У нас вы можете посмотреть бесплатно शिवसेनेचेमा.आमदारशिरीष चौधरी यांनापितृशोक,शोकाकुल वातावरणातहिरालालकाका चौधरी यांच्यावरअंत्यसंस्कार или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
शिवसेनेचे माजी आमदार शिरीष चौधरी यांना पितृषोक, भारतीय तैलिक महासभेचे प्रांतीय उपाध्यक्ष हिरालाल मगनलाल चौधरी यांचे वृद्धाप काळाने निधन, अंतिम संस्कारसाठी हिराकाका प्रतिष्ठानच्या शालेय संकुलनाच्या मैदानावर हजारोंच्या संख्येने जनसागर लोटला, हिरालाल काका चौधरी यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार संपन्न. नंदुरबार जिल्ह्यासह संपूर्ण खानदेशात तसेच प्रांतात प्रसिद्ध असलेले हिरा उद्योग समूहाचे चेअरमन उद्योगपती हिरालाल काका चौधरी यांचे वृद्धापकाळाने निधन झाल्याने, नंदूरबार जिल्ह्यातील तैलिक समाजावर शोककाळा पसरली, त्यांच्यावर नंदुरबार येथील हिरा काका प्रतिष्ठानच्या पिके पाटील शैक्षणिक संकुलनाच्या मैदानावर हजारोच्या संख्येने उपस्थित्यांच्या साक्षीने शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले, अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार शिरीष चौधरी यांचे पिताश्री तथा अखिल भारतीय तल्लीक महासभेचे प्रांतीय उपाध्यक्ष हिरालाल मगन चौधरी यांचे, शनिवारी वृद्धापकाळाने निधन झाले, नंदुरबार सारख्या आदिवासीबहुल भागातून आपले राजकीय अस्तित्व निर्माण करून, समाजकारण, व्यवसाय अशा विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेणारे, मुरब्बी राजकारणी म्हणून हिरालाल मगनलाल चौधरी हे संपूर्ण खानदेशासह राज्यभरात सुपरिचित होते, मागील गेल्या चार ते पाच दिवसांपासून त्यांची प्रकृती वृद्ध काळाने खालवल्याने हिरालाल काका चौधरी यांना नंदुरबार शहरातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, दवाखान्यात असतानाच त्यांचे उपचारादरम्यान दुःखद निधन झाले, नंदुरबारच्या राजकारणात त्यांचा दबदबा मात्र हा कायम राहिला, नंदुरबार सारख्या आदिवासी भागातून राजकारणात आपली कारकीर्द करण्याची त्यांची इच्छा ठेवणाऱ्या, हिरालाल काका यांनी त्यांचे सुपुत्र माजी आमदार शिरीष चौधरी यांना थेट जळगाव जिल्ह्यातील अमळनेर मतदार संघातून उमेदवारी करण्यास इच्छा प्रकट केली, व शिरीष चौधरी यांनी उमेदवारी केल्यावर त्यांना विधानसभेत हिरालाल चौधरी यांनी निवडूनही आणले होते, नंदुरबार जिल्ह्यातील माजी आमदार पिके अण्णा पाटील यांचा प्रभाव हिरालाल चौधरी यांच्यावर कायम राहिला होता, हिरालाल चौधरी यांनी शालेय संकुल, पतसंस्था उभारून, सहकार क्षेत्रातही उत्तुंग कामगिरी केली होती, दुग्ध व्यवसायिकापासून ते हॉटेल व्यवसायिकापर्यंतचा प्रवास हा सर्वांनाच अचंबित करणार आहे, अनेक वेळा राजकारणात सत्ता संपादन करण्यात त्यांची भूमिका ही निर्णयक देखील ठरली होती, हिरालाल काका त्यांच्या पश्चात तीन मुले, मुली, सुना नातवंडे असा भला मोठा परिवार आहे, त्यांचे एक सुपुत्र प्राध्यापक डॉक्टर रवींद्र चौधरी हे प्रसिद्ध उद्योजक आहेत, तर त्यांची मुलगी रेखा चौधरी या मुंबईत आरोग्य सौंदर्य आणि निरोगीपणा क्षेत्रात प्रसिद्ध असून, त्यात त्यांना दोन आंतरराष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाले आहेत, त्यांचे राजकारण आणि चंदेरी दुनियेतील अनेकांशी चांगले संबंध आहेत, हिरालाल चौधरी यांच्या पत्नी इंदुबाई चौधरी या नंदुरबार पालिकेच्या नगराध्यक्ष असतानाच, नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती झाली होती, शनिवारी नंदुरबार येथील पिके पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणात, हिरालाल काका चौधरी यांच्या पार्थिवावर सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले, यावेळी त्यांचे सुपुत्र माजी आमदार शिरीष चौधरी उपस्थित होते, हिरालाल चौधरी यांचे सुपुत्र माजी आमदार शिरीष चौधरी यांनी, मागील गेल्या काही दिवसांपूर्वीच शिवसेनेच्या एका शिंदे गटात प्रवेश केला आहे, सध्या नंदुरबार जिल्ह्यासह राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधूमळी सुरू असतानाच, शिरीष चौधरी आणि रवींद्र चौधरी हे मागील गेल्या तीन ते चार दिवसांपासून हिरालाल काका चौधरी यांच्या प्रकृती खावल्याने, रुग्णालयात ठाण मांडून बसले होते, हिराला चौधरी यांच्या निधनाच्या बातमीने तैलिक समाजासह नंदुरबारच्या सामाजिक राजकीय क्षेत्रातील एक प्रितिभावंत व्यक्तिमत्व हरवल्याची भावना व्यक्त होत आहे, हिरालाल चौधरी यांच्या निधनाबद्दल राजकीय सामाजिक क्षेत्रातील अनेकांनी दुःख देखील व्यक्त केले आहे, आज सायंकाळी त्यांच्यावर सरकार महर्षी अण्णासाहेब पिके पाटील शैक्षणिक संकलनाच्या मैदानावर शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले, यावेळी राज्याचे माजी विकास मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित, तळोदा शहादा मतदार संघाचे आमदार राजेश पाडवी, धुळे ग्रामीणचे माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील, धुळे जिल्हा शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष सतीश महाले, यांच्यासह धुळे नंदुरबार जिल्ह्यातील प्रतिष्ठित व्यापारी लोकप्रतिनिधी सर्व स्तरातील नागरिकांनी, त्यांच्या अंत्यविधी कार्यक्रमास उपस्थिती लावली होती, तर राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी शोक संदेश आधारे त्यांना श्रद्धांजली अर्पण केली, तसेच नंदुरबार विधान परिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी देखील हिरालाल काका चौधरी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली, हिरालाल काका चौधरी यांच्या अंत्यविधी कार्यक्रमास मोठ्या संख्येने नंदुरबार जिल्ह्यासह राज्यभरातील विविध क्षेत्रातील नामवंत प्रतिष्ठित व्यक्ती, उद्योजक, शिक्षण क्षेत्रातील व्यक्ती, लोकप्रतिनिधी यांच्यासह सर्वसामान्य नागरिकांनी, उपस्थिती दर्शवली होती.