У нас вы можете посмотреть бесплатно कोकणातील " देवांची स्वारी, देव भेटीस जाणे " एक परंपरा । कुणकेश्वर जत्रा 2022 । 40km चा पायी प्रवास или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
कोकणातील " देवांची स्वारी, देव भेटीस जाणे " एक परंपरा । कुणकेश्वर जत्रा 2022 । 40km चा पायी प्रवास कोकणात आजही अनेक प्रथा आणि परंपरा अगदी जाणीवपूर्वक जपल्या जातात . कोकणातील लोकांची देवांवर खूप श्रद्धा आहे,इथल्या गावांच आणि राहणाऱ्या लोकांच निसर्गाशी आणि इथल्या मातीशी वेगळंच नात आहे . नैसर्गिक, ऐतिहासिक आणि रहस्यमय गोष्टींचा इकडे खजिना आहे . इथल्या प्रथा ,परंपरा आणि कथा ऐकून मन अचंबित होत आश्चर्य वाटत. इतिहास,परंपरा आणि संस्कृती जमपणारी इथली गाव आणि गावात राहणारी माणसं. कोकण ,निसर्ग आणि माणसं हे एक वेगळंच समीकरण आहे . देवांवर नितांत श्रद्धा असणारी ही कोकण भूमी . कोकण मुळातच परंपरांनी नटलेला ,परंपरा जपणार आणि तितकंच प्रेम करणारा प्रदेश आहे म्हणूनच हा परंपरांचा ठेवा जतन करून पुढच्या पिढीला हा ठेवा दिला जातो आणि जपलाही जातो. एकीकडे विज्ञानाने कमालीची प्रगती केली आहे ,अशक्य ते शक्य झालं आहे असं असलं तरीही कोकणातील अनेक प्रथा आणि परंपरा मनात1 घर करून जातात , देवाच्या अगदी जवळ घेऊन जातात ,कधीही विसरू शकत नाही अश्या आठवणी देऊन जातात. देवांची स्वारी देव भेटीस जाणे ही कोकणातील एक अनोखी प्रथा .जसं देव प्रजेला भेटायला जातो , तसंच देव , देव भेटीसही जातो. दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे महाशिवरात्री दिवशी अनेक गावचे लोक भेटीस जातात माझं गाव मसुरे येतील जैन भरतेश्वर पण कुणकेश्वर भेटीस गेले होते पण ते दोन दिवस साजरा आधी गेल्याने त्यांच्या सोबत जाणे शक्य नव्हते .पायी चालत ,नदी नाले ओलांडून , पूर्वजांनी दाखवलेल्या देवांच्या वाटा या वाटांवरून प्रवास करत,तहान भूक विसरून ,उन्हातून लांबच्या लांब पसरलेल्या माळरानांवरून प्रवास करत देव भेटीस येत असतात .या पदयात्रेत गावातील वयस्कर मंडळी , महिला , तरुण वर्ग लहान मूल यांचाही सहभाग असतो . हे सर्व बघून एक प्रश्न पडतो की एवढी शक्ती कुठून येत असेल उत्तर एकच ही त्या देवाची शक्ती जो आम्हला सांभाळतो ,आमचं रक्षण करतो तोच देव आणि त्याचीच ही शक्ती . देवांवर मनापासून प्रेम करणारी ,भक्ती करणारी इथली गाव अनो साधी भोळी माणसं . हे सर्व पाहून अंगावर काटा मात्र येतो . देवांची स्वारी देव भेटीस जाणे हा प्रवास अनुभवायचा असेल तर ही पदयात्रा एकदा केली पाहिजे आणि तो योग देखील आला . आमच्या बाजूच गाव मालोंड देवी पावणाई बेलाची वाडी येथील गावकरी पायी चालत सुमारे 10 वर्षांनंतर आपल्या देवांसोबत कुणकेश्वर भेटीस महाशिवरात्री जत्रेच्या दिवशी निघणार होते मी ही त्यांच्या या पदयात्रेमध्ये, देवांच्या स्वारी मध्ये सामील झालो . माझ्यासाठी हा एक वेगळा अनुभव होता .आडवाटांचा प्रवास ,नदी पार करायचा प्रवास ,डोंगर ,ऊन ,माळरानं आणि देवांच्या वाटा आणि खूप काही ... मालोंड वरून सुमारे 35 ते 40 km चा पायी प्रवास देवांच्या वाटांवरचा प्रवास होता . देवी पावणाई ,माझं ग्रामदेवत श्री देव रवळनाथ आणि श्री देव कुणकेश्वर यांच्या आशीर्वाद पाठीशी होता .पण कुणकेश्वर पर्यंत पोहचे पर्यंत माझी हालत खराब झाली होती सवय नसल्यामुळे पाय सुजले होते त्यामुळे तिकडे थांबून दुसऱ्या दिवशीचं शूट करत खूप कठीण होत त्यामुळे मी देवांसोबत कुणकेश्वर भेट घेतली आशीर्वाद घेतला जत्रा फिरलो आणि घरी आलो पण हा अनुभव खूप विलक्षण होता आणि तो मी कधीही विसरू शकत नाही पुन्हा पदयात्रा असेल पुढच्या वर्षी कुणकेश्वर भेट असेल तर नक्की मी दुसऱ्या दिवशीचा विडिओ बनवेन ☺️ Thank You ☺️❤️ Don't forget to share and subscribe Follow us - Email - [email protected] Instagram / sanchitthakurvlogs__ Facebook - / sanchitthakurvlogs SnapChat - / sanchit_vlog Telegram - https://t.me/Sanchit_Thakur_Vlogs #देवांचीस्वारी #देवभेटीसजाणे #कुणकेश्वरयात्रा #कुणकेश्वरयात्रा2022