांनी साकारही करत त्यांनी उपजिल्हाधिकारी पदाला गवसणी घातली. अतिशय खडतर प्रवास करत त्यांनी हे यश मिळविले. कौटुंबिक परिस्थिती: कौटुंबिक परिस्थिती पाहता त्यांचे वडील हे आजारी असल्याने त्यांचे मानसिक स्वास्थ्य योग्य नसताना लहानपणापासून त्यांचा भाऊ इम्रान शेख हे ऑटो रिक्षा चालून गरजा पूर्ण करायचे आणि आई सलीमाबी हे रोजमजुरी, बांगड्या विकून जे मिळालं ते काम करून त्यांच्या आईने आणि भावाने त्यांचे शिक्षण पूर्ण केले. ज्या समाजाचा वेळोवेळी विरोध पत्कारल त्या समाजामध्ये पडदा पद्धती असतात आणि मुलीच्या शिक्षणाला एक अबुज असतो पण घरच्यांनी आम्ही तुझ्या पाठीशी आहोत असे सांगितले आणि समाजासाठी काहीतरी करायचे आहे असेही ठरवत त्यांनी जिद्द सोडली नाही. ज्या परिस्थितीमध्ये त्यांनी शिक्षण पूर्ण केले अश्या खूप कमी विद्यार्थी असतात की, समाजाला काही करून दाखवाव, काही विद्यार्थ्यांचे असे म्हणणे असते की आपली आर्थिक परिस्थिती कमजोर, आपले आई वडील सरकारी नोकरीवर नाहीत तरी पण तुम्हाला जर यशस्वी व्हायचे असेल तर तुमच्यात काहीतरी करून दाखवायची जिद्द असेल तर ते तुम्हाला कधी शांत बसू देणार नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला जे पाहिजे ते मिळू शकते. या यशाचे श्रेय ते आपल्या मागे ठाम उभे राहिलेल्या आपल्या कुटुंबाला देतात. तर प्रत्यक्ष- अप्रत्यक्षपने ज्यानी ज्यांनी त्यांची मदत केली त्यांचे त्यानी आभार व्यक्त केले. #MPSC #वसीमा_शेख #उपजिल्हाधिकारी #NANDED #वैचारिक_गुरु #एमपीएससी #मुलाखत #संवाद #युवामुद्रा #जीवनप्रवास #Exclusive_Interview #nikhilchavhan #Nanded #नांदेड #Rajmudra_News_Live #Rajmudranews #rajmudra #marathinews #breakingnews #newsupdate #maharashtra #marathwada #nanded #करिअरमुद्रा #निशा_गवळी #psi #carriermudra #mpsc #nishagavali #एमपीएससी #mpscresult #यशमुद्रा #yashmudra # #UPSC #upscresult #मुलाखत #interview #speech #motivational #nanded #marathinews #motivational_speaker #motivationalvideos #IAS #UPSC_SUCCESS_STORY #UPSC_RESULT #RANK #successstory #neet #Neetresult #Rajmudra_News_Live #Rajmudranews #rajmudra #marathinews #breakingnews #newsupdate #maharashtra #marathwada #nanded #UPSC #upscresult #mbbs #unique #medicalfield #12th #psi