У нас вы можете посмотреть бесплатно सासवड येथे तीन दिवस चाललेल्या शिवशक्ती अवतार सोहळा или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
सासवड येथे तीन दिवस चाललेल्या शिवशक्ती अवतार सोहळ्याची महाआरतीने सांगता... पाच हजार भाविकांनी घेतला दर्शनाचा लाभ सासवड शहर, ता. 17: सासवड येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय सेवाकेंद्र तर्फे सासवड येथील पालखी मैदानावर महाशिवरात्री निमित्त १४, १५ व १६ फेब्रुवारी हे तीन दिवस शिवशक्ती अवतार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये " शिवशक्ती अवतार "हा देखावा ठेवला होता. 15 फुट उंचीची महादेवाची पिंड बनविण्यात आली होती. शेतकऱ्यांच्या कष्टाला आणि मातीतल्या श्रद्धेला मान देत शिवपिंडीने शेतकऱ्यांच्या महादेवाचे रूप धारण केले होते. जणू प्रत्येक शेतकऱ्याच्या घामाच्या थेंबातच महादेवांचे आशीर्वाद सामावले आहेत. हिरव्यागार, डोलणाऱ्या शेतांसारखेच प्रसन्न आणि जीवनदायी रूप शिवपिंडीने धारण केले होते. डोक्यावर शेतकऱ्यांचा अभिमान असलेला फेटा परिधान करून महादेव जणू आपल्या शेतकरी लेकरांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, अशी हि भव्य दिव्य हरित क्रांती महादेवाची शिव पिंड साकारण्यात आली होती. गोकुळ गाव संकल्पना, या विषयांवर आधारित अध्यात्मिक व सामाजिक मूल्यांची प्रभावी मांडणी, गाईचे महत्व यावर मार्गदर्शन करण्यात आले. पिंडीला जलाभिषेकाची सुविधा, ध्यानधारणा कक्ष, पिंडींचे सहस्त्रदर्शन, तसेच शाश्वत यौगिक शेती दररोज सकाळी ८.०० ते रात्री १०.०० या वेळेत आकर्षक आध्यात्मिक व ज्ञानवर्धक प्रदर्शन सर्वांसाठी मोफत खुले होते. शनिवार,१४ फेब्रुवारी रोजी उद्घाटन आणि महाआरती हेल्पो फाउंडेशनच्या व्यवस्थापिका शमीम शेख व अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राज्याचे उपाध्यक्ष व पुरंदर तालुका पत्रकार संघाचे संस्थापक दत्तानाना भोंगळे तसेच ब्रह्माकुमारी विश्वविद्यालयाच्या प्रमुख नीलिमा दीदी यांच्या हस्ते संपन्न झाली. यावेळी अंजली पानसरे, सुवर्णा भोंगळे, प्रतिभा चव्हाण, माधुरी चव्हाण, सोनाली पवार, माया कोलते, उज्वला जगताप, कविता रासकर, योगिता वचकल, मातांनी चैतन्य नवदुर्गा देवी रूपात सहभाग घेतला. 15 फेब्रुवारीची संध्याकाळची महाआरती कोषाधिकारी छायाताई मिसाळ आणि मंडल कृषी अधिकारी अमोल सुतार यांच्या हस्ते संपन्न झाली. इचलकरंजी येथून आलेले ब्रह्माकुमार बाळासाहेब रुगे यांनी शेतकऱ्यांसाठी उत्कृष्ट मार्गदर्शन केले. तसेच गोमाता मंदिर केम चे आदर्श गोसेवक परमेश्वर तळेकर यांनी खिलार देशी गाई विषयी सुंदर मार्गदर्शन केले. ब्रह्माकुमार रघुनाथभाऊ यांनी शाश्वत यौगिक शेती का आणि कशी करावी याचे मार्गदर्शन करण्यात आले. दुसऱ्या दिवस प्रत्यक्ष नवदुर्गाच्या रुपात देखाव्यात वैष्णवी पोरे, प्रांजल शिंदे, ऋतुजा कोलते, कृष्णाल राऊत, शिवांगी चव्हाण, सुरेखा कल्याणकर, प्रेरणा शिंदे, माधुरी चव्हाण सहभागी झाल्या होत्या. 16 फेब्रुवारीरोजी तिसऱ्या दिवशीची महाआरती माथाडी कामगार युनियनचे तालुकाध्यक्ष अमोल जगताप, पञकार अश्रुबा माने, बापू मुळीक यांच्या हस्ते संपन्न झाली. आंबोडी गावातील स्वप्निल महाराज कळाणे यांच्या बालसंस्कार वर्गातील कन्यांनी चैतन्य नवदुर्गाचे रूप धरण केले होते. शेती विषयक मार्गदर्शनासाठी भूम येथून आलेले दत्ताभाऊ आणि अक्कलकोटचे रघुनाथभाऊ यांनी उत्कृष्ट मार्गदर्शन केले. नीलिमा दीदी यांनी शिवरात्रीचे अध्यात्मिक महत्त्व समजावून सांगितले. विशाखापट्टणम येथील गोविंदभाऊ आणि बाळकृष्णभाऊ यांनी गोकुळ गावाचे मॉडेल सविस्तर माहितींसह सादर केली. तीनही दिवसांचे सूत्रसंचालन अनिलभाऊ कोलते यांनी केले, तर आभार आशा दीदी यांनी केले. यावेळी जयश्री दीदी, कीर्ती दीदी, सुवर्णा जगताप, नंदा खोपडे, अरुण शिंदे, सुदाम आगवणे, राजेंद्र मोळावाने, पंडित मोळवणे, हनुमंत जगताप आदी उपस्थित होते. फोटो : सासवड ( ता. पुरंदर) येथील पालखीतळावर समारोपाच्या तिसऱ्या दिवशी महाआरती प्रसंगी शिवभक्त.